विश्व कपाचा मुकुट कोणाच्या नांवे होणार : न्यूझीलॅंड कि इंग्लंड


न्यूझीलॅंड विरुद्ध इंग्लंड - कोण जिंकणार हा सामना 
विश्व कपाचा मुकुट कोणाच्या नांवे होणार : न्यूझीलॅंड कि इंग्लंड 
२०१९ चा विश्व चषक हा विश्व चषकाच्या इतिहासातील यंदा प्रथमच एक नवीन विश्व विजेता जगास देणार आहे. अंतिम सामना १४ जुलै रोजी लंडन स्थित लॉर्ड्स मैदानावर  न्यूझीलॅंड व यजमान इंग्लंड संघ ह्यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या द्वितीय उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाने गत विजेता ऑस्ट्रेलियास ८ गडी राखून पराभूत करत २७ वर्षां नंतर अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. ह्या पूर्वी इंग्लंडचा संघ १९७९, १९८७ व १९९२ साली विश्व चषकाच्या अंतिम फेरीत पोचला तर होता, परंतु त्यांना विश्व विजेताचा मुकुट काही पटकावता आला नव्हता. यंदा तो हा मुकुट धारण करण्याच्या निश्चयासह मैदानात उतरेल. दुसरीकडे न्यूझीलॅंडने सुद्धा भारतास पराभूत करून अंतिम सामना गाठला आहे. आता ह्या दोघांमध्ये अटीतटीचा सामना होईल. गुण तालिकेचा अभ्यास केल्यास इंग्लंड संघाचे १२ गुण असून ते न्यूझीलॅंड संघाच्या पुढे आहेत. न्यूझीलॅंड संघाचे फक्त ११ गुण आहेत. अर्थात आता ह्या गुणांमुळे काही फरक पडणार नाही, कारण गुणांच्या तक्त्यात भारत हा १५ गुणांनी  सर्वात पुढे असलेला संघ असतानाही अंतिम सामना गाठू शकला नाही. अशा परिस्थितीत १४ जुलै रोजी सामन्यात कोणाचे पारडे जाड असेल हे आपण पाहू  - 

न्यूझीलॅंड विरुद्ध इंग्लंड
स्थान - लॉर्ड्स, लंडन. 
वेळ - दुपारी ३.०० (भारतीय वेळेनुसार)

न्यूझीलॅंड व इंग्लंड ह्यांचे महत्वाचे खेळाडू 
न्यूझीलॅंड - केन विलियमसन, हेनरी निकोल्ल्स, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट 
इंग्लंड - जोन्नी बेयरस्टॉ, मार्क वुड, जेसन रॉय, लियम प्लंकेट्ट 

न्यूझीलॅंड व इंग्लंड ह्यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल 
गणेशजींच्या अंदाजानुसार न्यूझीलॅंड व इंग्लंड ह्यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल      न्यूझीलॅंडच्या बाजूने लागेल. 

न्यूझीलॅंड व इंग्लंड ह्यांच्यापैकी कोण सामना जिंकेल 
गणेशजींच्या अंदाजानुसार न्यूझीलॅंड व इंग्लंड ह्यांच्या दरम्यान होणारा विश्व चषक २०१९ चा हा सामना इंग्लंडचा संघ जिंकेल.

श्रीगणेशजींच्या कृपेने 
आचार्य भट्टाचार्य