राशीचक्रातील राशींबद्दल सारे काही !

तुमची बलस्थाने, तुमच्यातील कमकुवतपणा, तसेच तुमच्यात असलेली क्षमता आणि प्रतिभा ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे का ? तर मग राशीचक्रातील राशींकडे ह्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे आहेत. इथे तुमच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि तुमचा जगाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन तुम्हाला समजून घेता येईल.

मेष

साहसी, आत्मविश्वासपूर्ण,
स्वकेंद्रित, मनात विचार आल्याक्षणी त्याप्रमाणे कृती करणारा

वृषभ

विसंबून राहण्याजोगा, मजबूत,
अतिशय संवेदनशील, हट्टी

मिथुन

बोलका, परिवर्तनास तयार,
सातत्याचा अभाव असलेला, वरवर विचार करणारा

कर्क

निष्ठावान, कनवाळू,
लहरी, मनाचा ठामपणा नसलेला

सिंह

उद्योगी, उत्साही, खंबीर,
अहंकारी, मालकी हक्क गाजवण्यास आवडणारा

कन्या

विसंबून राहण्याजोगा, सहनशील, धीर धरू शकणारा,
टीकाकार, दुसऱ्याचे मूल्यमापन करण्याची आवड असणारा, दुसऱ्याला दोष देण्याची आवड असलेला

तूळ

देखणा, प्रेमळ,
निर्णयक्षमता नसलेला, आळशी

वृश्चिक

आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीवर मनापासून प्रेम करणारा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा,
गुप्ततेकडे कल असणारा, स्वार्थासाठी दुसऱ्यावर अयोग्य रीतीने प्रभाव टाकणारा

धनु

समाजात राहायला आवडणारा, लोकांच्या सहवासाची आवड असणारा,
रोखठोक बोलणारा, कायम बेचैन असणारा

मकर

हेकेखोर, गंभीर स्वभावाचा,
स्वभावात अजिबात लवचिकपणा नसणारा, नेहमी उच्च दर्जाची मागणी करणारा, सहजासहजी समाधान न होणारा

कुंभ

बुद्धिमान, माणुसकी असणारा,
परंपरेला छेद देऊन वागणारा, वचन देण्यास सहज तयार न होणारा

मीन

प्रेमसंबंधाची आवड असणारा, कल्पक,
सहजपणे भ्रम होणारा, भूतकाळात होऊन गेलेल्या आणि पुन्हा होऊ न शकणाऱ्या गोष्टींबद्दल दुःख करणारा

मेष कुंडली

मेष दैनिक राशि फल16-10-2019

आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. ...अधिक वाचा

मेष साप्ताहिक राशिफल13-10-2019 - 19-10-2019

हा आठवडा आपणास त्रासदायी ठरणारा आहे. असे असले तरी ...अधिक वाचा

मेष मासिक राशिफलOct 2019

हा महिना आपल्यासाठी अनुकूल परिणाम देणारा आहे. एख...अधिक वाचा

मेष वार्षिक राशिफल2019

आर्थिक चणचण भासणार नाही. मेष राशीच्या व्यक्तींना...अधिक वाचा

राशी, राशींची चिन्हे आणि त्यांचे अर्थ –

राशीचक्रातील बारा राशींवर सारे ज्योतिषशास्त्र उभे आहे असे मानले जाते. ह्या भविष्यसूचक शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ह्या राशींच्या अभ्यासापासून सुरुवात करावी. ह्या बारा राशी नीट समजून घेतल्याखेरीज ज्योतिषशास्त्राचे इतर पैलू समजून घेऊन त्यांचा खोल अभ्यास करणे कठीण आहे. प्रत्येक राशीचा विस्तार राशीचक्रातील ३० अंश इतका असून प्रत्येक रास अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल ह्या चारपैकी एका तत्वाची आहे असे मानले जाते. माणसे, त्यांचे गुणधर्म, आचारविचार, स्वभावधर्म आणि आयुष्याकडे पाहाण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हे सारे समजून घेण्यासाठी ह्या राशींचा फार चांगला उपयोग होतो. अग्नितत्वाच्या राशीची एखादी व्यक्ती थेट बोलणारी आणि प्रयोगशील स्वभावाची असेल तर पृथ्वीतत्वाच्या राशीची व्यक्ती थोडीफार मुत्सद्दीपणे वागणारी आणि विचारात, दृष्टिकोनात ताठरपणा असणारी अशी असेल. व्यक्ती आपल्या वागण्यात तसेच आचारांत कशाला प्राधान्य देते, वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा असतो, ह्यावर राशींचा खूपच प्रभाव असतो. त्यामुळेच ह्या राशींचा आपल्या मनाशी खूपच संबंध असतो. आपल्या जन्मकुंडलीमधील बारा घरे ह्या राशींच्या पायावर उभी असतात आणि त्या राशींमध्ये आकाशस्थ ग्रह असतात. कुंडलीतील बारा घरे आणि ह्या बारा राशी ह्यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध असतो आणि ते सगळे मिळून एक संपूर्ण चित्र तयार करतात.