उर्मिलेची अदाकारी किती मतदार आकर्षित करू शकेल, जाणून घ्या उत्तर मुंबईतील मतदारांचा कल

आपल्या अभिनयाद्वारे वेळो - वेळी सर्वाना मोहून टाकणाऱ्या उर्मिला मातोंडकर ह्यांनी  अचानकपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन सर्वानाच आश्चर्यचकित केले. काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळ न दवडता लगेचच त्यांना २०१९ च्या सार्वत्रिक  निवडणुकीत उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारा दरम्यान भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यात हाणामारी झाल्या नंतरच त्यांनी पोलिसांचे संरक्षण मागितले. उत्तर मुंबईतील हि जागा पूर्वी पासूनच भाजपाकडे आहे. येथे सध्याचे खासदार श्री. गोपाळ  शेट्टी ह्यांच्यावरच भाजपाने विश्वास दाखवला आहे. उर्मिला मातोंडकर ह्यांची कुंडली लोकसभा निवडणुकीसाठी काय दर्शवित आहे हे आता आपण बघू. 

उर्मिला मातोंडकर ह्यांची कुंडली (रवी कुंडली)
जन्म दिनांक:- ०४ डिसेंबर १९७४. 
जन्म वेळ:- माहित नाही. 
जन्म स्थळ:- मुंबई ग्रह काय सांगतात 
उर्मिला ह्यांच्या कुंडलीत गोचरीचा शनी व केतू हे जन्मस्थ चंद्र, शनी व केतू ह्यांच्यावर दृष्टी टाकत आहेत. गोचरीचा राहू जन्मस्थ चंद्र, शनी व केतू ह्यांचे वरून भ्रमण करत आहे. 
- गुरु जन्मस्थ चंद्राच्या षष्ठातून गोचरीने भ्रमण करत आहे. 
- मतदानाच्या दिवशी चंद्रा सहित इतर ग्रहांचे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल नाही. उर्मिला ह्यांच्या कुंडलीचे ज्योतिषीय विश्लेषण 
शनीच्या प्रतिकूल गोचर भ्रमणामुळे उर्मिला ह्यांचा नवी दिल्लीचा मार्ग थोडा कठीण होणारा आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. गोपाळ शेट्टी व मोदी लाट ह्यांचा उर्मिला ह्यांना प्रखर सामना करावा लागणार आहे. योग्य मुद्द्यांचा अभाव, जनतेशी नसणारा सरळ संवाद ह्यामुळे उर्मिला ह्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मात्र, उर्मिला ह्यांच्या व्यक्तिमत्वाने आकर्षित होऊन व काही ग्रहांची अनुकूलता लाभल्याने मतदाता त्यांना मते नक्कीच देतील. त्यातच काँग्रेसचे पारंपरिक मतदाता सुद्धा त्यांनाच आपली मते देतील. असे असून देखील त्यांचा विजयाचा मार्ग कठीणच असल्याचे दिसत आहे. 
उर्मिला ह्यांच्या साठी ग्रह काय सांगत आहेत 
काँग्रेस पक्ष व उर्मिला ह्यांच्या द्वारा मतदारांना आकर्षित करण्याचे खूप प्रयत्न करण्यात येतील. श्री गोपाळ शेट्टी ह्यांना त्या तगडे आव्हान देतील. असे असून सुद्धा संसदेत जाण्याचा त्यांचा मार्ग कठीणच आहे. 

आचार्य भारद्वाज ह्यांच्या इनपुटसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम