प्रेम कन्या

कन्याराशीचे प्रेम संबंध

तत्व : पृथ्वी
गुण :परिवर्तनशील, स्त्रीत्व, नकारात्मक
स्वामीग्रह : बुध

प्रेमात दिले जाणारे धडे :  पवित्रता आणि जागरूकता . प्रेम शुद्ध आणि पवित्र त्याप्रमाणेच आदरणीय असते .

प्रेमात घेतले जाणारे धडे :
उत्कटता आणि उत्साह . कृत्रिम शुद्धपण किंवा अचूकता आणि विश्लेषण यांशिवाय प्रेमात अजूनही बरेच काही  असते.

व्यक्तित्व :
कन्या राशीचे लोक प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि आदर्शवादी असतात . स्वच्छ, अचूक, तपशीलात जाऊन काम करणारे असे त्यांचे जीवन असते. त्यांचे हे सगळे गुण इतके प्रभावी असतात की त्यांच्या संपूर्ण जगण्यावर आणि जीवनेच्छेवर त्याचा प्रभाव पडतो. कोणत्याही गोष्टीचे, घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यात असते.  कर्तव्य आणि व्यावहारिकता ह्या दोन्हींसाठी ते आदर्श पुरवतात. या लोकांना विरोध आवडत नाही . हे लोक सभ्य आणि अत्याधुनिक असतात आणि हसतहसत ते पुढे जात राहतात . हे लोक असं समजतात की काम करणे आणि कर्तव्य पूर्ण करणे ह्या गोष्टी जगात टिकून राहण्यासाठी खूप आवश्यक आहेत. यांच्याकरता उत्कर्ष जास्त गरजेचा असतो, आदर्शवाद नाही. उत्कृष्टता आणि  कायम शिकण्याची इच्छा असणे हेच त्यांच्यासाठी खरे बक्षीस असते. आदर्शवाद आणि स्वप्नाळूपणा ह्यांना ते जास्त महत्व देत नाहीत. त्या गोष्टींवर कन्या राशीच्या व्यक्ती टीका करतात. हे लोक संतापी, बेपर्वा आणि उल्हसित मनोवृत्तीचे  असू शकतात.

कन्या राशीच्या दृष्टीने प्रेम:
हे लोक आनंदी आणि संतुष्ट कसे राहतील,  ही कळण्यास एक फारच कठीण गोष्ट आहे किंबहुना ते एक गुपितच आहे.  कन्या राशीचे लोक जिज्ञासू वृत्तीचे असतात पण फार काही जाणून घेण्यात त्यांना रस नसतो. यांचे असे म्हणणे असते की, एखादी गोष्ट जशी असल्याचे भासते, तशी ती नसते.  कोणतेही काम करताना ही माणसे त्यात अगदी गुंग होऊन जातात. प्रेमातही ते तसेच आकंठ बुडून जातात.  आपल्या कोणत्याही संबंधांच्या पायी ते आपल्या निष्ठा पूर्णपणे वाहून टाकतात. पण यांचा प्रेमाला एक व्यावहारिक पदरही असतो. प्रेमातून आपल्याला काय आणि कोणता फायदा होईल, ह्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असते.  हे नेहमी मनापासून आणि सर्वशक्तीनिशी काम करतात.   घरात तसेच कार्यालयातही ते स्वतःला योग्य असे चांगले वातावरण निर्माण करून घेतात. काम चांगले होण्यातून त्यांना अधिक प्रेरणा मिळते. यांचे ठाम आणि स्वच्छ विचार यांच्या सहकाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक असते. कन्या जातकाच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी गंभीर स्वभावाच्या ह्या व्यक्तींना थोडे आनंदी होण्यास सहाय्य करणे आवश्यक असते.

प्रेमातील आचरण :

कन्या राशीचे लोक उदार , निष्ठावान, स्वतःच्या कर्तव्याच्या बाबतीत वाहून घेणारे आणि कर्तव्यनिष्ठ असे असतात. हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची खूप काळजी घेतात आणि त्या व्यक्ती जेथे असतील ते ठिकाण त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एक आनंददायक जागा बनविण्याचा प्रयत्न करतात . याना आपल्या जोडीदारावर अवलंबून राहणे योग्य वाटत नाही आणि आयुष्यात प्रत्येक क्षणी काम करत राहणे हेच त्यांना आवडते. कन्या व्यक्ती आपल्या आरोग्याकडे नियमित लक्ष ठेवून असतात. स्वतः प्रत्येक बाबीत नेहमी सक्षम असावे ह्यासाठी ते कायम  प्रयत्नरत असतात. याना आपल्या सारखी विचारसरणी असणारे सोबती आवडतात जर ते तसे नसले तर त्यांना आपल्या सारखे बनवण्यात कन्या व्यक्ती गुंतलेली  असते. त्यांना वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही.  हे शुद्ध, निष्पाप हृदयाचे असून निष्कपट मनाने प्रेम करतात. कधीकधी आपल्या सोबत्या कडून होणाऱ्या चुकांबद्दल ते फारच टीका करतात.  मत्सर आणि स्पर्धा यांच्यामुळे त्यांचे इतरांशी असलेले संबंध बिघडू शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा