विवरण मकर

मकर राशीचे विवरण

मकर राशीचे जातक मेहनती, कार्याला वाहून घेणारे आणि प्रामाणिक, विश्वासू असतात. त्यांचा स्वामी ग्रह शनि आहे, त्यामुळे ते शिस्तप्रिय असतात. ह्या राशीच्या व्यक्ती जे कार्यक्षेत्र निवडतील, त्यात त्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होतात. ह्या व्यक्ती अतिशय सावधपणे आणि ठाम विचाराने पुढे वाटचाल करतात.

स्वतःच्या विचाराबद्दल, दृष्टिकोणाबद्दल ते नेहमी सजग असतात. स्वतःची प्रगती व्हावी आणि आपल्याकडे समृद्धी यावी म्हणून यासाठी ते कठोर परिश्रम करतात आणि कोणत्याही सोप्या, जवळच्या मार्गाने यश मिळवण्यास ते नकार देतात. ह्या व्यक्ती कठोर आणि ढोंगी आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जातो परंतु वस्तुस्थिती अशी असते की ते अतिशय विनम्र असतात आणि त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ असतात. ह्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू पाहिली की त्यांच्या मनातील प्रेम आणि इतरांबद्दल त्यांच्या मनात असलेली काळजी आपल्याला दिसू शकते. आपल्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी  पोचण्यासाठी आणि स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी ह्या व्यक्ती सुट्टीच्या दिवशीही काम करण्यास तयार असतात. ह्यांच्या मनातील जबाबदारीची भावना आणि दृढ संकल्प इतरांना अतिशय हवेसे वाटणारे असतात. कोणतीही अडचण असली तरी ह्या व्यक्ती त्यातूनही मार्ग काढतात. मकर जातक अतिशय व्यावहारिक असतात आणि आपले ध्येय साधण्यासाठी हट्टी म्हणावे इतक्या टोकाला जाण्याचीही त्यांची तयारी असते. स्वतःच्या कठोर परिश्रमांचे फळ म्हणून त्यांना प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि धनलाभ मिळतात.

मेहनती, प्रामाणिक, महत्वाकांक्षी, सहिष्णु , धैर्यवान आणि विश्वासू असे मकर जातक क्वचितच काही तडजोड करतात की ज्यामुळे त्यांच्या मेहनतीत काही कमतरता यावी. आपल्या शिस्तबद्ध वागणुकीने वाटेत येणाऱ्या सगळ्या अडचणींना सहन करत, तोंड देत स्वतःच्या व्यक्तित्वाशी जुळणारा, सहज असा मार्ग निवडतात. ह्या जातकांमध्ये कर्तव्यबुद्धी, नि:स्वार्थी वृत्ती आणि स्वीकृत कार्याप्रती भक्तिभाव असतो. निवडलेल्या ध्येयाप्रती त्यांच्या मनात वसणाऱ्या दृढ भावनेबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक होते. त्यांच्या अशा स्वभावामुळे त्या व्यक्ती लहरी आणि काहीवेळा स्वतःचे नुकसान करणाऱ्या होतात. परंतु त्यांच्या एकूण अनुभवरुपी संपत्तीमुळे ते लोकांच्या आदराला पात्र होतात.

त्यांचा स्वामी ग्रह शनि आध्यात्मिक वृत्तीचा आहे. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःसाठी उच्च मानदंड निर्माण करतात आणि स्वतःचे स्थान किंवा स्वतःचा वेळ इतर कोणाला देऊ करत नाहीत. ते स्वतःच्या कार्यासाठी अशा प्रकारे वेळ काढतात, त्यावरून त्या व्यक्ती स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य ह्या गोष्टी पूर्णपणे स्वतंत्र ठेवतात असे आपल्याला कळून येते.

मकर राशीच्या व्यक्ती अजिबात घाईगडबड न करता, शांतपणे निर्णय घेणारे चतुर व्यापारी होऊ शकतात. आपल्या वैवाहिक जोडीदाराची योग्यता असली किंवा नसली तरीही त्याने आयुष्यात सफल व्हावे असे त्यांना वाटत असते. ह्या व्यक्ती शिक्षण, उद्योग, शेती, प्राचीन वस्तू  इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात.

आपल्या राशीचक्रातील ही सर्वात जास्त स्थिर रास आहे. ह्या राशीचे जातक आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षितता, आराम आणि चिरस्थायी पाठिंबा देतात. ह्या सर्वात जास्त भरवशाच्या व्यक्ती असतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा