संबंध कन्या

कन्या राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
कन्या व्यक्ती उत्कृष्ट प्रियकर असतात असे गणेशजी म्हणतात . हे खूप संवेदनशील आणि व्यवस्थित असतात आणि यांच्यात अपार सहनशीलता असते. याचाच अर्थ ते आपल्या प्रिय व्यक्तीची वाट बघत खूप वेळ थांबू शकतात . आपल्या जोडीदाराने आपली गरज समजून घ्यावी अशी ह्यांची अपेक्षा असते. ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्यास शब्दांचा विशेष वापर करत नाहीत.  हे लोक भावना व्यक्त करणारे असतात . बरेच मैत्रीसंबंध जोडण्यापेक्षा थोडेच परंतु घनिष्ठ संबंध ते जोडतात. हे स्वतःशी संबंधित व्यक्तीशी निष्ठावान असतात .

वडिलांच्या रूपात  :
एका पिता म्हणून ह्या व्यक्ती शांत आणि कठोर मानल्या जातात असे गणेश म्हणतात.  ते आपल्या मुलांना प्रेम, स्नेह आणि अजून बरेच काही देत असतात. पण मी तुमचा पिता आहे, याची जाणीव ते आपल्या मुलांना नेहमी करून देत असतात. आपल्या मुलांशी नेहमी आपला संवाद सुरु राहील, ह्याची काळजी ते घेतात.  ते आपल्या मुलांसमोर सगळे काही अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात . ते आपल्या मुलांना आवश्यक तितके स्वातंत्र्य देतात, पण आपली मुले काही अयोग्य वर्तन करणार नाहीत ना, याबद्दल त्यांना नेहमीच चिंता वाटत असते.

आईच्या रुपात:
कन्या व्यक्ती आईंच्या रूपात खूप प्रेमळ आणि लक्ष देणारी असते . पण कधीकधी आपल्या मुलांकडून तिच्या मनात काही विशेष अपेक्षा निर्माण होतात, तेव्हा ती कठोर भासते.  आपली मुले सुरक्षित असावी असे तिला नेहमीच वाटत असले  तरीही ती त्यांना घराच्या चार भिंतींत कोंडून ठेवत नाही. ती आपल्या मुलांना अगदी मोकळेपणाने प्रगती करण्याची संधी नेहमीच देते. असे असले तरी आपली मुले काय करत आहेत, ह्याची तिला पूर्ण माहिती असते. ती आपल्या मुलांची चांगली मैत्रीण होते .

मुलांच्या रुपात:
या राशींमधील मुले आज्ञाधारक असतात आणि आपल्या पालकांना मान खाली घालायला लागेल असे काहीही करत नाहीत, असे गणेश म्हणतात.  त्यांचा आज्ञाधारकपणा वागण्यातून आणि बोलण्यातून व्यक्त होतो.  जेव्हा ह्या व्यक्ती  आपल्या आईवडिलांच्या विचारांशी असहमत असतात, तेव्हा ते अगदी खुलेपणाने  विरोध व्यक्त करतात,  पण ते कधीच आपल्या आईवडिलांचा अपमान करत नाहीत. कारण कन्या रास असलेल्या मुलांच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल  जीवापाड प्रेम असते आणि त्यांच्यासाठी ती मुले काहीही करायला तयार असतात. कधीकधी ते आपल्या सहकाऱ्यांशी किंवा मित्रांशी स्वतःची तुलना करताना स्वतःला कमी मानतात आणि शोकमग्न होतात.

मालकाच्या रूपात :
कन्या राशीचे मालक खूप बोलके असतात. खूप गहन विचार असलेल्या गोष्टीही ते अगदी सहजपणे स्पष्ट करून सांगू शकतात. काम आणि कामातील सूक्ष्म बारकावे समजून घेण्यास आणि कामातील कठीणपणा कमी करण्यास कन्या रास असलेल्या मालकांची आपल्या कर्मचाऱ्यांना बरीच मदत होते. असे मालक किंवा वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यास प्रोत्साहित करतात. अशा प्रकारे कंपनी बहुमूल्य अशा संसाधनांची बचत करू शकते. असे असले तरी कन्या राशीचे मालक किंवा अधिकारी फारसे स्वातंत्र्य देत नाहीत, पण कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा मात्र फार ठेवतात.

मित्राच्या रुपात :

त्यांची आपल्या मित्रांशी खूपच जवळीक असते असे गणेश म्हणतात आणि त्यामुळे  त्यांच्या मनात मित्रांकडून अपेक्षाही खूपच असतात. जेव्हा हे कोणाला मनापासून आपला मित्र मानतात तेव्हा त्याला आनंदी ठेवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करतात. हे आपल्या मित्राला त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणीत मदत करतात. मित्रत्वाच्या नात्यात ते दात्याची भूमिका बजावतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा