संबंध मकर

मकर राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात
गणेशजी म्हणतात की, मकर व्यक्ती प्रेमिक असल्या तरीही गंभीरपणा त्यांना सोडून जात नाही. त्यांचे प्रेम फुलण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. ते कधी आवेगात वाहून जात नाहीत. प्रेमात ते हळूहळू पावले टाकत जातात. ते बोलघेवडे नसतात, पण त्यांच्या वागण्यातून त्यांच्या मनातील प्रेम प्रत्ययाला येत जाते. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्ती काहीही करू शकतात. मोकळ्या मनाने भेटवस्तू देतात आणि पार्ट्यांवरही सहजपणे खर्च करतात.

पित्याच्या  रुपात
गणेशजी म्हणतात की, एक पिता म्हणून ह्या व्यक्ती आपल्या मुलांशी कठोरपणे वागतात. व्यवसाय आणि आपल्या मुलांना वाढवणे ह्या बाबतीत ते फार काळजी करतात. स्वतःच्या मुलांकडून ह्यांच्या मनात फारच अपेक्षा असतात आणि मुलांना फारसे स्वातंत्र्य देण्याविरुद्ध मताचे ते असतात. त्यामुळे मुलांच्या मनात आपल्या वडिलांबद्दल गैरसमज निर्माण होतात आणि ती वडिलांपासून मनाने दूर जातात.

आईच्या रुपात
एक आई म्हणूनही मकर राशीच्या स्त्रिया आपल्या मुलांच्या बाबतीत खूप कठोरपणे वागतात, असे गणेशजींचे म्हणणे आहे. अर्थात, त्यांच्या मनातील उद्देश चांगलाच असतो. आपली मुले योग्य मार्गाने जावी, जबाबदार नागरिक व्हावी आणि त्यांची कारकीर्द चांगल्या प्रकारे बहरास यावी, त्यांना मानसन्मान मिळावा अशी त्यांची इच्छा असते. इतक्या कडक शिस्तीने मुलांना वागवल्यामुळे आई व मुलांमध्ये दुरावा निर्माण होतो. खरेतर, त्यांनी शांतपणे वागण्याची
गरज असते.

मुलांच्या रुपात
आपल्या बालपणी ही मुले अतिशय शांत असतात आणि त्यांचा विकास व्यवस्थित होण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याशी मोकळेपणाने व मित्रवत वागण्याची आवश्यकता असते. मुले म्हणून ह्या व्यक्ती आपले कुटुंब आणि आईवडिलांशी प्रेमाने वागतात आणि त्यांना योग्य तो मान देतात. पण असे होऊ शकते की, ह्या सगळ्या भावना ती मुले सहजपणे व्यक्त करू शकत नाहीत. ही मुले अतिशय मेहनती असतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला भरपूर मानसन्मान मिळवून देतात.

मालकाच्या रुपात
एक मालक म्हणून ह्या व्यक्ती अतिशय कठोर असतात आणि आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामे वेळेत पूर्ण केली जावी ह्याचा ते आग्रह धरतात. वेगाने होणाऱ्या तांत्रिक प्रगतीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य वाढत राहावे असे त्यांना वाटते. त्यांच्या कौशल्याचा आपल्या संस्थेच्या कामकाजात ते उपयोग करून घेतात. ह्या व्यक्ती कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय होऊ शकत नाहीत. कर्मचाऱ्यांना फारसे स्वातंत्र्य देण्याकडे ह्या व्यक्तींचा कल नसतो.  

मित्राच्या रुपात
गणेशजी म्हणतात की, एक मित्र म्हणून मकर राशीचे जातक प्रामाणिक आणि मनाचा सच्चेपणा असणारे असतात. मित्रांना गरज असेल तेव्हा त्यांना  मदत करण्याचा ह्या व्यक्ती प्रयत्न करतात. ह्यांना फारसे मित्र नसतात, पण जे असतात ते अगदी जिवलग मित्र असतात. ह्या व्यक्ती फारशा बोलणाऱ्या नसल्यामुळे त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात गैरसमज निर्माण होतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा