व्यावसायिक मकर

मकर : व्यावसायिक रूपरेखा

मकर राशीचा जातक स्वतःची व्यावसायिक कारकीर्द सुरु करतो, तेव्हा त्याच्यासाठी ते एक महत्कार्य असते. त्या कार्याची परिपूर्ती व्हावी, ह्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. अगदी पहिल्या पायरीपासून काम सुरु करून आपल्या पद्धतीने काम करत पुढे जात शेवटी त्या कार्याची संपादणी करणे अशी ह्याच्या कामाची पद्धत असते. खरेतर, संघर्ष करत पुढे जाण्यात ह्या व्यक्तींना अभिमान वाटतो आणि त्यातून मिळालेल्या यशाचे मोल त्यांच्यालेखी फार असते. अडचणी किंवा दुःख नसले तर काहीच हाती लागत नाही, असे ह्या व्यक्तींना वाटते.
 
हाती असलेल्या नोकरीत त्यांना कमी मेहनताना मिळत असला तरी त्यामुळे त्यांना त्याचे काही वाटत नाही. त्या व्यक्ती आपले काम मन लावून आणि प्रामाणिकपणे करत राहातात. त्यांना असेच वाटत असते की, त्यातूनच त्यांचे भले होणार आहे. राशीचक्राच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्यांचे वर्तन पित्याप्रमाणे असते. समग्र व्यवस्थेत ते एखाद्या महत्वाच्या यंत्राप्रमाणे काम करत असतात. पण जर त्यांना आपल्या कामात विशेष महत्व मिळाले नाही, तर मात्र त्या व्यक्ती हाती असलेले ते काम फार काळ करत नाहीत.

ही माणसे इतकी महत्वाकांक्षी असतात की, आपली स्वप्ने साकार होण्यासाठी ती माणसे न थकता काम करतच राहातात. असे असले तरी अधिकार, सुस्थिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षितता देणाऱ्या पारंपारिक क्षेत्रातीलच काम ह्या माणसांना पसंत असते. नवी वाट चोखाळण्यापेक्षा मळलेल्या वाटेवरून चालणे ह्यांना आवडते. आर्थिक सुरक्षितता धोक्यात येणाऱ्या क्षेत्रात काम करणे ह्या व्यक्तींना नको असते. मकर जातक धोका पत्करतात पण तसे
करताना भावनेच्या भरात वाहून न जाता ते नीट विचार करूनच निर्णय घेतात.
 
मकर जातकाच्या अंगी असलेली वागण्यातली शिस्त, त्यांची कामात झोकून देण्याची व परिश्रम करण्याची वृत्ती ह्या गुणांसाठी त्यांचे नेहमीच कौतुक केले जाते. मकर राशीच्या जातकाचा व्यवसाय किंवा नोकरी कशीही असली तरी त्यांची स्वतःच्या कामाबद्दल बांधिलकी, धीरोदात्तपणा हे फारच उच्च दर्जाचे असतात. कधी काळी बिकट परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली, तर मकर जातकाचे सगळे सहकारी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळण्यासाठी ह्याच व्यक्तीवर अवलंबून राहातात आणि मकर जातक त्यांच्या ह्या अपेक्षा नेहमीच पूर्ण करतात.

स्वतःच्या कारकिर्दीला चांगला आकार यावा म्हणून मकर व्यक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यापायी स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आणि सगळी नातीगोतीही पणाला लावण्याची त्यांची तयारी असते. त्यांचे शरीर कधी विश्रांती घेत असले तरी त्यांचे मन आणि बुद्धी मात्र हातातील कामाचाच विचार करत असतात. ह्या विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तींनी स्वतःचे आयुष्य आणि व्यावसायिक आकांक्षा ह्यांच्यात योग्य ताळमेळ ठेवायला शिकणे गरजेचे असते. आपल्या परिवारासाठी आणि स्वतःसाठीसुद्धा हा ताळमेळ आवश्यक असतो, हे त्यांना लवकरच कळून चुकते.

आपण आपला वेळ आणि पैसा ह्यांचा उपयोग कसा करावा, हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मकर जातकांना लवकरच कळून चुकते. आपल्या विश्लेषणात्मक आणि जिज्ञासू मनाच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या साहाय्याने ते अर्थ, प्रबंधन, बँकिंग, अकाउंटिंग, कायदा आणि प्रशासन ह्या क्षेत्रात चांगले यश मिळवू शकतात. विज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रातही ह्या व्यक्तींना चांगले यश मिळू शकते. वृत्तपत्र, पत्रकारिता, जाहिरात, कला यांच्यासारख्या रचनात्मक क्षेत्रातही त्यांना चांगले कार्य करता येऊ शकते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा