संबंध मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
मिथुन राशीचे लोक एका प्रियकराचा रूपात खूप मजा देऊ शकतात . ते लोक उत्साही ,मजेशीर,आणि तेजस्वी बुद्धीचे असतात . प्रास्ताविक गप्पा गोष्टी यांच्या करता तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या त्या वास्तवात महत्वाच्या आहेत ,आणि जेव्हा व्यवहारज्ञानाची गोष्ट येते तेव्हा त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही . हे लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेळ घालवतात जो पर्यंत यांना त्यांच्या बुद्धी ला आणि त्यांच्या उर्जेला समान अशी जोडीदार मिळत नाही . मिथुन राशीच्या लोकांना उत्साह , अष्टपैलू प्रतिभा , समाधान आणि उत्साह भासवण्याचा गरज आहे . एक वेळा जर हे मिसळून गेले तर दीर्घ काळा पर्यंत उपयुक्त जीवन शैली मध्ये व्यवस्थित होऊ शकतात .

पित्याच्या रुपात:

एका वडिलाच्या रूपात मिथुन राशीचे लोक त्यांच्या मुलांवर प्रेम करणारे आणि त्यांचा सांभाळ करणारे असतात . आणि ते मुलांशी मित्री ने व्यवहार करतात . आणि खरं तर मुलांना हेच आवडत . या राशीत वडील आणि मुलगा यांच्यात कुठलच पिढीचं अंतर नसते . यांचा स्वभाव खूप लवचिक असतो ,आणि त्यांच्या मुलांना भरभराट आणि माहिती प्रतिभा यांचा पत्ता लागावा या साठी ते स्वतंत्रता देतात . आणि कधी कधी तर हे एक वडिलांच्या रूपाने त्यांच्या मुलांवर नजरा ठेऊन असतात . आणि हे त्यांना त्यांच्या जीवनात बरोबर मार्ग मिळावा यासाठी मार्गदर्शन करत असतात . यांचा फक्त एकच दोष आहे कि हे जे काही त्यांच्या मुलांसाठी निवडतात त्यात हे त्यांच्याकडून पूर्णत्वाची आशा ठेवतात .

आईच्या रुपात:
आईच्या रूपात मिथुन राशीच्या महिला खूप मऊ हृदयाच्या आणि त्यांच्या मुलांची जवळीक ठेऊन असतात . आणि कडक आई वडिलांसारखे व्यवहार करण्यापेक्षा ते त्यांच्या मुलांना स्वतंत्रता देण्यावर जास्त विश्वास ठेवतात . त्याच्यामुळे ते त्यांच्या जीवनाचा रास्ता स्वतःच निवडू शकतील ,आणि ती स्वतः त्यांचा मित्र बनून त्यांच्या जवळ राहणे तिला आवडते . जस कि मिथुन राशीच्या वडिलांच पण असत . जरी ती एक काम करणारी स्त्री असली तरी ती त्यांच्या मुलांना पुरेपूर वेळ देते आणि त्यांच्या अभ्यास ,खेळ आणि त्यांच्या आवडी निवडींकडे दुर्लक्ष करत नाही . ती त्यांच्या मुलांचा चहू बाजुंनी विकास करू इच्छिते .

मुलांच्या रुपात:
मिथुन राशीचे बालक खूप स्वतंत्र असतात असे गणेश म्हणतात . हे लोक एकाच गोष्टीवर किंवा एकाच मित्रावर सीमित नाही राहू शकत . जर यांच्या आई वडिलांचे विचार रूढीवादी असले आणि लवचिक नसले तर यांना सांभाळणे खूप कठीण होऊन जाते . हे बालक त्यांच्या आई वडिलांचा सन्मान करतात ,त्यांच्या आई वडिलांशी प्रेम करतात . पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या जीवनात हस्तक्षेप नाही करावा असं त्यांना वाटते . हे आपल्या आई वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि विरोध पण करत नाही . परंतु त्यांना जे योग्य वाटते ते तेच करतात.

मालकाच्या रूपातः   
एका मालकाचा स्वरूपात मिथुन राशीचे  लोक हे शांत आणि उदारवादी असतात असे श्री गणेश सांगतात. हे फार कठोर मालक नसतात. हे सर्व विभागात सर्वांशी प्रेमाने आणि एकत्र येऊन काम करण्यावर विश्वास करतात. कमला भरपूर मजेदार आणि मन लावून करण्याचा प्रयत्न करतात. हे तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करतात ज्यातून आपल्या कर्मचाऱ्यांना कुशल बनून काम करण्याचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्या पेक्षा लहान व्यक्तींना पूर्ण पाने स्वतंत्र देतात परंतु जबाबदारीने चांगली कामाची विचारपूस करतात.

मित्राच्या रुपात:
हे चांगले  मित्र  बनतात . हे आपल्या सर्कल मधील प्रत्तेकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे प्रत्येकाचा चांगला मित्र बनण्याचा प्रयत्न करतात . त्यांना प्रत्येकाच मन जिंकायचं आहे आणि समूहामध्ये आकर्षण बनायचं आहे . आणि यांचं मन प्रेमाने विश्वासात राहत . हे मित्री मध्ये दुसऱ्यांचे कौतुक करण्यात मागे राहत नाही . आणि हे कधीच गरजेच्या वेळी दूर उभे राहत नाही . हे नेहमी चांगले संबंध बनवून ठेवतात आणि म्हणून बरेच मित्र त्यांच्या आसपास राहतात .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा