प्रेम मीन

मीन राशीचे प्रेम संबंध

तत्व:- जल
गुण​:- परिवर्तन शील, स्त्रीत्व ,नकारात्मक.
*स्वामी ग्रह:- नेपच्यून
प्रेमात दिले जाणारे धडे :-
प्रेम म्हणजे विश्वास.प्रेम म्हणजे स्वप्न.प्रेम संवेदना आहे.
प्रेमात घेतले जाणारे धडे :-
प्रेम जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा असू शकते जी कोणालाही जीवन जगण्यास प्रेरित करु शकते.

व्यक्तित्व :
स्वप्नाळू, रहस्यमय आणि रोमेंटिक

मीन राशीचे जातक दयाळू, सहानुभूती पूर्ण आणि संवेदनशील असतात. हे साधे , शांत संयमी​व मोजून  मापून पाऊल टाकणारे आहे. यांना जीवनाची खोलवर समज असते कींवा समज आहे असे वाटते. हे कधी कधी निष्क्रिय आणि वेगळे भासतात.काही लोक यांना त्रासदायक समजतात तर काही लोकांना यांच्यात रहस्यमय चमक दिसून येते आणि ते लोक मंत्रमुग्ध होतात. हे वास्तविक जीवनात स्वतंत्र, प्रेरीत ,आनंदी असतात ;पण हे संघर्ष करु इच्छित नाही .हे अध्यात्माच्या बाबतीत जागरूक असतात. यांच्यात अध्यात्म व संसार या दोन गोष्टीत द्वंद्व चालू असते.काही मीन राशीचे जातक सर्व गोष्टींचा त्याग करण्यावर विश्वास ठेवणारे आणि काही लोक सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यावर विश्वास ठेवणारे असतात. आळस अविश्वसनीयता भित्रेपणा पळपुटेपणा गर्विष्ठपणा इ यांचें दुर्गुण आहे.

*मीन राशीच्या दृष्टीने प्रेम :
यांच्यासाठी प्रेम म्हणजे स्वार्थ विरहित भावना आहे.एक चमत्कार आहे जो पूर्णत्व​ प्रदान करतो.संपूर्ण बनवतो आणि आपलं समर्पण मागत.प्रेमात त्याग केला जातो घेतले जात नाही.प्रेम निर्मिती तत्वज्ञान अध्यात्म युक्त असते. ह्यांना बदल आवडतो म्हणून हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिवर्तन शील असतात पण हे असं खर्या प्रेमाच्या आणि अध्यात्माच्या शोधात करतात. पण हे आपल्या आदर्श वादापासून डगमगत नाहीत /दूर जात नाही.

* प्रेमातील आचरण :
मीन राशीचे जातक कोमल पोशिंदा सरळ स्वार्थी आणि दयाळू असतात पण हे कधी कधी उदासीन असतात हे कधी ही आपली बाजू मांडत नाही हे आपल्या विचारांशी प्रामाणिक असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे यांचें विचार आपल्या समोर येतात आपापसातील मतभेद यांना आवडत नाही म्हणून हे माघार घेतात. हे दान व क्षमा करण्यावर विश्वास ठेवणारे असतात. यांच्या ह्या गुणाला काही लोक पळपुटेपणा मानतात.ह्यांच्या बोलण्यात माधुर्य असते हे नम्र आणि विनम्र असतात​. या मुळे इतर लोक यांचा गैर फायदा घेतात.समाजसेवा करण्याच्या भावनेमुळे यांच्यात  तडजोड करण्याची प्रवृत्ती येते. हे आपले प्रेम प्रणयरम्य मार्गाने व्यक्त करु इच्छितात.यांच मृदू हृदय प्रेमात आनंदीत होतं पण प्रेमात मिळालेला धोका यांना त्रासदायक ठरू शकतो आणि ते चुकीच्या सवयींच्या आहारी जाऊ शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा