स्वभाव धनु

धनु राशीचा स्वभाव

धनु ही रास राशिचक्रातली नववी रास असून तिचे प्रतिक एक अश्वमानव आहे. त्याच्या शरीरातील मागील अंग घोड्याचे असून पुढचे अंग मानवी आहे. ह्या मानवी अंगाच्या हातात प्रत्यंचा ताणलेले आणि बाण लावलेले धनुष्य आहे. त्यामुळे धनु राशीच्या जातकात उच्च आणि नीच प्रकारच्या अशा दोन्ही प्रवृत्ती असतात. मानवी अंगाच्या हातातील धनुष्यबाण स्वर्गाच्या दिशेने रोखलेले आहेत. यातून असे सूचित होते की, धनु राशीच्या जातकाची प्रवृत्ती आध्यात्मिक प्रकारची आहे. ह्याचा असाही अर्थ होतो की जातक आशावादी असून त्याचा स्वभाव प्रत्येक बाबीतील सकारात्मक आणि प्रकाशमान बाजू पाहण्याचा आहे. ह्या राशीचा जातक अडचणींपुढे कधीच हार मानत नाही. ह्याचीच दुसरी बाजू अशी आहे की धनु राशीचा जातक अतिशय कठोर होतो आणि चांगल्या सूचनांचाही स्वीकार करत नाही.
    
हा जातक अतिशय चळवळ्या स्वभावाचा असतो आणि त्याला घराबाहेर असणे आणि घराबाहेर काहीतरी उद्योग करीत राहणे अधिक मानवते. ह्या जातकाला सगळ्या प्रकारचे खेळ आणि शारीरिक हालचाली यांच्यात बराच रस असतो. तसेच तो अतिशय कनवाळू आणि अतिशय प्रामाणिक असतो आणि आपल्या प्रियजनांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. ह्या जातकाचा उद्योगीपणा त्याला काहीवेळा अस्वस्थ करतो. एकाच वेळी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणे त्या जातकांना अवघड होते आणि त्यामुळे एकाच वेळी खूप गोष्टी त्यांना करता येत नाहीत.

स्वामि ग्रह: गुरू
गुरु सूर्यापासून पाचवा ग्रह असून तो आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तो योग्य प्रकारे व न्यायीपणाने वागण्याचे द्योतक आहे. सगळ्याच मोठ्या, चांगल्या आणि संख्येने अधिक असलेल्या गोष्टी त्याच्या अधिपत्याखाली येतात. पण असेही म्हटले जाते की, ' अति सर्वत्र वर्जयेत '. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. गुरु आपल्याला अतिखर्चिकपणा करणे आणि कोणत्याही कामात स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकणे ह्या गोष्टी करण्यास भाग पडतो. गुरु हा एखाद्या सूक्ष्मदर्शक भिंगाप्रमाणे काम करतो आणि एखादी लहानशी संधी खूप मोठी असल्याचे भासवतो. तुमचा राशीस्वामी ह्या नात्याने गुरु तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधींचा स्वीकार करून त्यांचा उपयोग करून घेण्यास प्रोत्साहित करतो. तुमच्या मनात तो अशी भावना निर्माण करतो की, जे तुमच्या समोर येऊन उभे राहिले आहे, ते तुमच्याहूनही भव्यदिव्य आहे.

नववे स्थान : प्रवास
पत्रिकेतील तिसरे स्थान जर जवळपासचे, कमी अंतराचे प्रवास दर्शवत असले तर नवव्या स्थानावरून दूर अंतरावरचे प्रवास दर्शवले जातात, असे म्हणता येईल. ह्या स्थानावरून परदेशप्रवास, उच्च शिक्षण तसेच काही साहसी गोष्टींची शक्यता दर्शवली जाते.
 
तत्व : अग्नि
अमर्याद ऊर्जेचे भांडार असलेल्या अग्नितत्वाची ही रास आहे. अग्निप्रमाणे ह्या जातकाने स्वतःमधील उर्जेचा कितीही उपयोग अंगीकृत कार्यासाठी केला तरीही तो कधीच थकत नाही. ह्या जातकाच्या सगळ्या कृती अनपेक्षित असतात. त्यांच्या मनात पुढील कार्याचे नियोजन केलेले नसते आणि काहीही विचार न करता ते पुढची कृती करून मोकळे होतात. हा जातक कोणत्याही कार्यात स्वतःला झोकून देतो. यांच्यातील उर्जा रचनात्मक आहे असेही म्हणता येत नाही किंवा अगदी विनाशकारी असते असेही म्हणता येत नाही. ज्यांच्याविषयी ह्या जातकाला आपलेपणा वाटतो, त्यांचे हित त्यांच्यासाठी सर्वस्व असते, असे म्हणता येईल.

शक्ति :
ह्या जातकांना बरेच गुण जन्मजात भेटीदाखल मिळालेले असतात. ह्यांची रास आपल्या राशीचक्रातील सर्वाधिक उद्योगी रास आहे. वेगाने धावणाऱ्या, शर्यतीत भाग घेणाऱ्या खेळाडूचे सगळे गुण ह्यांच्यात असतात. त्यामुळे खेळांमध्ये आणि साहसी वृत्ती आवश्यक असलेल्या क्षेत्रात त्यांना चांगले यश मिळते. ह्या व्यक्ती स्वतंत्र वृत्तीच्या, आशावादी आणि नेहमी सावधान अशा असतात. तसेच ते चांगले मित्र आणि प्रामाणिकपणे वागणारे असतात.

कमतरता :
ह्या राशीच्या जातकांत असलेला अतिउत्साह त्यांना कोणत्याही कामाबद्दल जराही साधकबाधक विचार न करता त्या कामाला हात घालायला भाग पाडतो. ह्यांना लगेच कंटाळा येतो आणि प्राप्त परिस्थितीचा त्रासही वाटू लागतो. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याबद्दल एकाग्रपणे विचार करून कार्य करणे ह्यांना जमत नाही.भावविहीनता, स्वभावातील ताठरपणा आणि अस्वस्थपणा हे ह्या व्यक्तींमधील इतर काही अवगुण आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा