प्रेम कर्क

कर्क राशीचे प्रेम संबंध

तत्व : पाणी
गुण : मूलभूत,  स्त्रीत्व,  नकारात्मक
स्वामी ग्रह : चंद्र
प्रेमात दिले जाणारे धडे: समर्पण, प्रेमळपणा आणि संवेदनशीलता, गुणवत्ता काळजी आणि पोषण
प्रेमात घेतले जाणारे धडे: हरण्याची आणि सोडून देण्याची क्षमता. आणि व्यवहारामध्ये मोकळेपणा.
व्यक्तित्व :
कर्क राशीच्या लोकांना बदल आवडतो , पण ते झालेल्या बदलाला घाबरतात. कर्क राशीचे लोक अनेक भावना व्यक्त करतात आणि यातल्या काही नवीन असतात तर काही खरे आणि काही खूप खोल असतात. हे आपल्या अद्वितीय संकल्पने सोबत दुसऱ्यांचे निरीक्षण करतात आणि त्याच्या अनुसार ते आपली महान वृत्ति आणि आपले अंतर्ज्ञान अभिप्रेत करतात.  नाराज कर्क राशी चे लोक विलंब आणि संभ्रमात राहतात. कधीकधी हे फार चिपकूपणा करतात. इतर वेळी हे निष्काळजीपणे वागतात.  चंद्राच्या कले प्रमाणे त्यांच्या मूड खाली वर होत असतो. भूतकाळातील आठवणीत हे गुरफटून जातात आणि त्यामुळे ते उदासीन होतात. ते त्यांच्या चुका मान्य करत नाही म्हणून तरी त्यांची नकारात्मक अभिव्यक्ती तयार होते. हे कधी कधी भ्याडपणाचा, उपहास आणि कंजूस पानाचे वर्तन करतात.

कर्क राशीच्या दृष्टीने प्रेम :
कर्क' राशीच्या लोकांना भावनिक सुरक्षा अधिक महत्वाच्या आहेत. त्यांच्या साठी प्रेम हे सर्वात महत्वाचे असते. प्रेम मिळण्याची इचछा त्यांना भावुक बनवते. प्रगती होत असताना त्यांना आपण  काही तरी गमावत आहोत अशी भावना होते, जसे  मोठे होण्याच्या प्रकिये मध्ये त्यांना त्यानंच बालपण हरवलं असं वाटत. हि भावना त्यांना उदार आणि संवेदनशील बनवते , तथापि  भावना और भावनिक पायावर यांच जग उभं राहिलेलं असतं  आणि  हे कधी कधी खूप असह्य आणि अस्वस्थ वर्तन दाखवतात.

प्रेमातील आचरण :
कर्क राशी चे लोकं त्यांच्या  सौम्यता, आणि संवेदनशीलता स्वभावावर प्रेम करतात. कर्क राशी चे लोक संवेदनशील, उदार, काळजी आणि प्रेम देणारे म्हणून योग्य भागीदार सिद्ध होतात. आणि यांना प्रेमाने घर बसवणे आवडते.  हे आपल्या भागीदारा कडून जास्त नाही तर कमीत सामान प्रमाणात प्रेमाची अपेक्षा ठेवतात. यांच्या बदलत्या मूड प्रमाणे त्यांचा व्यवहार जीवनात पण दिसून येतो, जर हे आता पर्यंत खूप बोलत असतील तर ते अचानक शांत पण होऊन जातील. त्याच प्रेमाने दर वेळेस खूप काळजी घेणारे कर्क राशीचे लोक अचानक निष्काळजीपणे वागतात. कर्क राशी च्या व्यक्ती सोबत भागीदारी निभावण्यासाठी त्यांच्या साथीदाराला खूप प्रयत्न करावे लागलात. हे प्रेमात दुःख सहन नाही करू शकत . यांचा क्रोध जगजाहीर आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा