गोष्टी धनु

धनु राशीच्या जातकाची जीवनशैली

धनु राशीच्या जातकांचा आहार : धनु राशीच्या जातकांचे यकृत हा त्यांचा कमजोर अवयव असतो. त्यामुळे यकृत निरोगी आणि कार्यक्षम ठेवेल असा आहार त्यांनी घेणे आवश्यक असते. बीट, टोमॅटो, ताजे आणि पूर्णपणे वाळलेले असे दोन्ही प्रकारचे आलुबुखार, कोंबडी, मासे, सफरचंद, कच्ची अंडी, स्ट्रॉबेरी, फळांची आणि भाज्यांची साले, खजूर, चेरी, हिरवे बीन्स आणि मका ह्यांचा धनु जातकाच्या आहारात समावेश असणे आवश्यक असते. त्यांनी मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करावे, नियमित व्यायाम करावा आणि नियमित वेळी योग्य तितके भोजन नक्की घ्यावेच. ताजी फळे आणि भाज्या ह्यांच्यापासून तयार केलेले हलकेसे खाद्यपदार्थ त्यांनी नेहमी जवळ बाळगावे. तसेच भरपूर पाणी पिण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये

धनु व्यक्ती उंच आणि मजबूत शरीरयष्टीच्या असून त्यांचे केस दाट असतात. ह्या व्यक्ती बऱ्याचदा हसताना दिसतात आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक त्यांना अधिकच आकर्षक बनवते. त्या व्यक्तींचा आवाज ऐकायला फार मधुर वाटतो. त्यांचे हात धडापेक्षा मोठे असतात, नाक सामान्यतः मोठे असते आणि पुढचे दातही मोठे असतात. भरपूर जेवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे प्रौढ वयात त्यांचे वजन चांगलेच वाढते आणि त्यांच्या हालचालीत सहजपणा राहात नाही. त्यांची उपस्थिती नेहमी वातावरणात उत्साह आणणारी आणि अगदी सहज असते (त्यांच्या वागण्यात औपचारिकपणा नसतो). ते नेहमीच प्रेमळपणे वागतात. बदलत्या परिस्थितीनुसार वागण्याचे, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचे कौशल्य त्यांच्यापाशी असते.

सवयी :
ह्या व्यक्तींना कोणत्याही सवयी सहजपणे लागत नाहीत. कोणत्याही वस्तूची सवय त्यांना एकतर लागत नाही आणि लागली तर सुटत नाही. ह्या व्यक्तींमध्ये एक दोष असा असतो की सत्य पुढे आणण्यासाठी हे क्रूर म्हणावे असेही वर्तन करू शकतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे लोक दुखावले जातात. इतरांशी बोलण्याच्या सभ्य पद्धती ह्या व्यक्तींनी शिकणे आवश्यक असते. ह्या व्यक्ती पैशाबद्दल फारशी चिंता करत नाही आणि अगदी सहजपणे जुगार खेळू लागतात. समाजात वावरताना त्यांनी थोडीफार बचत केली तर ते बऱ्यापैकी पैसा गाठीला बांधू शकतात.


स्वास्थ्य :

धनु जातक बहुतेक वेळा मजबूत अंगकाठीचे  असल्याचे पाहायला मिळतात. अर्धेअधिक तारुण्य संपेपर्यंत ह्या व्यक्तींना आरोग्यविषयक प्रश्नांना क्वचितच तोंड द्यावे लागते. पण खूप किंवा गरजेपेक्षा अधिक जेवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांचे यकृत बघडू शकते. त्यांचा पार्श्वभाग, जांघा, पोट आणि पायही अतिशय संवेदनशील असतात. मद्यसेवन करणे किंवा पचायला खूप जाड पदार्थ खाणे ह्या गोष्टी त्यांनी टाळाव्या. उच्च रक्तदाब किंवा यकृताशी संबंधित कटकटी निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीकडे गांभीर्याने पाहाणे आवश्यक असते. धनु व्यक्तींना कटीस्नायूशूल (सायटिका) किंवा जांघेतील लिगामेंट फाटणे असे त्रास होण्याची शक्यता असते. वाहन चालवत असताना अपघात होऊ नये याची काळजी त्यांनी जरूर घ्यावी.

सौंदर्य :
आरामदायक वाटणारे खेळांचे कपडे वापरणे ह्या व्यक्तींना आवडते. ह्या प्रकारचे कपडे त्यांच्या व्यक्तिमत्वाला चांगलाच उठाव आणतात. टी शर्ट, शॉर्ट्स आणि टोपी अशा वेशात ह्या व्यक्ती छान दिसतात. त्यांचे पाय लांब असतात त्यामुळे त्यांना लेगिंग्ज आणि घट्ट जीन्स चांगल्या दिसतात. फिकट जांभळा किंवा वांग्यासारखा रंग त्यांना आवडतो. ह्या रंगाच्या कपड्यांत धनु व्यक्ती चांगल्या दिसतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व मैत्रीपूर्ण वाटते. ही माणसे हवामान आणि आसपासचे वातावरण यांच्यावर अवलंबून कोणत्याही प्रकारचे कपडे वापरतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा