विवरण कर्क

कर्क राशीचे विवरण

कर्क राशी हि राशी चक्रातील चौथी राशी आहे . ह्या राशी मध्ये जन्माला आलेली लोक हि आपल्या घरावर , आपल्या मुळांशी , आपल्या घरट्यावर मनापासून प्रेम करतात . संपूर्ण राशी चक्रात सर्वात जास्त सहानुभूती दाखवणारे चिन्ह कर्क आहे ज्याचे प्रतीक खेकडा आहे . ते खूप  संवेदनशील आणि भावनिक आहेत आणि आपले घर आणि कुटुंबा सोबत सर्व सुखसोई असल्यामुळे  खूप आनंदी आहेत . आणि घरगुती कामात जेव्हा हे शांत असतात , तेव्हा ते आपल्या सर्वोत्तम कामगिरी करतात .

आपल्या मूळ स्वभावानुसार कर्क राशीचे लोक हे खूप आत्मीयता असलेले असतात तसेच त्यांची प्रवृत्ती सहज असते आणि ते स्वाभाविक ज्ञानाने परिपूर्ण असतात . ते एकत्र कुटुंब पद्धतीसाठी इच्छुक असतात त्याचसोबत ते इतरांना रक्षण देतात . हे जिथे जातात तिथे आपल्यासाठी महाल बनवतात . यांना यात्रा करायला आवडते पण घरापासून जास्त दूर आणि जास्त वेळ जाण यांना आवडत नाही , कारण त्यासाठी त्यांना घरापासून दूर राहावं लागत . हे उद्यानामध्ये किंवा पिकनिकला जाऊनच आनंदी होतात . हे आपल्या कुटुंबावर आणि आपल्या परंपरांवर प्रेम करतात . सामाजिक कार्यात ते स्वखुशीने सहभागी होतात . ह्यांच्यात देशभक्ती कुटकुटून भरलेली असते , हे देशावर मनापासून खूप प्रेम करतात .

हे लोक भावनिक असतात . हे भावनांना अतिशय योग्य प्रकारे व्यक्त करू शकतात तसेच इतरांच्या भावनांना समजू शकतात . निरर्थक संभाषणामध्ये यांना काहीच रस नसतो नसतो . हे फार मुडी , लाजाळू तसेच कित्येकदा ते लहान मुलांसारखे वागतात . परंतु त्यांचे लाजाळूपण आणि भित्रेपण हे त्यांचे रक्षा तंत्र आहे , जे त्यांना भावनिक दुःख आणि मनाच्या अशांती पासून वाचवते . कर्क राशीचे लोक हे कलात्मक , रचनात्मक असतात त्याचसोबत ते आपल्या स्वतःचे विचारांचे पालन करणारे असतात .

हे लोक खूप अंतर्मुखी स्वभावाचे असतात तसेच हे संवेदनशील लोक सहजासहजी लक्ष्यात नाही येत . हे लोक आपल्या भावनांना सहजतेने इतरांपासून लपवू शकतात . जो पर्यंत हे चांगल्या मूड मध्ये असतात तो पर्यंत ते खूप दयावान आणि मनमिळाऊ असतात पण जेव्हा कोणी यांना निरर्थक त्रास देतो तेव्हा यांचा व्यवहार कटू होतो . हे बऱ्याच वेळेस इतरांन सोबत खूप असंवेदनशील , कडक , उद्धट , मूडी वागतात पण यांचा संवेदनशील मित्रच हे समजू शकतो कि यांच्या अश्या व्यव्हारामागे त्यांची असुरक्षकतेची भावना असते . हे प्रशंसनीय , दयाळू , उदार , समजदार , सौम्य राहतात जर यांच्या आजूबाजूला सर्व काही चांगलं असेल.

यांची बुद्धि चाणाक्ष असते आणि हे कला, विक्री, मीडिया आणि कला प्रदर्शन क्षेत्रात नाव कमवात . संपत्ती आणि भौतिक फायदे त्यांना अत्यंत महत्वाचे आहेत तथापि हे आपले कमावलेले पैसे खर्च करण्यासाठी कंजूषपणा करतात पण जे पैसे त्यांना अनावधानाने भेटतात ते असे पैसे लगेच खर्च करतात.

हे त्यांच्या विरुद्ध स्वभावाच्या लोकांसोबत राहणे पसंत करतात , हे मजबूत आणि सफल लोकांकडे आकर्षित होतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा