व्यावसायिक कन्या

कन्या : व्यावसायिक रूपरेखा

व्यवस्थित , प्रामाणिक आणि खूप मेहनत घेऊन काम करणारे कन्या राशीतील लोक त्यांच्या करियरमध्ये खूप सहजपणे यशस्वी होतात, कारण त्यांच्यासाठी काम करणे म्हणजे नुसता वेळ वाया घालवणे असे नसते. ह्या व्यक्तींकरिता काम म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाचा एक आरसाच असतो. हे लोक नेहमी पूर्णत्वाचा  शोध घेत असतात आणि स्वतःचे लक्ष्य गाठीपर्यंत ते थांबत नाहीत.  आपण करीत असलेल्या कामात ते अजिबात कसर राहू देत नाहीत. त्यांचे अशा प्रकारे बिनचूक काम करणे हे इतरांसाठी नसून त्यातच त्यांचे समाधान सामावलेले असते. असे करताना काहीवेळा त्यांचे वागणे कठोर आणि रुक्ष होते. पण त्यांचे असे वागणे इतरांपेक्षा मोठे होण्यासाठी नसून त्यांनी स्वतःच घालून घेतलेल्या कठोर मानदंडांना अनुसरून आपले काम योग्य प्रकारे व्हावे, म्हणून असते.

    ह्या व्यक्तींमध्ये अप्रतिम संघटन कौशल्य असते. त्यामुळे हे लोक वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या लोकांमध्ये मध्यस्थी घडवून त्यांच्यात सहमती आणू शकतात. त्यांच्यातील ह्या गुणामुळे त्यांची निवड करणाऱ्यांसाठी कन्या राशीच्या व्यक्ती फारच महत्वाच्या ठरतात.

    कन्या राशीमधील लोक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात. त्या व्यक्तींमध्ये आपल्या कारर्कीर्दीत  फार उंचावर पोहोचण्याची क्षमता असते. हे असा व्यवसाय निवडतात की ज्याच्यात विकासाच्या संधी उपलब्ध होतील. म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या कारकिर्दीसाठी गणित, भौतिकी, वित्त, अभियांत्रिकी, संशोधन, उपचार, वास्तुकला,  गुंतवणूक आणि करिअरसाठी  शेअरबाजार हे योग्य पर्याय असू शकतात. याव्यतिरिक्त हे लोक उपयोगी आणि चौकस असतात त्याच्यामुळे हे चांगले मोठे ठेकेदार, अकाउंटंट, वकील, आणि शिक्षक बनू शकतात.

    यांची नकारात्मक बाजू अशी असते की त्यांना परिपूर्णतेची आवड असल्यामुळे ते त्यांची कामे वेळेत पूर्ण करू शकत नाहीत. हे लोक फक्त एकच काम चांगले करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांच्या इतर योजना किंवा कामे अपूर्ण राहून जातात. हे लोक गोंधळून जातात आणि गंभीर होऊन जातात . कारण यांना (त्यांनी मानलेल्या )आदर्शापेक्षा कमी असणारे काहीच स्वीकार्य नसते.  असे बऱ्याचदा होऊ शकते की ह्यांच्या सहकाऱ्यांना ह्यांनी ठरवलेल्या मानदंडापर्यंत पोचू शकेल इतक्या दर्जाचे काम करणे अशक्य होते.

    वस्तुस्थिती आणि आकडेवारी यांच्यावर आधारित कन्या राशीच्या व्यक्ती आपली ठाम मते बनवतात.  कन्या राशीच्या लोकांना समजावणे किंवा त्यांचे मन वळवणे खूप कठीण काम असते . यांच्या मिळून मिसळून वागण्याच्या सवयीमुळे  ते आपल्या कारकीर्दीत खूप प्रगती करू शकतात.  याचाच असाही अर्थ होतो की हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही आपली कार्यसिद्धी होण्यास अनुकूल असे काम  करतात आणि एखाद्या खास कामात ते अडकून राहात नाहीत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा