यशस्वी होण्यासाठी राशीनुसार आपल्या ह्या संवयीत बदल करून मिळवा त्यांचे परिणाम

यश कोणास नकोसे असते ? अनेकदा कष्ट करून सुद्धा आपणास यश प्राप्त होत नाही. एखादे काम आपण व्यक्तिगत किंवा सांघिक स्वरूपात करून सुद्धा अयशस्वी होत असतो तेव्हा त्यास आपण सुद्धा जवाबदार असतो. जेव्हा आपण अपयशाची कारणे शोधत असतो तेव्हा आपल्यातच दोष असल्याचे दिसून येते. आज आम्ही आपणास आपल्या काही संवयी दाखवीत आहोत ज्या आपल्याला यशस्वी होण्यापासून वंचित करतात. आपल्या राशीनुसार आपल्या अशाच काही संवयी जाणून घ्या. 

मेष राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे 

- चर्चे दरम्यान क्रोधीत होणे. 
- संघाशी विचार - विनिमय न करणे. 
- विचार न करता कोणतेही काम सुरु करणे. 
- अत्यंत फटकळपणा असणे. 

वृषभ राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे 

- थोडा हट्टी व कडक स्वभाव असणे. 
- अति विश्रांती घेणे. 
- एखाद्याने दिलेले कामच करणे. 
- सांघिक प्रवृत्तीमध्ये आपल्यासाठी एकदम सोपे काम निवडणे. 

मिथुन राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- अति बडबड करणे. 
- स्वतः गोंधळून जाणे व इतरांना सुद्धा गोंधळात टाकणे. 
- प्रकल्पातील गोपनीयता इतरांना सांगणे. 
- एकाच वेळी दोन विरुद्ध दिशेने विचार करणे. 

कर्क राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे 

- अति भावुक होणे. 
- मनःस्थितीत सतत बदल होणे. 
- गृप पासून दूर राहणे. लोकांशी विशेष न बोलणे. 
- एखाद्या अनामिक भीतीने नेहमी घाबरत राहणे. 

सिंह राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- इतरांना आपल्याहून कमी लेखणे. 
- सांघिक कार्यात आपलेच म्हणणे खरे करण्याचा हट्ट धरणे. 
- इतरांच्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेणे. 
- अति खर्च करणे. 

कन्या राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- इतरांशी मोकळेपणाने न बोलणे. 
- कोणतेही काम पूर्ण करताना जुन्या पद्धतीचा विचार करणे.   
- सांघिक प्रवृत्तीत अति लाजाळू राहणे. 
- इतरांच्या विचाराने अजिबात प्रभावित न होणे. 

तूळ राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- इतरां बद्धल आवश्यकतेहून जास्त विचार करणे. 
- चांगले व वाईट ह्यांच्यात सारखाच समन्वय साधणे. 
- जास्तीत जास्त गप्प राहणे. 
- आपल्या कंफर्ट झोन मधून बाहेर येण्याचा प्रयत्न न करणे. 

वृश्चिक राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे 

- बदला घेण्याची वृत्ती. 
- बदला घेण्यासाठी कोणत्याही स्थरावर जाणे. 
- आपल्या माणसांचे गुपित समजल्यावर त्यांना ब्लॅकमेल करणे. 
- अति जोखमीचे काम न करणे. 

धनु राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- अति आत्मविश्वास असणे. 
- सहकाऱ्यांचे दोष काढून त्यांना कमी लेखणे. 
- अति बोलणे व काम कमी करणे. 
- नवीन वस्तू बघून जुन्या वस्तूंचा विसर पडणे. 

मकर राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- आपले कौतुक ऐकून हरभऱ्याच्या झाडावर चढणे. 
- इतरांची पर्वा न करणे. 
- आपले दोष ऐकून इतरांशी वाद घालण्यास तयार होणे. 
- नवीन लोकांशी संभाषण करण्यास घाबरणे. 

कुंभ राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- निव्वळ आपले म्हणणेच खरे समजणे, इतरांचे नाही. 
- सांघिक प्रवृत्तीत इतरांना दुर्लक्षित करणे. 
- आपल्या कंफर्ट झोन मध्येच राहणे. 
- स्वप्ने बघण्यात रमणे, मात्र कष्ट न करणे.  

मीन राशीच्या ह्या संवयी बदलण्याची आवश्यकता आहे

- स्वतःच्या विश्वातच रमणे. 
- अचानक आत्मविश्वास गमावणे. 
- इतरांवर त्वरित विश्वास ठेवणे. 
- लोकांच्या हो ला हो म्हणणे. 

श्री गणेशजींच्या कृपेने 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम