प्रेम धनु

धनु राशीचे प्रेम संबंध

तत्व : वायु
गुण : परिवर्तनशील, पुरुषी, सकारात्मक
स्वामी ग्रह : गुरू
प्रेमात दिले जाणारे धडे : औपचारिकता, प्रामाणिकपणा, प्रेमात एकमेकांना समजून घेणे आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे ह्याची जाणीव करून देणे.
प्रेमात घेतले जाणारे धडे : प्रामाणिकपणा आणि समर्पण

व्यक्तित्व :
चंचल, जिज्ञासू आणि तत्वज्ञानी.
कोणत्याही गोष्टीवर किंवा व्यक्तीवर प्रथमदर्शनीच विश्वास ठेवणे धनु व्यक्तींना कठीण जाते. कशाहीबद्दल मत तयार करून ते स्थिर करणे, यासाठी त्यांना वेळ लागतो.
ह्यांच्याकडे जन्मजात जिज्ञासूपणा असल्याने आणि धारदार तर्कबुद्धी असल्याने ह्या व्यक्ती सतत स्वतःच्या आणि इतरांच्या वर्तनाचे विश्लेषण करत असतात.
स्वतःच्या वाचाळपणामुळे आणि सतत दुसऱ्याला समजून घेण्याच्या प्रयत्नात असल्याने ह्या व्यक्ती बऱ्याचदा असे काही प्रश्न विचारतात की त्यामुळे समोरच्या व्यक्तीला लाजिरवाणे वाटू शकते, तसेच समोरच्या व्यक्तीला ह्या व्यक्ती रुक्ष स्वभावाच्या वाटू शकतात. सत्यान्वेषणासाठी कितीही श्रम घेण्याची ह्या व्यक्तींची तयारी असते. पण गुंतागुंतीची शिक्षण पद्धती आणि औपचारिक शिक्षण घेणे ह्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. ह्या व्यक्ती आशावादी असतात परंतु त्याचबरोबर शंकेखोर स्वभावाच्याही असतात. स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल धनु जातक नेहमीच आग्रही असतात. बंधनामुळे ह्या व्यक्ती त्रासतात आणि परिणामतः चिडचिड्याही होतात. ह्या व्यक्ती कट्टरपंथी, नास्तिक, अहंकारी आणि अतिशय गंभीर स्वभावाच्याही असू शकतात.
    
    
धनु राशीच्या दृष्टीने प्रेम :
सत्य आणि असीम अशी गोष्ट जिचा शोध आजवर कधीच घेतला गेला नसेल, म्हणून ही गोष्ट हरवण्याआधीच जिचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे अशी गोष्ट. ह्या व्यक्तींसाठी प्रेम असे असते. ह्या व्यक्ती मनोमन असुरक्षित असतात पण चेहऱ्यावर घेतलेल्या दुसऱ्या एखाद्या मुखवट्याखाली त्या व्यक्ती आपल्या मनातील असुरक्षिततेची भावना दडवून ठेवतात. ह्या व्यक्तींना वस्तुस्थितीचे भय वाटते. ह्या व्यक्ती कधीतरी इतक्या अस्वस्थ होतात, त्रासून जातात की त्यांना सांभाळणे इतरांसाठी फार कठीण होऊन बसते. ह्यांना आदर्शवाद हवासा वाटतो, पण तो प्रत्यक्षात आणणे तर त्यांच्यासाठी अशक्य असते. स्वतःच्या मनाचे व्यवहार ह्यांना कळत नाहीत. त्यामुळे ह्या व्यक्ती समाजात कितीही मिळून मिसळून वागल्या तरीही ह्यांचे मन कधीही आनंदी होऊ शकत नाही. धनु राशीचा जातक स्वतःच्या सामाजिक स्थानाबद्दल अतिसंवेदनशील असतो आणि प्रेमाकडे तो फारसा मोकळेपणाने पाहू  शकत नाही. परंतु तरीही ह्यांच्या प्रियकर / प्रेयसीने ह्यांच्याकडून उत्साहाचे वर्तन, आदर्शवाद आणि आशावाद ह्या गोष्टी जरूर शिकाव्या.

प्रेमातील आचरण :
 धनु राशीचा जातक नेहमी हसतमुख, आशावादी, मिळूनमिसळून वागणारा आणि साहसी वृत्तीचा असतो. पण कधीकधी ह्यांच्या वागण्यातला विचित्रपणा आणि निरागस औद्धत्य त्यांच्या जोडीदाराला अपमानकारक वाटू शकते. असे असले तरी धनु व्यक्तीची उत्साही वृत्ती, कोणत्याही विषयावर कितीही बोलू शकण्याची ह्यांची क्षमता, साहसी वृत्ती आणि प्रवासाची आवड ह्यांच्या सहाय्याने ती व्यक्ती आपल्या रागावलेल्या प्रिय व्यक्तीचे मन अगदी सहजपणे पुन्हा जिंकू शकते. स्वतःच्या नव्या नातेसंबंधावर ह्या व्यक्ती खूष असतात. पण जसजसे हे नाते जुने होऊ लागते, तसतशा धनु व्यक्ती हे नाते जपण्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी पेलण्यास आणि बांधिलकी जपण्यास असमर्थ ठरतात. कोणतेही नाते जपण्यासाठी त्या नात्याला प्रेमाच्या शिडकाव्याची सतत आवश्यकता असते, ही गोष्ट त्या व्यक्ती विसरतात.

धनु व्यक्ती स्वतःच्याच स्वप्नसाम्राज्यात रममाण होऊन राहतात आणि परिणामी त्यांचे नातेसंबंध दुरावतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा