स्वभाव मकर

मकर राशीचा स्वभाव

मकर राशीचा स्वभाव
आपल्या राशीचे प्रतीक बकरी आहे आणि एखाद्या पहाडी बकऱ्याप्रमाणेच आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक उच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असता, म्हणजेच आपण अतिशय महत्वाकांक्षी आहात. आपण जे उच्च ध्येय गाठण्याचा निश्चय केला असेल, ते ध्येय आपण नक्कीच गाठाल, याबद्दल आपल्या मनात पूर्ण विश्वास असतो. ही गोष्ट आपल्याला फार सुखदायक वाटते आणि त्याच कारणामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल खूप आदर असतो. ह्या राशीचा जातक धोका पत्करण्यास कधीच घाबरत नाही, पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की तो बेपर्वा किंवा अविचारी असतो. ह्या राशीच्या जातकाने आपल्या सगळ्या कामाचे व्यवस्थित पूर्वनियोजन केलेले असते. स्वतःच्या नियोजनाची कार्यवाही करण्याअगोदर तो त्या योजनेचा सर्वांगांनी अभ्यास करतो. त्याचे प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकलेले असते. ह्या जातकाच्या नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होत जाते. आपण अतिशय स्वार्थी असण्याची शक्यता असते. आपल्यामध्ये अपार बळ असावे, त्यानुसार आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राचे नेतृत्व आपल्याकडे यावे आणि आपल्याला उच्च सामाजिक दर्जा मिळावा अशी प्रबळ इच्छा आपल्या मनात वास करत असते. ह्या राशीचा जातक शांत आणि शालीन दिसू शकतो. मनोमन तो अतिशय भावुक असू शकतो. आपल्यातील स्वयंप्रेरणा आपल्याकडून कार्य करून घेते आणि आपण नेहमीच योग्य संधीच्या शोधात असता. आपण पूर्ण एकाग्रतेने कार्य करू शकता.

स्वामी ग्रह: शनि
शनि ग्रह ' सैतान ' ह्या शब्दाशी बराचसा जोडला गेला आहे. हा ग्रह मर्यादा आणि बंधनांचे प्रतीक आहे. ह्या मर्यादांमुळे जर आपण अपयशी होत असलात तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तर्क आणि इतर कशाच्यातरी प्रभावाखाली असण्यामुळे कालापव्यय करत आहात. पण जर आपण आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करत असलात तर आपल्याला ते ज्ञान नक्की मिळेल. हे ज्ञान सगळ्या लौकिक व्यवहाराच्या पलीकडचे असते. मकर राशीचा स्वामी शनि ह्या गोष्टीची काळजी घेतो की, जातकाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ नक्की मिळेल. आयुष्यात कोणताही अयोग्य मार्ग जवळचा आहे म्हणून स्वीकारलात तर काही काळाने आपण नक्कीच गोत्यात येता. परंतु आपले वागणे न्यायाला धरून असले तर त्याचे मधुर फळ आपणास नक्की मिळेल.

दहावे स्थान : व्यवसाय, कारकीर्द
पत्रिकेतील दशम भाव पित्याचे स्थान असून हे स्थान जातकाचे काम आणि व्यवसायही दर्शवते. समाजाचे आपल्याबद्दल काय मत आहे ही गोष्टही ह्याच स्थानावरून कळते. ह्या राशीच्या जातकाला अंतर्ज्ञान असते. आपले सामाजिक स्थान आणि आपल्यासाठी योग्य व्यवसाय ह्यांची माहिती आपणाला दशम स्थानावरून कळते.

तत्व: पृथ्वी
ही रास पृथ्वी तत्वाची आहे. व्यावहारिक वृत्ती हा ह्या राशीचा विशेष आहे. ह्या राशीचा जातक व्यवहारी असतो परंतु त्याच्यात सहजता कमी असते. आपले सगळे वागणे पूर्वनियोजित असते. आपणास अपयश सहन करणे फार कठीण जाते. प्रत्येक बाबीत स्वतःला यश मिळालेच पाहिजे, ह्यादृष्टीने आपण कार्य आणि प्रयत्न करता. एखादी गोष्ट समोर दिसल्याशिवाय, त्या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाल्याशिवाय आपला त्यावर विश्वास बसत नाही. ज्या गोष्टी व्यवस्थित तपासलेल्या असतील, त्यांच्यावरच आपला विश्वास बसतो. प्रत्यक्ष व्यवहारात जे काही घडेल, तेच आपल्याला पटते, आवडते. निव्वळ आदर्शवादाचा आपण तिरस्कार करता. असे होण्याचे कारण हे आहे की आपण पृथ्वीशी जोडले गेले आहात. इतर लोकही आपल्या मताला महत्व देतात.

शक्ति
स्वीकारलेल्या मार्गावरून आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण धीरोदात्तपणे वाटचाल करत राहाता. अपयशाचा आपल्या मनावर परिणाम होत नाही. मनाजोगते यश मिळेपर्यंत आपण प्रयत्न थांबवत नाही. मकर राशीचा जातक विसंबून राहाण्याजोगा, धैर्यवान आणि प्रामाणिक असतो. अडचणी पार करून जाण्याची क्षमता आपल्याला मानसिक ताकद देते.

कमतरता
मकर राशीच्या जातकाचा स्वभाव, वागणे निःसंदिग्ध असले तरी त्याच्यातही काही नकारात्मक बाबी आढळतातच. तो बऱ्याचदा स्वार्थीपणे वागतो. ज्यात त्याचा स्वार्थ साधला जाणार नसेल, असे काम तो क्वचितच हाती घेतो. काहीही करून स्वतःचे ध्येय गाठण्याच्या त्याच्या इच्छेमुळे किंवा वृत्तीमुळे तो बऱ्याचदा क्रूर म्हणावे असे वागतो आणि इतरांवर अत्याचार करतो असे म्हटले तरी चालेल. तो पूर्णपणे संवेदनाविहीन, भावनाशून्य होऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा