व्यावसायिक कुंभ

कुंभ राशीची करियर प्रोफाइल

अत्यंत स्वतंत्र आणि नवीन , कुंभ राशीतील जन्मलेल्या व्यक्तींना एका सीमित जागेत खूप वेळ पर्यंत काम करायला आवडत नाही . करियरच्या मार्गात यांना यशस्वी होण्यासाठी आपली कल्पकता व्यक्त करण्याची गरज भासू शकते . खरेतर काही कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या करियरची एक अस्थिर सुरुवात करतात . यांना तुम्ही नवीन विषय शिकतांना ,नोकरी बदलतांना आणि नवीन करियर सुरु करण्यासाठी पूर्ण पणे बदलतांना बघू शकतात . याचे कारण यांची दुविधा मनःस्थितीत यांचे मन अडकलेले  नसून त्यांचे स्वतंत्र विचार आणि सतत नवीन अविष्कार करण्याच्या इच्छेमुळे होत असते .
 
 
एक ९ ते ५ च्या दरम्यानची नोकरी कुंभ राशीच्या व्यक्ती नाही करू शकत . हे अगदी सहज कंटाळून जात असतात , शेवटी ते ९ ते ५ च्या दरम्यान असलेल्या नोकरींविषयी निरुत्साही होतात . कुंभ राशीच्या व्यक्ती अपरंपरागत करियरची निवड उत्कृष्ठता प्राप्त करण्यासाठी करत असतात . समजा , ह्या व्यक्ती एखाद्या नियमित कामाशी जरी जोडल्या गेल्या ,तरीही ह्या व्यक्तींची संभाव्यता काही वेगळे करण्याची असते . शेवटी तुम्ही ह्या व्यक्तींना त्यांच्या करियरच्या लक्ष्याकडे अग्रेसर होत असतांना , वेगवेगळ्या क्रियापालट करतांना व्यस्त दिसून येतात .

आधुनिक , प्रगतिशील  किंवा  विज्ञान ,तंत्रज्ञान ह्या क्षेत्रांशी संबंधित काहीही यांचे लक्ष केंद्रित करू शकते . याव्यतिरिक्त जे प्रामाणिक निकषांवर प्रश्न उभे करतात  किंवा वादग्रस्त मुद्द्यांमध्ये बौद्धिक मुद्द्यांना उत्तेजित करण्याची गरज दाखवितात यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो . कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक आदर्श करियर असे होऊ शकते , ज्यामध्ये लवचिकतेची संधी असेल आणि काम करण्याचे एक चांगले कारण असेल .

खरेतर , यांचा तापट स्वभाव यांना जिद्दी बनवीत असतो आणि नेहमी असे वाटते कि यांच्या आजूबाजूचे लोकं यांना समजण्यात सक्षम नाहीत . हि मानसिकता कल्पनाशील आणि तार्किक व्यक्तींसाठी त्यांच्या करियरच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात . खासकरून तेव्हा , जेव्हा हे त्यांच्या टीम किंवा  मोठ्या समूहामध्ये काम करत असतात .

सर्व मिळून असे सांगता येईल कि , कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या तेव्हा चांगले प्रदर्शन करतात ,जेव्हा त्यांना त्यांच्या व्यवसायात उत्कृष्ठ स्मृती ,रचनात्मकता , ज्ञान , बुद्धी , स्वतंत्रता आणि मानवी कारणांसाठी प्रेम दर्शविण्याची व्याप्ती होत असते . यांच्यासाठी विज्ञान , सामाजिक शास्त्र , जीव शास्त्र , जोतिष्य शास्त्र , क्ष-किरण शास्त्र , अभियंता , राजकारण , सामाजिक कार्य , इत्यादी क्षेत्रांमध्ये करियर करणे योग्य आहे .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा