मकर राशीसाठी विशेष ऑफर

मकर कुंडली

मकर दैनिक राशि फल19-09-2021

आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर...अधिक

मकर साप्ताहिक राशिफल 19-09-2021 - 25-09-2021

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक देवाण - घेवाण होऊ शकेल. आपण बँकेतील... अधिक

मकर मासिक राशिफलSep 2021

हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या तीव्र...अधिक

मकर वार्षिक राशिफल2021

मकर राशीच्या जातकांना २०२१ चे वर्ष एकदम चांगलेच जाणार आहे. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपली प्रगती साधण्याची इच्छा...अधिक

मकर राशिचक्र चिन्हे

मकर राशीचे विवरण

मकर राशीचे जातक मेहनती, कार्याला वाहून घेणारे आणि प्रामाणिक, विश्वासू असतात. त्यांचा स्वामी ग्रह शनि आहे, त्यामुळे ते शिस्तप्रिय असतात. ह्या राशीच्या व्यक्ती जे कार्यक्षेत्र निवडतील, त्यात त्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होतात. ह्या व्यक्ती अतिशय सावधपणे आणि ठाम विचाराने पुढे वाटचाल करतात.

मकर राशीबद्दल जाणून घ्या

संस्कृत नाव : मकर, नावाचा अर्थ : बकरा, प्रकार : पृथ्वी, मूलभूत, नकारात्मक, स्वामि ग्रह : शनि, शुभ रंग : तपकिरी, राखाडी, काळा
शुभ वार : शनिवार
अधिक जाणून घ्याः मकर

मकर राशीचा स्वभाव

मकर राशीचा स्वभाव
आपल्या राशीचे प्रतीक बकरी आहे आणि एखाद्या पहाडी बकऱ्याप्रमाणेच आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक उच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असता, म्हणजेच आपण अतिशय महत्वाकांक्षी आहात. आपण जे उच्च ध्येय गाठण्याचा निश्चय केला असेल, ते ध्येय आपण नक्कीच गाठाल, याबद्दल आपल्या मनात पूर्ण विश्वास असतो. ही गोष्ट आपल्याला फार सुखदायक वाटते आणि त्याच कारणामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल खूप आदर असतो. ह्या राशीचा जातक धोका पत्करण्यास कधीच घाबरत नाही, पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की तो बेपर्वा किंवा अविचारी असतो. ह्या राशीच्या जातकाने आपल्या सगळ्या कामाचे व्यवस्थित पूर्वनियोजन केलेले असते. स्वतःच्या नियोजनाची कार्यवाही करण्याअगोदर तो त्या योजनेचा सर्वांगांनी अभ्यास करतो. त्याचे प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकलेले असते. ह्या जातकाच्या नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होत जाते. आपण अतिशय स्वार्थी असण्याची शक्यता असते. आपल्यामध्ये अपार बळ असावे, त्यानुसार आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राचे नेतृत्व आपल्याकडे यावे आणि आपल्याला उच्च सामाजिक दर्जा मिळावा अशी प्रबळ इच्छा आपल्या मनात वास करत असते. ह्या राशीचा जातक शांत आणि शालीन दिसू शकतो. मनोमन तो अतिशय भावुक असू शकतो. आपल्यातील स्वयंप्रेरणा आपल्याकडून कार्य करून घेते आणि आपण नेहमीच योग्य संधीच्या शोधात असता. आपण पूर्ण एकाग्रतेने कार्य करू शकता.

मकर : व्यावसायिक रूपरेखा

मकर राशीचा जातक स्वतःची व्यावसायिक कारकीर्द सुरु करतो, तेव्हा त्याच्यासाठी ते एक महत्कार्य असते. त्या कार्याची परिपूर्ती व्हावी, ह्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. अगदी पहिल्या पायरीपासून काम सुरु करून आपल्या पद्धतीने काम करत पुढे जात शेवटी त्या कार्याची संपादणी करणे अशी ह्याच्या कामाची पद्धत असते. खरेतर, संघर्ष करत पुढे जाण्यात ह्या व्यक्तींना अभिमान वाटतो आणि त्यातून मिळालेल्या यशाचे मोल त्यांच्यालेखी फार असते. अडचणी किंवा दुःख नसले तर काहीच हाती लागत नाही, असे ह्या व्यक्तींना वाटते.

मकर राशीचे प्रेमव्यवहार

तत्व : पृथ्वी

गुण :
मूलभूत, स्त्रीत्व, नकारात्मक

स्वामी ग्रह : शनि

मकर राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात
गणेशजी म्हणतात की, मकर व्यक्ती प्रेमिक असल्या तरीही गंभीरपणा त्यांना सोडून जात नाही. त्यांचे प्रेम फुलण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. ते कधी आवेगात वाहून जात नाहीत. प्रेमात ते हळूहळू पावले टाकत जातात. ते बोलघेवडे नसतात, पण त्यांच्या वागण्यातून त्यांच्या मनातील प्रेम प्रत्ययाला येत जाते. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्ती काहीही करू शकतात. मोकळ्या मनाने भेटवस्तू देतात आणि पार्ट्यांवरही सहजपणे खर्च करतात.

मकर राशीतील नक्षत्रे

उत्तराषाढा नक्षत्र :
विश्वेदेव नावाचे तेरा देव ह्या नक्षत्राचे देव असून रवि त्याचा स्वामी आहे. ह्या राशीचे सगळे गुण ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकात पहावयास मिळतात. ह्या व्यक्ती उत्साही असून त्यांच्यात स्वार्थ फार थोडा असतो. त्यांना पटापट प्रगती करण्याची इच्छा असते. त्यांच्यात स्वार्थाच्या जोडीनेच परमार्थ साधण्याचीही  इच्छा असते. भविष्याकडे लक्ष ठेवून वर्तमानकाळातच ह्या व्यक्ती थोडीथोडी पुंजी साठवत असतात. स्वतःचा जोडीदार स्वतःच्या पसंतीने निवडतात.

मकर राशीच्या जातकाची जीवनशैली

मकर राशीच्या जातकांचा आहार :
मकर राशीच्या जातकांच्या आहारविषयक सवयी आरोग्यदायक असतात. त्या व्यक्ती आपले जेवण वेळेवर घेतात. जेवताना इतर कोणत्याही गोष्टींनी ते विचलित होत नाहीत. त्यांना पौष्टिक आहार घेणे आवडते, उदाहरणार्थ - अंजीर, पालक, दूध, आंबट चवीची फळे, अंडी, कडधान्ये, गव्हापासून केलेला पाव, हातसडीच्या तांदुळाचा भात आणि मासे. मकर राशीची माणसे चाकोरीबद्ध आयुष्य जगतात आणि रोज एकाच प्रकारचा आहार घेणे त्यांना जमते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. मकर राशीचा अंमल हाडांवर आणि दातांवर असतो. म्हणून ह्या राशीच्या जातकांनी दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पानांच्या भाज्या असे भरपूर कॅल्शियम असलेले पदार्थ आपल्या आहारातून घ्यावे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा