नक्षत्रे धनु

धनु राशीतील नक्षत्रे

मूळ नक्षत्र: निर्रुती (राक्षसांची माता) ही मूळ नक्षत्राची देवता असून केतू हा स्वामी आहे. धनु जातकाच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे स्वतःच्या किंवा अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीसाठी घातक असतात. धनु राशीत दिसणारे सगळे गुण ह्या नक्षत्रात मुख्यत्वाने आढळतात.

पूर्वाषाढा नक्षत्र : पाणी ही ह्या नक्षत्राची देवता असून शुक्र स्वामी आहे. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकात कामप्रवृत्ती विशेषत्वाने आढळते. ह्या व्यक्ती आळशी आणि बेजबाबदार असतात. अपयशी होणे आणि नैराश्य येणे यांचे भय त्यांना नेहमी वाटते. कार्याचे महत्व ह्या व्यक्तींना जोपर्यंत समजावून सांगितले जात नाही, तोपर्यंत ह्या व्यक्ती ते कार्य हाती घेत नाहीत.

उत्तराषाढा नक्षत्र : विश्वेदेव नावाचे तेरा देव ह्या नक्षत्राचे देव असून रवि त्याचा स्वामी आहे. ह्या व्यक्ती उत्साही आणि आनंदी असतात. नवनिर्मितीची त्यांना आवड असून त्यांच्यात तशी क्षमताही असते. संधीची वाट पाहात न बसता ह्या व्यक्ती आपल्या योजनेनुसार कार्य करत राहातात. ह्या व्यक्ती दुर्गुणांपासून दूर राहातात आणि सद्गुणांचा विकास करतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा