स्वभाव कन्या

कन्या राशीचा स्वभाव

कन्या राशीचे प्रतीक एक कुमारिका आहे. तिच्यातून पावित्र्य दर्शवले जाते. आपण क्वचित प्रसंगी ढोंगीपणे वागुं शकता पण असे नेहमी होत नाही. तुमच्यात चांगले आणि वाईट ओळखण्याची शक्ती आहे. चांगल्या वाईटातील फरक आपण समजू शकता. आपल्या मध्ये एक अलौकिक क्षमता आहे. तिच्या साहाय्याने इतरांच्या मनातील वाईट उद्देश आपण समजून घेऊ शकता. तसेच ह्याच क्षमतेच्या आधारे आपण दूरदर्शीपणे व्यवहार करता.  आपण तसे निष्क्रिय असता परंतु वेळ पडल्यास आपण भरपूर जोशाने व उत्साहाने काम करता. साफसफाई बद्दल आपण काहीवेळा लहरीपणे वागता आणि आपली ही वृत्ती इतरांना त्रासदायक ठरू शकते. आपण बुद्धिमान असलात तरी दैनंदिन कामात आपण गोंधळून जाता.  आपण इतरांशी फारसे मोकळेपणाने बोलणारे, उघडपणाने वागणारे नसलात तरीही नवीन ओळखी करून घेणे आपल्याला चांगले जमते. आपल्या मनात खोलवर भिनलेल्या  जबाबदारीच्या जाणीवेमुळे आपल्या मनात खूप ताण निर्माण होतो. आपण भावुक असू शकता, पण आपल्या भावना कधीही उघडपणे दाखवत नाही आणि त्या स्वतःच्या मनात कोंडून ठेवता.  आपण बऱ्याच वेळा इतरांवर टीका करता, त्यामुळे इतर लोकांशी आपले वाद होऊ शकतात. आपल्याला स्वच्छता अतिशय आवडते, त्यामुळे आपल्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ असतो.

स्वामीग्रह : बुध
बुध हा ग्रह आपल्या राशीचा स्वामी असून तो केवळ आपल्या विचारांचे प्रतीक नसून आपण ते विचार कसे व्यक्त करता त्याचेही प्रतीक आहे.  हा ग्रह भाषेच्या ज्ञानासाठी उपयोगी आहे. हा ग्रह इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत सूर्याभोवती सर्वात जास्त वेगाने प्रदक्षिणा घालतो. बुध हा ग्रह आपल्या बुद्धीवर आधारित निवड क्षमतेलाही जबाबदार असतो ज्यातून आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक कळतो. कन्या राशीचा हा महत्वपूर्ण ग्रह प्रत्येक उपलब्ध माहिती तपासून घेतो.

सहावे स्थान : कार्य
राशीचक्रातील सहावे स्थान आपल्या कामाची अभिव्यक्ती आणि काळजीपूर्वक काम करण्याशी निगडित आहे. पण ते आपल्या करिअरशी संबंधित असेलच असे मात्र नाही. सहावे स्थान हे आपल्या वैयक्तिक जीवनातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या  कोणत्या आणि कशा असतील व त्या कशा प्रकारे पार पडल्या जातील, आपण दोन वेळचे अन्न कसे मिळवाल ह्यावर प्रभाव टाकते. हे क्षेत्र असे आहे की जिथे आपण आरोग्य आणि आरोग्य विषयक चिकित्सा व उपचारयांच्या बद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असता. सहावे स्थान हे केवळ आपल्या रोजच्या आयुष्यावर व कामकाजा वरच प्रभाव टाकते असे नसून आपल्या दैनंदिन आयुष्यातील स्वच्छता विषयक सवयी सुद्धा ह्याच स्थानावर अवलंबून असतात.

तत्व : पृथ्वी
आपण पृथ्वी वरील समूहाशी संबंधित आहात आणि हे योग्यच आहे कारण पृथ्वी व्यवहाराच दर्शवते. आपण अत्यंत व्यावहारिकपणे विचार करता. आपल्याकडे अत्यंत तर्कसंगत विचार करण्यास लागणारी बौद्धिक क्षमता आहे.  आपल्यामध्ये एक अलौकिक क्षमता आहे. ज्यातून आपण फसवणाऱ्या व्यक्तीला लगेच ओळखता. ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपले पाय नेहमीच जमिनीवर रोवून ठेवता आणि जे खरे आहे त्याचाच स्वीकार करता. कल्पनेच्या जगात आपण कधीच रमत नाही.  ह्यामुळे आपल्या सूचनांना इतर कोणाच्याही सूचनांच्या तुलनेत खूप खोली असते.

शक्ति :
आपली बुद्धिमत्ता ही आपली सर्वात मोठी शक्ति आहे. वास्तविक आपली रास ही राशीचक्रातील सर्वाधिक बुद्धिमान रास आहे. आपल्या विश्लेषणक्षम बुद्धीने कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण तिचे विश्लेषण करू शकता. कोणत्याही दोन किंवा अधिक गोष्टींची तुलना करण्याच्या क्षमतेचे वरदान आपल्याला लाभले आहे. आपल्याला फसवणे हे कोणासही शक्य नाही. सत्ता आणि पैशासाठी आपले कधीही स्खलन होऊ शकत नाही.

कमतरता : 
व्यवहारीपणा ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. पण तो अती प्रमाणात असणे ही आपल्यातील कमतरताही होऊ शकते. आपण बऱ्याच वेळेस सफाई पसंत असणाऱ्या व्यक्तीवर विनाकारण नाराज असता. आपण आपल्याजवळ असणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीकडे संशयाच्या नजरेनेच पाहाता. प्रत्येकाच्या कामात अढथळा आणणे ही एक अतिशय वाईट सवय आपल्याला असते. सर्वकाही क्रमवार ठेवण्याची आपली सवय इतरांना विनाकारण त्रासदायक ठरते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा