गोष्टी मकर

मकर राशीच्या जातकाची जीवनशैली

मकर राशीच्या जातकांचा आहार :
मकर राशीच्या जातकांच्या आहारविषयक सवयी आरोग्यदायक असतात. त्या व्यक्ती आपले जेवण वेळेवर घेतात. जेवताना इतर कोणत्याही गोष्टींनी ते विचलित होत नाहीत. त्यांना पौष्टिक आहार घेणे आवडते, उदाहरणार्थ - अंजीर, पालक, दूध, आंबट चवीची फळे, अंडी, कडधान्ये, गव्हापासून केलेला पाव, हातसडीच्या तांदुळाचा भात आणि मासे. मकर राशीची माणसे चाकोरीबद्ध आयुष्य जगतात आणि रोज एकाच प्रकारचा आहार घेणे त्यांना जमते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. मकर राशीचा अंमल हाडांवर आणि दातांवर असतो. म्हणून ह्या राशीच्या जातकांनी दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पानांच्या भाज्या असे भरपूर कॅल्शियम असलेले पदार्थ आपल्या आहारातून घ्यावे.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
मकर राशीच्या  जातकांचे शरीर सुंदर, सुडौल असून त्यांची त्वचा हळुवार, गुळगुळीत असते. भुवया बाकदार व लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. वरचा ओठ पातळ असून हनुवटी रेखीव असते. त्यांची उंची सरासरीहून कमीच असते. डोळे खोल असून त्यांच्यात गंभीरपणा असतो. ह्या व्यक्ती सावकाश व प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतात. एखाद्या दार्शनिकासारखी किंवा वैज्ञानिकाप्रमाणे दिसणारी ही माणसे तटस्थ, संयमित, चारचौघांसारखी दिसतात. त्यांना व्यावहारिक बाबींची चिंता असू शकते. पण सौंदर्याला ही माणसे काही महत्व देत नाहीत.

सवयी :
ही माणसे अतिशय मेहनती असतात. स्वतःच्या कामासाठी ती माणसे  वैयक्तिक सुखावर निखारे ठेवण्यासही तयार होतात. अगदी स्वतःच्या कुटुंबाच्या सुखाचीसुद्धा पर्वा ही माणसे करत नाहीत. असे करण्यामागे गरिबीची व दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागण्याची भीती ही कारणे असतात.  झोपण्याची वेळ सोडून बाकीचा सगळा वेळ ही माणसे कामच करत असतात. त्यामुळे ह्यांना इतर कशाहीसाठी वेळ मिळत नाही. मकर राशीचा जातक भौतिकतावादी नसतो. स्वतःच्या जेवणखाणाकडेही त्याचे लक्ष नसते. ह्याचा त्याच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होतो.

स्वास्थ्य:

ह्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे म्हातारपणातही त्यांची तब्येत चांगलीच असते. खरेतर, ह्यांचे वय जसजसे वाढत जाईल, तसतशी ह्यांची तब्येत अधिकाधिक ठणठणीत होत जाते. मकर राशीचे जातक असलेली प्रौढ माणसे आश्चर्यकारक म्हणता येतील अशा व्यक्तिमत्वाची असतात. परंतु, ह्यांच्या शरीरातील विशेषकरून गुडघे आणि हाडे कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यांना सर्दी, सांधेदुखी, मुतखडा, पचनाचे विकार, काही चर्मरोग ह्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. ह्या व्यक्तींनी पोटभर आणि अतिपौष्टिक अन्न तसेच मद्यपान यांच्यापासून दूर राहावे.

सौंदर्य:
मकर राशीच्या व्यक्तींची शरीररचना सुडौल आणि मजबूत असते. त्यामुळे रस्त्यातून जाताना वळून त्यांच्याकडे पाहावे असे इतरांना वाटू शकते. डेनिमचे आणि अगदी अंगाबरोबर बसणारे कपडे ह्या व्यक्तींनी घातले तर ती माणसे अधिक सुंदर दिसतात. ह्या व्यक्तींनी सुरकुत्या नाहीशा करणारे क्रीम मानेला लावावे आणि पावलांना व पायांच्या तळव्यांना पेडीक्युअर करून घ्यावे. इतरांना स्वतःकडे आकर्षून घेण्याची इच्छा ह्या व्यक्तींच्या मनात फार असते. ते साधण्यासाठी त्यांनी उठून दिसणारे चमकदार तपकिरी रंगाचे लिपस्टिक आणि नेलपॉलिश वापरावे. मकर राशीच्या व्यक्ती जरा नखरेबाज असतात. पण बाहेर फिरायला गेल्यावर ह्या व्यक्ती सुंदर दिसू लागतात. ह्यांना परंपरागत पद्धतीचा पेहराव आवडतो. ह्यांना दागिन्यांची फारशी आवड नसते. कुटुंबात पिढ्यानपिढ्या वापरले गेलेले दागिने मात्र त्यांना आवडतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा