संबंध कुंभ

कुंभ राशीचे संबंध

प्रियकराच्या रूपात
कुंभ राशीचे प्रेमी बौद्धिकतेने उत्तेजित होणे त्यांना आवडते , असे गणेशजी म्हणतात . संस्कृती आणि योजनांनी भरलेल्या गोष्टी यांना आनंद मिळवून देतात . यांच्यासाठी यांचे असे जीवनसाथी चांगले असतात जे पूर्णपणे यांच्या नैसर्गिक स्वभावाला घाबरत नाहीत . मोकळ्या मनाचे , मनमिळाऊ , कल्पनाशील आणि जोखीम घेण्यासाठी तयार असणारे , इत्यादी असे यांचे गुण आहेत . ज्यांची कुंभ राशीचे व्यक्ती प्रशंसा करतात . इमानदार आणि निष्ठा यांच्यासोबत एक दीर्घकालीन संबंधाची मागणी यांच्यासाठी आवश्यक आहे .

वडिलांच्या रूपात  

कुंभ राशीचे वडील हे खूप मोकळ्या मनाचे असतात आणि हे आपल्या मुलांशी मैत्रीचे नाते बनवितात , असे गणेशजी म्हणतात . हे आपल्या मुलांना खूप स्वतंत्रता देत असतात आणि अगदी सहजतेने  बदलत्या नवीन वातावरणात स्वतःला सहभागी करून घेत असतात . शेवटी वडील आणि मुलाचा नात्यामधील पिढीचे अंतर संपून जाते . हि भीती आहे कि मुलांना जे स्वातंत्र्य दिले आहे त्याचा ते गैरफायदा घेऊ शकतात . एका वडिलांचा नात्याने तुम्हाला सावधान असण्याची गरज आहे .

आईच्या रूपात
कुंभ राशीच्या आई ज्या असतात त्यांचेही त्यांच्या मुलांशी मैत्रीपूर्ण नाते असते , असे गणेशजी म्हणतात . हे त्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देत असतात , ज्यामुळे त्यांना त्यांचा जीवनातील आनंदाचा अनुभव येईल , हे आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे बंधन ठेवत नाही . याठिकाणी भीती हि आहे , कि मुले त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ शकतात . यासाठी चांगला उपाय असा कि मुलांना त्यांची मर्यादा दाखवायला हवी .

मुलांच्या रूपात
एक कुंभ राशीची मुले हि इमानदार आणि आज्ञाधारी असतात , परंतु ते आपल्या जीवनात स्वातंत्र्याची मागणी करतात , असे गणेशजी म्हणतात . हे बंडखोर किंवा आपल्या आई - वडिलांचा अनादर नाही करत . पण हे स्पष्टपणे आपल्या स्वातंत्र्याची इच्छा व्यक्त करतात . यांना प्रेमाच्या प्रदर्शनाची खूप आवश्यकता नसते . पण हे आपल्या आई - वडिलांकडून मैत्रीची अपेक्षा करतात .  

मालकाच्या रूपात
कुंभ राशीच्या व्यक्ती जे मालक असतात , ते आपल्या कर्मचाऱ्यांना खूप आवडत असतात . कारण ते त्यांना खूप स्वातंत्र्य देत असतात . खरेतर हे मैत्रीपूर्ण आणि मोकळ्या विचारांचे व्यक्ती आहेत , असे गणेशजी म्हणतात . हे आपल्या कर्मचाऱ्यांना इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊ देत असतात आणि त्यांना त्याच्या पद्धतीनुसार काम करू देतात कारण त्याचे चांगले परिणाम दिसायला हवेत .

मित्राच्या रूपात
मित्राच्या रूपात कुंभ राशीच्या व्यक्ती इमानदार आणि दयाळू असतात , असे गणेशजी म्हणतात . हे फक्त आपल्या मित्रांना मदद नाही करत तर ते त्यांच्या मित्रांना संकटातून मार्ग काढण्याचाही प्रयत्न करतात आणि त्यांना सर्वात चांगला समाधान कारक सल्ला सुचवितात . हे वेळप्रसंगी मित्रांची काळजी घेत असतात आणि हे अशा लोकांमधले नाहीत , जे संकटाच्या वेळी कोणालाही संकटात मधेच सोडून जातील .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा