केंद्रीय अंदाजपत्रक २०१९ चे भाकीत: गणेशाने केले आहे अंदाजपत्रकाचे पूर्वानुमान

मोदी सरकारचे दुसऱ्या पर्वातील पहिले पूर्ण अंदाजपत्रक दि. ५ जुलै रोजी अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन लोकसभेत सादर करतील. श्रीमती निर्मला सीतारामन ह्या देशाच्या पहिल्याच अर्थ मंत्री आहेत. ह्या पूर्वी माजी पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी अर्थखाते आपल्याकडे ठेवले होते. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आरूढ झाल्याने देशातील जनतेच्या त्यांच्या कडून अपेक्षा वाढल्या आहेत. फेब्रुवारीत श्री. पियुष गोयल ह्यांनी अंतरिम अंदाजपत्रक सादर केले होते. त्या वेळी लहान करदात्यांना प्राधान्य दिले जाईल असा इशारा सरकारने दिला होता. आता आपण बघू  कि ग्रह सामान्य जनतेस काय देणार आहेत ते: 

भारताची कुंडली 

अंदाजपत्रक सादर होणाऱ्या ५ जुलैची ग्रहस्थिती 
अंदाजपत्रका विषयी ज्योतिषीय भविष्यवाणी 
- देशाच्या कुंडलीत रवी हा कर्क राशीत आहे, व अंदाजपत्रक सादर होणाऱ्या दिवशी तो मिथुनेतून राहूसह राहूच्याच (आर्द्रा) नक्षत्रातून गोचरीने भ्रमण करत आहे. हि ग्रहस्थिती हे दर्शविते कि अर्थ मंत्री गोल्ड पॉलिसी, पब्लिक सेक्टर युनिट्स व कर ह्या बाबत काही मजबूत व कडक निर्णय घेऊ शकतात. 
- देशाच्या कुंडलीतील रवी, चंद्र, बुध, शुक्र व शनी ह्यावरून अंदाजपत्रक सादर होणाऱ्या दिवशी गोचरीने चंद्र, मंगळ व बुध हे भ्रमण करतील. ह्याचा अर्थ असा कि त्या दिवशी कुंडलीतील तृतीय व नवम स्थान दोन्ही बलवान होतील. हे दर्शविते कि रेल्वे, पोस्ट ऑफिस, प्रिंट मीडिया, ट्रान्सपोर्टेशन, टेलिकॉम इत्यादी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडताना दिसू शकेल. 
- ह्या सर्वात हे बघावे लागेल कि जन्मस्थ मंगळ हा ०७ अंश २७ कलेचा आहे. तर अंदाजपत्रक सादर होणाऱ्या दिवशी शुक्र ०७ अंश ४९ कलेचा असेल. हे स्पष्टपणे दर्शविते कि मीडिया, फेशन, मनोरंजन, वैभवी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे, धागे, दागिने, परफ्युम ह्यांना चालना मिळेल. 
- अंदाजपत्रक सादर होणाऱ्या दिवशी गुरु हा सप्तमातून भ्रमण करत असल्याने शुभ फलदायी होईल. येथे जन्मस्थ केतू स्थित आहे. पब्लिक सेक्टर, भागीदारी, विदेश नीती, एफडीआय, विदेश व्यापारासाठी नवीन धोरण ह्या संबंधी काही घोषणा होण्याची शक्यता आहे. विमा व सार्वजनिक आरोग्य ह्यावर ह्याचा परिणाम होताना दिसून येईल. 
- भारताच्या कुंडलीत बुध हा पुष्य नक्षत्रात आहे. विशेष म्हणजे २०१९ चे अंदाजपत्रक  सादर होताना सुद्धा तो पुष्य नक्षत्रातच आहे. हे बँकिंग क्षेत्रात काही बदल होण्याकडे निर्देश करत आहे. बँकेतील घोटाळे, दिवाळखोरी ह्या संबंधात कडक नियम बनविले जाऊ शकतील. 
- चंद्र हा आश्लेषा नक्षत्रातून मंगळ व बुध ह्यांच्याशी युती योगात आहे जे चांगले संकेत देत आहे. अर्थ मंत्री कर सवलती, विदेश व्यापार व फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याज ह्या बद्धल काही बदल करण्याचे संकेत मिळत आहेत. 
- ह्या व्यतिरिक्त अंदाजपत्रक सादर होणाऱ्या दिवशी शनी २३ अंश २५ कलेवर असून केतू हा २३ अंश ३८ कलेवर आहे. त्यामुळे क्रूड ऑइल, पेट्रोलियम, रबर, टायर, स्टील, लोखंड, पेस्टीसाईडस, काळ्या रंगाचे द्रव पदार्थ ह्यांच्यासाठी एखादी अशी काही नीती नक्की करण्यात येईल कि जी गोंधळवून टाकणारी असेल. 

अंदाजपत्रकात सामान्य जनतेचा असेल विचार 
अंदाजपत्रक सादर होणाऱ्या दिवशी गुरुची जन्मस्थ लग्नावर दृष्टी आहे. तसेच मंगळावर सुद्धा नववी दृष्टी आहे. त्यामुळे असे अनुमान करता येते कि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करण्यात येईल. कमी बजेटची परवडणारी घरे, सॅनिटेशन, गावोगावी विजेची जोडणी, पिण्याच्या पाण्याची समस्या ह्यासाठी बराचसा निधी ठेवला जाऊ शकतो. ह्याचा मुख्य फायदा शिक्षण विभागावर सुद्धा होऊ  शकतो. काही मोठ्या कॉलेजात जागा वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. शनी - केतू हे अग्नी तत्वाच्या धनु राशीतून भ्रमण करत आहेत, ज्याचा अधिपती गुरु आहे. त्यामुळे दुर्बल घटकांसाठी काही चांगल्या योजनांची अपेक्षा ठेवता येते. 

शेअर्स बाजारावर दिसेल परिणाम 
ह्या दरम्यान राहूचे भ्रमण भारताच्या कुंडलीच्या धनस्थानातून होत आहे. जे देशातील जनतेचा आर्थिक नियोजनात गोंधळ उडवणारा आहे. त्यातच अंदाजपत्रक सादर होणाऱ्या महिन्याच्या दि. १५, १६ व ३० दरम्यान बराच गोंधळ होताना दिसून येईल. 

आचार्य धर्माधिकारी 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम