नक्षत्रे मकर

मकर राशीतील नक्षत्रे

उत्तराषाढा नक्षत्र :
विश्वेदेव नावाचे तेरा देव ह्या नक्षत्राचे देव असून रवि त्याचा स्वामी आहे. ह्या राशीचे सगळे गुण ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकात पहावयास मिळतात. ह्या व्यक्ती उत्साही असून त्यांच्यात स्वार्थ फार थोडा असतो. त्यांना पटापट प्रगती करण्याची इच्छा असते. त्यांच्यात स्वार्थाच्या जोडीनेच परमार्थ साधण्याचीही  इच्छा असते. भविष्याकडे लक्ष ठेवून वर्तमानकाळातच ह्या व्यक्ती थोडीथोडी पुंजी साठवत असतात. स्वतःचा जोडीदार स्वतःच्या पसंतीने निवडतात.

श्रवण नक्षत्र :
विष्णू ह्या नक्षत्राची देवता असून चंद्र स्वामी आहे. ह्या राशीत ह्या नक्षत्रावर जन्म घेणाऱ्या जातकांमध्ये ह्या राशीचे दुर्गुण आढळतात. त्यांचा चेहरा आकर्षक असतो. त्या व्यक्ती शांतताप्रिय, धार्मिक वृत्तीच्या आणि सिद्धांतवादी असतात. इंजिनिअरींग आणि तंत्रज्ञान  ह्या क्षेत्रात काम करण्यात कुशल असतात. त्यांचे कौटुंबिक जीवन साधेसरळ असते.

धनिष्ठा नक्षत्र :
वसू ही ह्या नक्षत्राची देवता असून नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांमध्ये उत्साहीपणा भरपूर असतो. त्यामुळे कोणतेही कार्य करण्यास ह्या व्यक्ती सदा तयार असतात. त्यांच्यात स्वार्थीपणा कमी असतो. शारीरिक सुख मिळवण्याचा त्यांना सतत ध्यास लागलेला असतो.     

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा