ज्योतिषीय विश्लेषण - अनेक विवादा नंतर अस्तित्वात आलेले महाराष्ट्राचे सरकार किती काळ टिकेल ?

महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथा पालथी नंतर अस्तित्वात आलेले काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ह्यांच्या आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्या पासून देशातील गल्लीबोळातून ह्या सरकारच्या स्थिरते बद्धल चर्चा सुरु झाली आहे. भाजप व तथाकथित चाणक्यांच्या राजकीय डावपेचांची अवहेलना करून अनेक दशकांपासून स्वाभाविक विरोधी विचारसरणीस बाजूला सारून हे आघाडी सरकार अस्तित्वात आले. एकीकडे शिवसेनेने आपल्या हिंदुत्वाचे बलिदान दिले आहे तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या मूलभूत निधर्मी विचारसरणीस बाजूला सारले आहे. कोणतीही संस्था आपल्या विचार सरणीत बदल करू शकते, परंतु त्याचा त्याग करू शकत नाही, कारण जगातील कोणताही पक्ष एका विशिष्ट विचार सरणीमुळेच फुलत असतो. पक्ष कोणत्याही विचार सरणीस जन्माला घालत नसला तरी त्या विचारसरणीच्या अनुकरणांमुळे त्याची बांधणी होत असते. विचारसरणीत एखाद्या व्यक्तीचे सामाजिक मत असते ज्यास त्याचा भावनात्मक संबंध असतो. व्यक्तीचा विश्वास अशा पक्षावरच असतो कि जो त्याच्या विचारसरणीचे व मतांचे समर्थन करतो. ह्या आधारे राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना ह्यांची आघाडी त्यांच्या प्रत्येकाच्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या लोकात संभ्रम निर्माण करणारी आहे. सध्याच्या सरकार बनविण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ह्यांनी एक रूपरेखा आखून त्यास महा विकास आघाडी असे नांव दिले. ह्या रुपरेखेच्या नावाखाली सरकार बनविण्यासाठी काही मुद्द्यांवर एकमेकांचे एकमत होऊन त्यात सामान्य न्यूनतम  कार्यक्रम तयार करण्यात आला जो ह्या महा विकास आघाडीच्या नीती - नियमा सारखे आहेत. आता ह्या सामान्य न्यूनतम कार्यक्रमाच्या यशावरच ह्या सरकारचा कार्यकाळ अवलंबून आहे. ह्या न्यूनतम कार्यक्रमाच्या यशावर सुद्धा काही शंका आहेत, परंतु ज्योतिषीय गणितानुसार हे सरकार काही विरोधाभास व कारस्थानाचे बळी पडण्याची शक्यता आहे. जेव्हा आमच्या अनुभवी ज्योतिषांनी सध्याच्या सरकारची कुंडली मांडली तेव्हा काही धक्कादायी निष्कर्ष त्यातून निघाले. 

महाराष्ट्र सरकारच्या कुंडलीचे विश्लेषण, ५ वर्ष पूर्ण करेल हे सरकार ? 
सध्याच्या महाराष्ट्र सरकारची कुंडली. 
स्थापना दिवस :- २८ नोव्हेंबर २०१९. 
स्थळ:- शिवाजी पार्क, मुंबई, महाराष्ट्र. 
वेळ:-१८.४०. 


सध्याच्या सरकारची कुंडली व ग्रहस्थिती 

वरील कुंडलीनुसार सध्याच्या सरकारचा कार्यकाळ अनिश्चितता, कारस्थान व विरोधाभासाने भरलेला असल्याचे दिसत आहे. कुंडलीचा लग्नेश शुक्र हा विवादस्थानी म्हणजेच अष्टमस्थानी स्थित असून चंद्र, शनी व केतू ह्यांच्या युतीत आहे. लग्नेश शुक्र अष्टमात चंद्र, गुरु, शनी व केतू ह्या ग्रहांशी युती करत आहे. हि ग्रहस्थिती ह्या सरकारला त्रासदायी ठरू शकते. कुंडलीतील अष्टमातून होत असणाऱ्या ह्या योगामुळे राजकीय जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ह्या योगांचा दूरगामी परिणाम सुद्धा नकारात्मक असल्याचे दिसते. 

कुंडलीतील वृषभ लग्न कारस्थानांचे सूचक 

सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कुंडलीत वृषभ लग्न उदित झाले आहे. कुंडलीत असलेला ह्या योगाने व्यक्ती राजकीय कारस्थानास बळी पडते. आपण जर ह्या कुंडलीवर आपली नजर फिरवलीत तर ह्या वृषभ लग्नाची स्थिती आपणास समजू शकेल. कुंडलीत फक्त षष्ठ, सप्तम व अष्टम ह्या भावातच अधिक ग्रह असून इतर भावात ग्रह नसल्याचे  दिसून येते. हि स्थिती शत्रू, विरोधक व कारस्थान ह्या सारखी स्थिती निर्माण करते. सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या ह्या कुंडलीतील षष्ठ स्थानी असलेले मंगळ व बुध विरोधी पक्षास मजबूत करण्याचे कार्य करेल. त्यातच सप्तमातील रवी राजकीय कारस्थान रचण्याचे कार्य करेल. अष्टमातील ग्रह मिश्र फळे देतील. षष्ठ, सप्तम व अष्टम भाव व त्यातील ग्रहांचा विचार करता असे दिसते कि येणाऱ्या काळात विरोधी पक्ष मजबूत होऊन एखाद्या राजकीय कारस्थानाची पार्श्वभूमी तयार करण्याचे काम करेल. 

गुरु - शुक्राच्या प्रभावामुळे मोठे निर्णय घेण्याची प्रेरणा होईल

कुंडलीतील अष्टमात असलेले शुभ व अशुभ ग्रह मिश्र फळे देतील. परंतु, गुरु व शुक्राची धनस्थानावर असलेल्या दृष्टीमुळे सरकार शेतकरी व मजूरवर्गाच्या कल्याणासाठी लवकरच मोठी घोषणा करण्यावर पैसा खर्च करू शकेल. सरकारच्या ह्या निर्णयाचे सामान्यजन स्वागत करतील, ज्यामुळे सरकारला तात्कालिक राजकीय लाभ सुद्धा होऊ शकेल. परंतु, धनस्थानी असलेल्या राहूवर अष्टमातील शनीच्या दृष्टीमुळे सरकारी तिजोरीवर कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. ह्या सरकारच्या कुंडलीचे पूर्ण विश्लेषण करताना असे दिसून येते कि येणाऱ्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ह्यांच्या आघाडीस अनेक आव्हाने व विवादास्पद गोष्टींना सामोरे जावे लागेल व त्यामुळे सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. 

गुरू गोचरीचा लाभ  होईल

सध्याचे गुरु - शनीचे गोचर आघाडी सरकार अस्थिर करण्याचे कार्य करत आहे, परंतु अशी परिस्थिती असताना २९ मार्च २०२० ह्या दिवशी होत असलेले गुरुचे राशी परिवर्तन सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कुंडलीत काही सकारात्मक बदलाचे संकेत देत आहे. वरील दिनांका पासून गुरुचे भ्रमण मकर राशीतून होईल जी कुंडलीच्या भाग्यस्थानी आहे. कुंडलीच्या भाग्यातून होणारे गुरुचे भ्रमण श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या सरकारला राजकीय संकटातून बाहेर पडण्यास मदतरूप ठरेल. ह्या सरकारसाठी हा एक शुभ संकेतच आहे.

निष्कर्ष व भविष्यवाणी 

उपरोक्त कुंडलीतील ग्रह, नक्षत्र व दशा महादशेचा विचार करता जो निष्कर्ष निघतो त्यावरून अशी भविष्यवाणी करता येते कि काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ह्यांच्या आघाडी सरकारला आगामी काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. सरकार स्थिर ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांना अनेक मतभेद बाजूला सारावे लागतील. मजबूत विरोधी पक्षाच्या बाजूने असलेली ग्रहस्थिती रोज नवीन आव्हाने निर्माण करण्याचे कार्य करतील. आगामी ५ वर्षां पर्यंत सरकार टिकवून ठेवणे व चालवणे खूप अवघड असण्याची शक्यता आहे. श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे काटे असलेल्या मार्गावरून चालावयाचे आहे. ह्यात बघण्यासारखे हे असेल कि श्री. उद्धव व त्यांचे सहकारी ह्या अवघड मार्गातून आपले सरकार समर्थपणे बाहेर काढू शकतील कि नाही ?

श्री गणेशांच्या कृपेने 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम