प्रेम मकर

मकर राशीचे प्रेमव्यवहार

तत्व : पृथ्वी

गुण :
मूलभूत, स्त्रीत्व, नकारात्मक

स्वामी ग्रह : शनि
 
प्रेमात दिले जाणारे धडे : प्रामाणिकपणाने वागणे आणि जबाबदारी घेऊन पूर्ण करणे. आपल्या प्रिय व्यक्तींना आरामात जगता यावे ह्यासाठी साऱ्या
सुविधा मिळवून देणे. त्याचबरोबर हे सुद्धा खरे आहे की, वेगळ्या शब्दांत प्रेमाचा अर्थ ज्ञान आणि स्थैर्य आहे.

प्रेमात घेतले जाणारे धडे : प्रेमात बिनशर्त हार मानणे आणि निःस्वार्थ होणे.

व्यक्तित्व :
मनोमय शांतता मिळवण्यावर मकर राशीच्या जातकांचा विश्वास असतो. कोणावरही अवलंबून राहाणे त्यांना दोषपूर्ण वाटते. मकर राशीचे जातक मनापासून, गंभीरपणे आणि कठोरपणे केलेल्या परिश्रमावर विश्वास ठेवतात. पण यांच्या अंतर्यामाची ओळख तुम्हाला पटली, तर हे अगदी वेगळेच असल्याचे अनुभवास येते. ह्या व्यक्तींना धोकादायक मार्गाने न जाता ओळखीच्या, मळलेल्या वाटेने जाणे आवडते. वाटेत येणाऱ्या प्रसंगांचा, घटनांचा आनंद घेत त्या व्यक्ती मार्गक्रमणा करत असतात. खुलून, मोकळेपणाने बोलायला ह्या व्यक्ती थोडा वेळ घेतात. ह्यांच्या दृष्टीने सुरक्षितता सर्वात जास्त महत्वाची असल्याने ह्या व्यक्ती भविष्यात उपयोगी पडावे म्हणून अगदी मनापासून धन जोडत असतात. परंतु धन किंवा प्रसिद्धी मिळवणे ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च प्राथमिकतेच्या बाबी कधीच नसतात. आपला अधिकार जाणवून द्यायला ह्या व्यक्ती मागेपुढे पाहात नाहीत पण दुसऱ्याच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ह्यांच्या मनात नकारात्मक विचार जोर धरू लागले की, की ह्या व्यक्ती निराश पण महत्वाकांक्षी होतात. अशा वेळी मात्र त्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीला सहज कबूल होत नाहीत, झाल्याच तर सशर्त कबूल होतात.

मकर राशीच्या दृष्टीने प्रेम :
परस्परांशी चांगलेपणाने वागल्याने आपसांतील नात्यांमध्ये सुरक्षितता, शांतता आणि आनंद निर्माण होतात. सर्वसाधारणपणे प्रचलित असलेल्या समजुतीच्या विरुद्ध  ह्या सगळ्यांपेक्षा प्रेम जास्त महत्वाचे आहे. हे मान्य आहे की, हे सगळे बोलणे परस्परसंबंध आणि जबाबदाऱ्या यांच्याबद्दल आहे, पण हेच सगळे संवेदनशीलता आणि स्थैर्य यांनाही तितकेच लागू आहे. मकर राशीचे जातक बाहेरून कठोर वाटत असले तरी अंतर्यामी ते कोमल, निर्मल  मनाचे असतात. आपल्या मनातल्या ह्या भावना ते लपवून ठेवतातच आणि मनातले प्रेमही स्पष्ट होऊ देत नाहीत. ह्यांच्या मनाला मोकळेपणाने प्रकट होण्याची संधी दिली तर त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल असलेला अविरत ध्यास आणि असीम आत्मविश्वास किती पराकोटीचा आणि शब्दांच्या पलीकडचा आहे, हे समोरच्या माणसाच्या प्रत्ययाला येऊ शकते. मकर राशीचा स्वामी शनि ह्या व्यक्तींच्या वाढत्या वयाबरोबर साफल्य, यश आणि मानसन्मान देतो. मकर राशीचे जातक वंशपरंपरागत यश आणि समृद्धीचे मालक नसतात तर स्वतःच्या श्रमांनी त्या व्यक्ती हे सगळे मिळवतात. मकर व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या परिवाराला खूपच महत्व असते. त्याचमुळे, ह्या व्यक्ती प्रेम करतात, तेव्हा त्यांनी समोरच्या व्यक्तीला मनोमन आपल्या परिवाराचा सदस्यच मानलेले असते.

प्रेमातील आचरण :
मकर राशीचे जातक भरवशाचे असून आणि दुसऱ्यांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो. प्रेमाच्या बाबतीत ह्या माणसांचे वागणे नियंत्रित, मोजूनमापून आणि विचारांना धरूनच असते. ह्या व्यक्ती भावनापतित होताना दिसत नाहीत. ह्यांच्यात शांतपणा आणि मनाचे औदार्य असून त्याबरोबरच मकर व्यक्ती दुसऱ्यांचेही मत समजून घेण्याचा प्रयत्न करतात. असे असूनही त्यांच्यावर स्वार्थी आणि कठोर असल्याचे आरोप केले जातात. पण, ह्या व्यक्ती स्वतःच्या इच्छांच्या बाबतीतही स्पष्टपणे बोलत नाहीत. ह्यांचे व्यक्तिमत्व फुललेले असते, पण ते एखाद्या खोल भुयारात तेथील फुलझाडांना बहर यावा आणि त्या फुलझाडांखाली प्रियकर आपल्या प्रेमिकेची वाट पाहात असावा, तसे असते. वरवर पाहता असे वाटते की, ह्या व्यक्ती कठोर परंपरावादी आणि स्वतःच्या सामाजिक स्थानाबद्दल फारच काळजी घेणाऱ्या आहेत. पण ह्या व्यक्तींशी प्रत्यक्ष बोलणेचालणे झाल्यावर असे अनुभवास येते की, त्या फारच मनोरंजक आहेत. ह्यांची तिरके बोलण्याची, टोमणे मारण्याची सवय मजेशीर वाटते पण काही वेळा तिचा त्रासही होऊ शकतो. प्रत्येक बाबतीत उच्च गुणवत्तेचा मापदंड वापरण्याची सवय ह्यांच्या सहकाऱ्यांना नकोशी वाटू शकते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा