गणेशाने असे म्हटले आहे की, एकचित्ताने आपल्या लक्ष्यावर सगळे ध्यान केंद्रित करून ते लक्ष्य गाठण्यास ग्रहांनी झाझरियाला मदत केली


नुकत्याच पार पडलेल्या रिओ पॅरालिंपिक्समध्ये भालाफेक ह्या क्रीडाप्रकारात भारताच्या देवेंद्र झाझरिया ह्या साहसी आणि निर्भय युवकाने एकचित्ताने स्वतःचे सगळे लक्ष सुवर्णपदक मिळवण्याच्या आपल्या ध्येयावर केंद्रित करून शेवटी ते ध्येय गाठले. जागतिक पातळीवरच्या ह्या सर्वोच्च स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. पहिले सुवर्णपदक त्याने २००४ ह्या वर्षी अथेन्स येथे झालेल्या पॅरालिंपिक्समध्ये मिळवले होते. त्या स्पर्धेत त्याने ६२.१५ मीटर इतक्या लांबवर भाला फेकला होता. रिओ येथील स्पर्धेत त्याने ६३.९७ मीटर इतक्या अंतरावर भालाफेक करून स्वतःचाच विक्रम मोडला. त्याचे धैर्य आणि कधीही माघार न घेण्याची वृत्ती यांचे दर्शन तो अगदी लहान असतानाच घडले होते. राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील देवेंद्र फक्त आठ वर्षांचा असताना झाडावर चढताना त्याचा वीज वाहून नेणाऱ्या उघड्या तारेला स्पर्श झाला. त्या अपघातानंतर उपचार करताना त्याचा हात कापणे भाग पडले. पण हा भारतीय मुलगा त्यामुळे मागे हटणार नव्हता. शाळेच्या क्रीडासामन्यात भालाफेकीत त्याने केलेली चांगली कामगिरी द्रोणाचार्य पदक विजेते प्रशिक्षक आर. डी. सिंग यांच्या नजरेत भरली. त्यांनी तेव्हापासून त्याला शिकवण्यास सुरुवात करून ऑलिम्पिक विजेतेपदाची कीर्ति मिळवण्यास मदत केली. गणेशाने झाझरियाच्या कुंडलीचा अभ्यास करून असे दाखवले आहे की, त्याला ग्रहांचेही तसेच जोरदार पाठबळ मिळाले आहे.      

देवेंद्र झाझरिया
जन्म तारीख : १० जून १९८१
जन्मवेळ : माहिती नाही
जन्माचे ठिकाण : चुरू जिल्हा, राजस्थान, भारत

Solar Chartदेवेंद्र झाझरियाच्या जन्मकुंडलीत रवि हा आत्माकारक असून तो मंगळाबरोबर वृषभ राशीत आहे. ही ग्रहस्थिती त्याच्या धैर्यशील वृत्तीबद्दल बरेच काही सांगून जाते. त्याचे जगणे एका उद्दिष्टाशी जोडलेले आहे : “ मला कोणीही दुर्बल म्हणता कामा नये.” निराशा, टोमणे, करावे लागलेले त्याग, शारीरिक मर्यादा आणि खांद्यावर असलेले अपेक्षांचे ओझे ह्या सगळ्यांवर मात करण्यास पुरेल इतके जबरदस्त आंतरिक सामर्थ्य त्याच्याकडे आहे. रवि – मंगळ युती त्याचा विचारातील ठामपणा आणि ‘ मी सुवर्णपदकच मिळवीन, त्यापेक्षा कमी काहीही नाही’, हे एकच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणारी जोरदार इच्छाशक्ती दर्शवते.

“ तुम्ही जिंकावे म्हणून पाठीराख्यांनी दिलेल्या घोषणा आणि सुवर्णपदक जिंकावे अशी त्यांची अपेक्षा ह्यांच्यामुळे अगदी मुरलेल्या, अनुभवी खेळाडूंचेही हात पाय गळू शकतात.””

– पण कन्येत असलेली चंद्र, गुरु, शनी युती अशा दबाव आणणाऱ्या परिस्थितीला व्यवस्थित तोंड देण्याची क्षमता आणि सामर्थ्य त्याला देते, असे गणेशाचे म्हणणे आहे.

शुभारंभाच्या कार्यक्रमात भारतीय ध्वज वाहून नेण्याचा मान त्याला मिळाला होता. भारतीय चमूचे नेतृत्व त्याने करावे आणि इतरांसाठी एका आदर्श खेळाडूची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा त्याच्याकडून केली गेली होती. रवि – गुरूचा नवपंचम योग त्याला जबाबदारीची जाणीव देतो आणि स्वतःच्या अप्रतिम कामगिरीने इतरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्यही देतो.

 हे सुद्धा वाचा :  पी. गोपीचंद : “अनेक अर्जुनांच्या ह्या द्रोणाचार्यांसाठी” भविष्यकाळात ग्रह काय घेऊन येणार आहेत ?
मूळ कुंडलीतील चंद्रापासून दहाव्या स्थानात असलेली बुध – शुक्र युती त्याच्या कुंडलीला ताकद देते आणि स्वतःसाठी तसेच देशासाठी  मानसन्मान जिंकण्यासाठी मदत करते.

कन्या राशीत असलेल्या ग्रहांच्या समूहावरून सध्या गुरुचे भ्रमण सुरु आहे. कुंडलीतील मूळ गुरूवरून होणारे गुरुचे गोचर भ्रमण आणि हे भ्रमण सुरु असताना आत्माकारक रविबरोबर होणारा त्याचा योग ह्यांच्यामुळे रिओ पॅरालिंपिक्समध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी आणि भारताला अभिमानकारक ठरणारी असामान्य कामगिरी करण्यासाठी त्याला मदत मिळाली.

गणेशाच्या कृपेने,
तन्मय के. ठक्कर
गणेशास्पीक्स. कॉम चा चमू