विवरण धनु

धनु राशीचे विवरण

धनु चांद्ररास असलेल्या व्यक्ती नेहमी सत्याच्या शोधात असतात. मागचे अर्धे अंग घोड्याप्रमाणे असलेला धनुर्धर हे ह्या राशीचे प्रतिक आहे. ह्या राशीचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन व्यापक असून तो ज्ञान आणि गती यांच्यावर आधारित आहे. मौजमजा करत बेजबाबदारपणे आयुष्य व्यतीत करणाऱ्या ह्या उत्साही व्यक्ती मनापासून पूर्ण जीवन जगतात.

जीवनाचा अर्थ समजावून घ्यावा अशी इच्छा दार्शनिक आणि धार्मिक मन व बुद्धी असणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींच्या मनात असते. ह्या व्यक्तींचे विचार अगदी स्पष्ट असतात आणि भरपूर विचार करून बनवलेल्या आपल्या मताशी इतरजण सहमत झाले की त्यांना खूप आनंद होतो. ह्या व्यक्ती काहीवेळा खूप तार्किक विचार करतात आणि कठोरपणेही वागतात. ह्यांचा बोलण्यात जितका उत्साह आढळतो तितक्याच उत्साहाने व आनंदाने ते इतरांचे बोलणेही ऐकून घेतात. स्वतःची शिकण्याची, ज्ञानसंपादनाची भूक शमवण्यासाठी ते इतरांचे बोलणे ऐकतात आणि त्यांच्या सूचनाही ऐकून घेतात. ज्ञान मिळवण्यासाठी दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याची त्यांची तयारी असते. त्या प्रयत्नात जर त्यांना कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा धीर सुटतो आणि मग मात्र त्यांना सांभाळणे अवघड होऊन बसते.

निर्भय आणि मस्तीखोर असे धनु जातक हे कोणत्याही सार्वजनिक समारंभात सर्वप्रथम पोचणारे आणि सर्वात शेवटी निघणारे पाहुणे असू शकतात. ज्ञानप्राप्तीसाठी धनु जातक प्रवास करतो आणि प्रत्येक ठिकाणचे लोक आणि तेथील संस्कृती यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ते स्वतंत्र वृत्तीचे आणि कोणाचेही उत्तरदायित्व न मानणारे असतात. प्रवासात वाट्याला येणारे असंख्य रोमांचक आणि साहसपूर्ण क्षण हे त्यांच्यासाठी अक्षत ऊर्जेचे स्त्रोत असतात. विविध नातेसंबंधांकडे पाहण्याचाही त्यांचा दृष्टीकोन असाच असतो.

कोणत्याही कठीण किंवा अडचणीच्या स्थितीत राहायला लागणे त्यांना आवडत नाही, मग ती परिस्थिती भावनिक असो अथवा शारीरिक ! प्रामाणिक पण काहीसे उद्धट व अहंकारी धनु जातक आव्हानांचा सामना करायला तयार असतात. ह्या व्यक्ती स्वतःला बुद्धिजीवी व्यक्तीपेक्षा साहसी व्यक्ती मानतात. लिखाण, वाचन आणि अनोळखी विषयांत संशोधन करणे ह्यात त्यांना खूप आनंद मिळतो. धनु जातक विद्यार्थीरुपात फारच चांगले कार्य करतात. ह्या व्यक्ती लोकप्रिय असतात आणि मित्रांशी नेहमीच प्रामाणिकपणे वागतात. महत्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करण्यातही ह्यांना आनंद होतो. काहीवेळा अतिउत्साहाच्या भरात ह्या व्यक्ती आपल्या मूळ उद्दिष्टापासून भरकटतात. त्यांच्या मनात असणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची न्यायबुद्धी संशयाच्या भोवऱ्यात सापडतात.

धनु जातक स्वतंत्र विचारांचे, उत्साही आणि जरा जास्तच मोकळ्या स्वभावाचे असतात. त्या भरात ते बऱ्याचदा स्वतःचे मर्यादातिक्रमण करतात. ते फार वेगाने बोलतात आणि त्यामुळे काही वेळा त्यांचे बोलणे समजून घेणे कठीण होउन बसते. त्यामुळे त्यांचे बोलणे आणि त्यांचे मत यांचे महत्व कमी होते. ह्या व्यक्ती बऱ्याचदा दुसऱ्यांच्या भावना दुखावतात. पण त्यांच्या बोलण्यातून इतरांना प्रेरणाही मिळते. धनु जातक नवीन गोष्टी समजून घेण्यास उत्सुक, आध्यात्मिक वृत्तीचे आणि पूर्ण विश्वासू असतात. स्वतःमधील आनंद आणि विश्वास ह्या भावनांच्या आधारे इतरांना स्वतःकडे आकर्षून घेतात.

धनु जातक आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडून बसत नाहीत. ते क्वचितच दुसऱ्याची गळाभेट घेतात किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. बंजी जंपिंग, पर्वतारोहण, अश्वारोहण, परदेशात फिरणे अशा गोष्टींतून ते प्रेमाचे आदानप्रदान करतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा