व्यावसायिक धनु

धनु: व्यावसायिक रूपरेखा

धनु राशीच्या जातकांचे स्वभाव, प्रवृत्ती ह्यांना अनुलक्षून बऱ्याच अनपेक्षित गोष्टी आपल्याला
पाहायला सापडतात. ह्या व्यक्ती आसपासच्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे आणि चर्चा करणे तसेच त्यांच्या सहकार्याने  सामाजिक कार्याचे जाळे निर्माण करून ते सगळीकडे पसरवणे ह्यात मश्गुल असतात. धनु जातक नेहमी हसतमुख असून कामाचा दर्जा आणि वैयक्तिक संबंध ह्या दोन्ही गोष्टींना ते सारखेच महत्व देतात. आपल्या कामाच्या टेबलाकडे किंवा केबिनमध्ये जाताना ह्या व्यक्ती बऱ्याचदा आपल्या सहकाऱ्यांशी हसून, दोन शब्द बोलून मगच पुढे जाताना दिसतात. ह्यात त्यांचा कोणताही नाटकीपणा नसतो. स्वतःच्या आसपास आनंदाचे वातावरण निर्माण करणे त्यांना मनापासून आवडते. ह्या व्यक्तींना बारीकसारीक तपशीलात जाणे जमत नाही. त्यामुळे ज्या कामात प्रत्येक क्षणी केल्या जाणाऱ्या कामाचे नियोजन आवश्यक असते, ती कामे ह्यांना जमत नाहीत. सगळ्या कामावरून एकदा नजर फिरवून संपूर्ण कामाचा आढावा घेऊन कामाचे नियोजन करणे, अशी त्यांची पद्धत असते.

भावनाशीलता आणि स्वतःच्या विचारपद्धतीवर संपूर्ण विश्वास:
स्वतःच्या इच्छेप्रमाणे कार्य घडवून आणण्यासाठी अतिरिक्त काम करायला धनु जातक मागेपुढे पाहात नाहीत. त्याप्रमाणेच ह्या व्यक्ती मनापासून आणि आनंदाने काम करतात. आपल्या कुशाग्र बुद्धीने काम करताना स्वतःच्या सुहास्यवदनाने ह्या व्यक्ती सगळे वातावरण हलकेफुलके ठेवतात. कितीही अडचणी आल्या तरी ह्या व्यक्ती काम अर्ध्यात सोडून पळ काढत नाहीत. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या चमूचा धीर खचला, तरीही धनु व्यक्ती सगळ्या वातावरणात असीम उर्जा आणि उत्साहाचे संचरण करतात.  ह्या व्यक्तींमध्ये अद्भुत अशी संघभावना असते.

ह्या व्यक्तींमध्ये रचनात्मक आणि बहुमुखी प्रतिभा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर नेहमीच उभे असते. ह्यांचे विचार रंजक, पटण्याजोगे आणि विधायक असतात यात अजिबात शंका नाही. पण जर ह्या व्यक्तींच्या म्हणण्याप्रमाणे विचारांवर आधारित कार्यवाही होत नाही असे जर दिसले, तर मात्र त्यांना संताप येतो आणि मग सगळ्यांशी मिळूनमिसळून वागणारी हीच का ती व्यक्ती, असे वाटू लागते.

याशिवाय, त्यांच्या बेजबाबदारपणे वागण्यामुळे आणि आंतरिक अस्वस्थतेमुळे सगळ्या वातावरणात एक प्रकारची नकारात्मक अस्वस्थता निर्माण होते. धनु राशीच्या व्यक्तींनी हे नेहमी ध्यानात ठेवणे आवश्यक असते की, भावनावेगात घेतलेले निर्णय आणि अविचाराने घेतलेली जबाबदारी, ह्यांच्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात.

आपल्याला प्रवास करण्याची संधी मिळू शकेल आणि आपल्याकडील ज्ञान इतरांना वाटता येईल अशा प्रकारचे कार्यक्षेत्र त्यांना आवडते. त्यामुळे धनु जातक चांगले प्रवासवर्णन लिहू शकतात. त्याप्रमाणे त्यांचे वक्तृत्व प्रेरणादायी असते. प्रवाशांना मार्गदर्शन करणे, ट्रॅव्हल  एजन्सी चालवणे हे व्यवसायही त्यांना चांगल्या प्रकारे जमू शकतात. ह्यांच्याकडे अंतर्ज्ञान असते आणि ह्यांच्या संपर्कात आल्यावर इतरांना चांगले वाटते, ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक असते. जेव्हा कारणपरत्वे ह्या व्यक्ती एखादे कार्य हाती घेतात, तेव्हा ते कार्य त्या अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करून दाखवतात. त्यामुळे ह्या व्यक्ती प्रभावशाली राजकारणी नेता, मानव संसाधन प्रबंधक, एनजीओ कार्यकर्ता, शिक्षक, दार्शनिक, कार्यकर्ता, चिकित्सक, डॉक्टर वगैरे होऊ शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा