संबंध धनु

धनु राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
एक प्रेमिक म्हणून ह्या व्यक्ती हसतमुख आणि धमाल करणाऱ्या असतात. ते संवेदनशील, स्पष्टपणे बोलणारे आणि प्रयोगशील असतात. जी व्यक्ती ह्यांच्याच सारखी असेल, तिच्याशीच ह्यांचे चांगले जमते. नित्यनूतनतेबद्दल ह्या व्यक्तींना वाटणारे प्रेम ह्यांचे प्रेमजीवन रंगीत करते. स्वतःच्या प्रेमातील व्यक्तीशी धनु व्यक्ती प्रामाणिक आणि समर्पित वृत्तीने वागतात. ह्यांचा जोडीदारही संवेदनशील, स्पष्ट बोलणारा आणि बुद्धिमान असणे आवश्यक असते.

पित्याच्या रुपात :

गणेश असे म्हणतो की, एक पिता म्हणून आपल्या मुलांबरोबर असणे, त्यांच्या जोडीने हसणे, बोलणे धनु व्यक्तींना आवडते. ह्या व्यक्ती मनाने एका मुलाप्रमाणेच असतात आणि त्यांना आपल्या मुलांशी खेळणे आवडते. ते आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासातही मदत करतात. आपल्या मुलांशी त्यांचे वागणे प्रेमाचे, मोकळेपणाचे असते. मुले आणि वडील दोघेहीजण एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात. मुलांवर ते प्रेमाचा वर्षाव करतात आणि मुलांच्या प्रतिभेला नवनवीन धुमारे फुटावे, ह्यासाठी त्यांना भरपूर मोकळीकही देतात.

आईच्या रुपात :
धनु राशीच्या मातांचे आपल्या मुलांशी वागणे प्रेमाचे, मोकळेपणाचे असते. त्या आपल्या मुलांना अतिशय प्रेमाने आणि लक्षपूर्वक वाढवतात. त्यांचे आपल्या मुलांशी वागणे मैत्रिणीप्रमाणे असते. ह्या माता आपल्या मुलांना जगण्यातील आनंद पुरेपूर घेऊ देतात आणि अगदी मोकळेपणाने वागू देतात. पण आपली मुले चुकीच्या वाटेने जात नाहीत ना, याकडे त्यांचे व्यवस्थित लक्ष असते.

मुलांच्या रुपात :
धनु राशीची मुले अतिशय निरागस असतात आणि त्यांच्यातले मूलपण बरीच वर्षे टिकून राहाते. गणेश म्हणतो की, ही मुले मोठी झाल्यानंतरही त्यांच्यातील निरागसपणा हरवत नाही. ही मुले हट्टी असतात. आपल्या कुटुंबातील सगळ्यांवर त्यांचे खूप प्रेम असते, पण इतरांचे म्हणणे ती मुले फारसे ऐकत नाहीत.

मालकाच्या रूपातः
धनु राशीचा जातक एक मालक म्हणून अतिशय कनवाळू असतो. गणेशाचे असे म्हणणे आहे की, ह्यांच्या हाताखाली काम करणारी माणसे आनंदाने काम करतात. हे मालक किंवा वरिष्ठ आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर काही वेळ घालवतात आणि कामाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करतात. आपल्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे ह्यासाठी ते आवश्यक त्या सगळ्या सोयी उपलब्ध करून देतात आणि मोकळीकही देतात.

मित्राच्या रुपात :
गणेश म्हणतो की, हे मित्र उत्साह निर्माण करणारे आणि प्रेमळ असतात. ते खऱ्या अर्थी मदत करणारे असतात. ते स्वतः प्रसन्नचित्त असतातच पण आपल्या मित्रांच्या घोळक्यात असताना ते आनंद आणि प्रसन्नता वाढवतात. धनु राशीचे मित्र स्वतः तर हसतातच पण इतरांनाही हसवणे त्यांना आवडते. ह्याशिवाय आपले मैत्रीचे संबंध ते प्रामाणिकपणे सांभाळतातच पण इतरांशी जोडलेले संबंध ते वर्षानुवर्षे सांभाळतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा