संबंध सिंह

सिंह राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
एका प्रेमींच्या रूपात हे अत्यंत भावनिक व्यक्ती आहेत . हे साहसी ,मजेशीर आणि खूप उर्जावान आहेत . खासकरून जेव्हा शारीरिक संबंधाची गोष्ट येते, तेव्हा हे प्रेम आणि शारीरिक संबंधामध्ये एक स्पष्ट अंतर ठेऊ शकतात . गणेशजींचे म्हणणे असे आहे,कि हे असे मित्र निवडतात कि जे त्यांना प्रभावी स्थितीत ठेवतात . जे मुर्खासारखे हालचाली नाही करत आणि जे त्यांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप नाही करत . सारांश हेच कि , हे खूप स्वतंत्र व्यक्ती आहेत, जे विचार करतात कि त्यांच्यासोबत बुद्धिमान मित्र असावेत.

पित्याच्या रुपात :
एका वडिलांच्या रूपात हे खूप संतुलित व्यक्ती आहेत , असे गणेशजी म्हणतात . हे फक्त कोमल मनाचे नसून ते शिस्तप्रिय वडील असतात . हे आपल्या मुलांना पूर्ण क्षमतेचा उपयोगासाठी साम ,दाम ,दंड आणि भेदचा वापर करायला सांगतात . हे आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि त्यांना अनेक बाहेरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देत असतात परंतु त्यांना त्यांच्या अभ्यासात मुभा द्यायची परवानगी नाही .यामुळे त्यांचे मुले त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात . हे नेहमी गरजेच्या वेळी त्यांच्या मुलांसोबत असतात .

आईच्या रूपात
एका आईच्या रूपात हे आपल्या मुलांविषयी खूप रक्षात्मक नाही असत , कारण यांना माहित आहे कि हे त्यांची क्षमतांचा पूर्ण विकास नाही होऊ देत. हे बाहेरून खूप कडक स्वभावाचे दिसतात परंतु हे मानाने खूप कोमल आणि मायाळू असतात हे आपल्या मुलांसाठी प्रेरणेचा मोठा स्रोत आहेत आणि त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात  पूर्ण क्षमता मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते . हे आपल्या मुलांना त्यांच्या जीवनाच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी मजबूत बनविले जाते.

मुलांच्या रूपात
हि मुले जिद्दी तर असतातच, त्याचबरोबर हे आपल्या मनाला ओळखतात कि वास्तवमध्ये यांना काय आवडते. गणेशजींचे म्हणणे आहे कि, हे आपल्या आई-वडिलांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देतील हे शक्य नाही यांना आपल्या प्रमाणे काम करण्याची आवड असते आणि त्यात उत्कृष्ठता मिळवीत असतात . याचा अर्थ असा नाही होत कि, हे आपल्या आई वडिलांसोबत चुकीचा व्यवहार करतील . खरेतर , यांची आपल्या आई- वडिलांना समजविण्याची वेगळी पद्धत असते . म्हणून जरी यांचे आई-वडील यांच्या विचारांशी सहमत नसतात . पण ते खरेतर त्यांच्या मुलांच्या गोष्टीला आकर्षित होऊन त्यांचे म्हणणे ऐकतात .

मालकांच्या रूपात
एका मालकाच्या रूपात हे खूप कडक असतात . आणि आपल्या कर्मचाऱ्यांकडून खूप अपेक्षा ठेवत असतात , असे गणेशजी म्हणतात. खरेतर हेही आपले सर्वोत्तम काम करून देण्यासाठी एक चांगल्या अनुकूल वातावरणाची निर्मिती करून देत असतात . हे कार्यालयात सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करत असतात जेव्हाही संधी मिळत असते,ज्यामुळे कर्मचारींना हि मोकळेपणाने मजा करण्याची संधी मिळत असते, हे आपल्या कर्मचारींना काही मोकळा वेळ देत असतात आपल्या क्षमतांनुसार काम करता यावे यासाठी . पण वेळेच्या बाबतीत हे खूप शिस्तप्रिय आणि कडक आहेत .

मित्राच्या रूपात
हे खूप खरे आणि निष्ठावंत मित्र आहेत आणि आदर्श सोबती आहेत ,असे गणेशजी म्हणतात. हे आपल्या मित्रांचा नेहमी सोबत असतात जोपर्यंत त्यांच्या मित्रांची संकटे संपत नाहीत . हे आपल्या मित्रांची खूप काळजी घेत असतात आणि नेहमी त्यांना आनंदी आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा