गणेशाला असे वाटते की, प्रशिक्षक म्हणून गोपीची कारकीर्द अशीच बहरत जाईल आणि तो असेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करील


२००१ साली ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी जिंकणारा पुल्लेला गोपीचंद हा सध्या भारताचा राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. त्याच्याच देखरेखीत तयार झालेल्या पीव्ही सिंधूने हल्लीच पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये  रौप्यपदक जिंकले. त्याचे चाहते त्याला प्रेमाने गोपी ह्या नावाने ओळखतात. तो हैद्राबाद येथे गोपीचंद बॅडमिंटन अकादमी चालवतो. तेथून त्याने सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, पारुपल्ली कश्यप, श्रीकांत किदंबी, अरुंधती पानतावणे, गुरूसाई दत्त आणि अरुण विष्णू असे कितीतरी विजेते खेळाडू तयार केले आहेत. गोपीने १९९९ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००९ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार आणि २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवला. तो खेळत असताना अजिंक्य असा राष्ट्रीय विजेता होता. त्यावेळी त्याने १९९६ ते २००० असे ओळीने पाच वर्षे राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले होते. गणेशाने त्याच्या कुंडलीवर नजर टाकल्यावर असे भविष्यकथन केले आहे की, गोपीचंदला अजूनही काही मानसन्मान मिळतील.     

पुल्लेला गोपीचंद
जन्मतारीख : १६ नोव्हेंबर, १९७३
जन्मठिकाण : नागंदला

Solar Chartमंगळ हा ग्रह सामर्थ्य आणि जोम चांगले राखतो आणि ह्या कुंडलीत तो स्वगृहीचा आहे. ह्या कुंडलीत आत्माकारक ग्रह बुध असून मंगळाचा बुध आणि रवि ह्या दोघांशी योग होत आहे. त्यामुळे त्याच्याकडे काम करून घेण्याची क्षमता, विचारांचा ठामपणा, पद्धतशीरपणे काम करण्याची सवय, कठोरपणा, उत्साही वृत्ती आणि काम करत राहण्याची चिकाटी हे सगळे गुण आहेत. एक प्रशिक्षक म्हणून आपल्या शिष्यांचा दर्जा उंचावण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ त्यांच्याकडून करून घेण्यासाठी हे गुण उपयोगी पडतात. मंगळ आणि बुध हे दोन्ही ग्रह वक्री असून त्यांच्यात होणारा प्रतियोग खेळात नवीन पद्धती, नवे पैलू आणण्याची त्याची क्षमता दाखवतो. त्यामुळे तो आपल्या शिष्यांना खेळाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देऊ शकतो. त्याने दाखवलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याचे शिष्य सर्वात उपयोगी व  सामर्थ्यशाली गोष्ट वापरू शकतात.

भ्रमण करणारा गुरु ग्रह प्रशिक्षक म्हणून त्याला अधिकाधिक यश मिळवण्यास साहाय्य करत राहील. परंतु राहूचे कर्क राशीतून आणि शनीचे धनु राशीतून होणारे भ्रमण ह्यांच्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये काही अडचणी येऊ शकतील, वाद होऊ शकतील. ते काहीही असले तरी त्याच्या श्रमांना मे २०१८ नंतर चांगली फळे येऊ लागतील. त्याची शिष्यमंडळी भारताला आणखी पदके मिळवून देऊ शकतील, कदाचित टोकियो ऑलिम्पिक्समध्ये मध्ये एखादे सुवर्णपदक मिळू शकेल.

त्याची बॅडमिंटन अकादमी चांगल्या जोमाने वाढेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच खेळाडू तेथून निर्माण होतील. तो यापुढे चांगले प्रशिक्षकही तेथे आणू शकेल आणि त्यामुळे आपल्या देशातील खेळाडूंना अधिक संख्येने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक मार्गदर्शनासाठी मिळतील.

त्याच्या कुंडलीतील अशा सगळ्या अनुकूल ग्रहयोगांमुळे बॅडमिंटनमध्ये त्याचे एक विशेष स्थान निर्माण होईल.     

गणेशाच्या कृपेने,
तन्मय के. ठक्कर
गणेशास्पीक्स.कॉम चमू