विवरण वृषभ

वृषभ राशीचे विवरण

ह्या राशीत जन्मलेल्या व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी आणि कठोर परिश्रमांनी फळ मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच कोणताही विचार न करता एखाद्या कामाला स्वतःला जुंपून घेतात. ह्या राशीचे चिन्ह बैल असून राशीचक्रातील ही दुसरी रास आहे. ह्या व्यक्तींचे पाय नेहमी जमिनीवर रोवलेले असतात आणि त्यांना जेवढे पटते तेवढेच ते करतात.

ह्या व्यक्ती व्यवहारी, स्थिर बुद्धीच्या आणि विश्वासू असतात. समोर येणाऱ्या प्रसंगाला तोंड देत त्या सावकाश पण ठामपणे आणि सातत्याने स्वतःचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गाने पुढे जात असतात. त्यांच्या बुद्धीचा स्थिरपणा, विश्वासूपणा आणि ठाम संकल्प ही त्यांची शक्तिस्थळे असतात. त्यांनी निवडलेल्या मार्गावरून त्यांना बाजूला ओढणे किंवा त्यांच्या अंतिम ध्येयावरून त्यांचे लक्ष हलवणे फार कठीण असते. आपले लक्ष्य गाठण्याचा त्यांचा संकल्प दृढ असतो आणि त्या लक्ष्यापर्यंत ते पोचतातच.
त्यांना कोणताही धोका पत्करायला भीती वाटते त्याचे मुख्य कारण असे आहे की त्यांना सुरक्षितता हवी असते. दुसरे कारण असे आहे की, ह्या व्यक्ती आळशी असतात. ह्याचाच अर्थ असा आहे की, ह्या व्यक्ती फक्त मळलेल्या वाटेवरून चालतात. हे जरी वाईट नसले तरी नव्या कामातली मजा त्यांना लुटता येत नाही.

नेहमी सुरक्षितता आवडणाऱ्या ह्या व्यक्ती अतिशय ठामपणे आपले नेहमीचे वातावरण, काम, घर आणि विचारांना धरून असतात. इतरांच्या दृष्टीने हा हट्टीपणा असू शकेल परंतु ह्यांच्या दृष्टीने स्थिर राहण्यासाठी आवश्यक असलेली अशी ती गोष्ट असते. त्यांचे मन कोणत्याही बदलाचा स्वीकार करत नाही. पण त्यामुळे ह्या व्यक्ती जे काही करतात त्या कामाच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता येत नाही. म्हणजेच ह्या व्यक्ती हट्टी आणि धीट असतात पण त्यांच्याइतका दृढसंकल्प असणारा इतर कोणीही मिळणे फारच कठीण असते. ह्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या दबावाखाली कधीच येत नाहीत. त्यांना शांतता हवी असते पण तरीही ते आपल्या मार्गावरून किंवा मतापासून मागे कधीच सरकत नाहीत.
ह्या व्यक्ती धैर्यवान आणि विश्वासू असतात पण कधी नाराज झाल्या तर मात्र त्यांच्यात संताप आणि क्रौर्य पाहायला मिळते. पण ह्यांचा राग शांत झाल्यानंतर मात्र त्या गौतम बुद्धासारख्या शांत होतात, जणू काही काहीच घडले नसावे.

ह्या व्यक्ती विचारी असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व विशेष प्रकारचे असते. ह्या व्यक्ती कलाकार किंवा संगीतज्ज्ञ असू शकतात. कला, संगीत, चांगले भोजन, शारीरिक सुख आणि भौतिक सुख-सुविधा अशा आयुष्यातील सगळ्याच चांगल्या क्षेत्रात त्यांना पृथ्वीवरच स्वर्ग मिळाल्याचे समाधान मिळते. ह्या व्यक्ती आपमतलबी नसतात पण भौतिक सुखे मिळावी अशी त्यांची इच्छा असते. त्यांचे आपल्या कुटुंबावर प्रेम असते आणि सगळी सुखे आपल्या प्रिय व्यक्तींनासुद्धा मिळावी अशी त्यांची इच्छा असते.
ह्या व्यक्ती विशेष व्यक्तिमत्वाच्या असतात, पण हट्टीपणा आणि आळशीपणा ही त्यांची दोन प्रमुख लक्षणे असतात आणि त्यामुळेच त्या व्यक्ती बऱ्याचदा अडचणीतही येतात. तसेच त्यांच्याशी काही व्यवहार करणे, त्यांच्या जोडीने काम करणे कठीण होऊन बसते. आपल्या आसपासची परिस्थिती, वस्तू बदलण्याचा ह्या व्यक्ती प्रयत्नही करत नाहीत आणि एकाच स्थितीत अडकून पडतात.
स्थिया किंवा कोणतेही बदल होऊ न देता राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करणारा सहचर / सहचरी त्यांना मिळणे आवश्यक असते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा