गोष्टी वृषभ

वृषभ राशीच्या जातकाची जीवनशैली

वृषभ राशीच्या जातकांचा आहार :
थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट चालण्यासाठी उपयुक्त असेल असा आहार वृषभ राशीच्या जातकांनी घेणे त्यांना फायदेशीर असते. ह्यांच्या जेवणात आयोडीनयुक्त मीठ, दुधीभोपळा, फ्लॉवर, काकडी, मटार, बदाम यांचा समावेश असणे आवश्यक आहे. अधिक पिष्टमय, अधिक गोड आणि अधिक तेल असलेला म्हणजेच मेदयुक्त आहार ह्या व्यक्तींनी टाळणे श्रेयस्कर असते, कारण अशा आहाराने त्यांचे वजन वाढू शकते. न्याहारी म्हणून किंवा दुपारचे खाणे म्हणून ह्या व्यक्तींनी कडधान्ये खावी. ताकद येण्यासाठी त्यांना मांसयुक्त पदार्थ खाता येतील. चॉकलेट किंवा मिठाई खाणे आपण अचानक बंद करू नये अन्यथा आपल्याला साखरेची फारच कमतरता जाणवू शकते. परंतु ह्या पदार्थांचे आपल्या आहारातील प्रमाण थोडेतरी कमी करावे.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
त्यांचा चेहरा आनंदी, गुबगुबीत असून ओठ सुरेख असतात.  चेहरा लंबगोलाकार असतो. चेहऱ्याचा मध्यभाग पटकन लक्षात येण्याजोगा असतो. नाक गोल आणि जरासे मोठे असते. रंग गोरा आणि केस दाट व चमकदार असतात. शरीर प्रमाणबद्ध असते. आपण स्वतः कसे दिसतो याकडे त्यांचे फार लक्ष असते आणि त्यांची कपड्यांची निवड अतिशय छान असते. त्यांचे वागणे नम्र असते. एकंदरीत त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि त्यांच्यातील दृढपणाची जाणीव इतरांना नेहमी होते.

सवयी :
ह्यांना सामान पसरून ठेवण्याची वाईट सवय असते. हे आळशी असतात आणि आपले सामान व्यवस्थित ठेवू शकत नाहीत. त्यांना सगळ्या वस्तू स्वतःपासून हातभर अंतरावर हव्या असतात. तसे असले की त्यांना सुरक्षित वाटते. पण खरेतर अशाने त्यांचा गोंधळ होतो आणि त्यांची गैरसोय होते. बिनदाराची कपाटे आणि साठवणीची साधी सोय त्यांच्यासाठी चांगली असते. त्यांना सगळ्या गोष्टींचा साठा करण्याची सवय असते पण पैशांची अनुपलब्धता हे त्यांच्या मनातील तणावाचे कारण असते.

स्वास्थ्य :
वृषभ राशीच्या जातकांत जन्मतःच भरपूर शारीरिक क्षमता असते. त्यामुळे लहानपणापासूनच आरोग्याबाबत त्यांच्या फारशा तक्रारी नसतात. पण ह्या व्यक्ती जसजशा वयाने मोठ्या होत जातील, तसतशा आहारविषयक सवयींमुळे जाड होत जातात. ह्यांचा गळा फारच संवेदनशील असतो आणि गळ्यात कफ दाटण्याची तक्रार ते बऱ्याचदा करतात. त्यांना हलकासा आहार घेण्याची आणि नियमित व्यायाम करण्याची आवश्यकता असते. जर त्यांना व्यायाम करणे नकोसे वाटत असले तर बागकाम किंवा तत्सम कामांची सवय त्यांनी लावून घ्यावी.

सौंदर्य :
त्यांची त्वचा अतिशय कोमल असते. त्यांना निळा रंग खुलून दिसतो. फुलांचे प्रिंट केलेले स्कार्फ त्यांना चांगले दिसतात. तसेच तजेलदार रंगांचे लिपस्टिक व नेलपॉलिश त्यांना चांगले दिसते. त्या व्यक्तींचे संवेदनशील व्यक्तित्व जांभळ्या, गुलाबी किंवा पिवळ्या रंगात फारच उठून दिसते. त्यांचे चालणे अतिशय सावध असते. कोणते कपडे घालावे ह्याबद्दल निर्णय घेण्यास त्यांना फारच वेळ लागतो. संध्याकाळी फिरायला जातानासुद्धा ह्या व्यक्ती फार विचारपूर्वक कपड्यांची निवड करतात. आपण नेहमी चांगलेच दिसावे असे त्यांना वाटते आणि त्यांच्या मनात नेहमी महाग कपड्यांचेच विचार येत असतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा