ज्योतिषीय विश्लेषण:अखेर कोणत्या ग्रहस्थितीमुळे श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत ?


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही जातकाची जन्म कुंडली, महादशा, ग्रह - नक्षत्र  ह्यांची स्थिती व त्याद्वारे होत असणारे योग ह्यांच्या आधारे जातकाचा भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळाच्या परिस्थितीचा अंदाज बांधता येतो. जन्म कुंडलीच्या आधारे कोणत्याही जातकाची शरीरयष्टी, धन - कुटुंब, विद्या, संतती, शत्रू, आयुष्य व पद  - प्रतिष्ठा ह्यांची भविष्यवाणी करता येते. सध्या देशातील राजकारणात ध्रुवीकरण होऊन महाराष्ट्राचे राजकारण ढवळले जाऊन काही नेत्यांना देशातील राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे. दिवसेंदिवस मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे हा एक असा चेहरा पुढे येत आहे, ज्यास विरोधी विचारसरणी असणाऱ्यानी सुद्धा एकत्र येण्यास सहमती दर्शवली. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाने देशास व राज्यास निव्वळ एक नवीन चेहरा मिळाला इतकेच नव्हे तर एका नवीन राजकीय प्रयोगाची नांदी सुद्धा झाली. ह्या सर्व घटनेत श्री. उद्धव ठाकरे एखाद्या नायका प्रमाणे प्रत्येक पक्षाच्या व वर्गाच्या पसंतीस उतरले. सद्य परिस्थितीत मिळत असलेल्या प्रसिद्धी मागे जसे एकीकडे श्री. उद्धव ह्यांचे राजकीय कौशल्य व कठोर परिश्रम आहेत, तसेच दुसरीकडे त्यांच्या कुंडलीतील ग्रहांचे सुद्धा समर्थन असल्याचे दिसत आहे. आमच्या ज्योतिषांनी जेव्हा श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या कुंडलीचा खोलवर जाऊन अभ्यास केला तेव्हा निव्वळ आजच्या परिस्थितीशी त्याचा किती संबंध आहे एवढेच समजले नसून आगामी काळाचे सुद्धा निर्देशन त्यातून मिळाले आहे. चला पाहू या कि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ह्यांचे ग्रहमान काय दर्शवित आहे ?

श्री. उद्धव ठाकरे ह्यांची रवी कुंडली 


महाराष्ट्रातील सध्याचा घटनाक्रम व श्री. उद्धव ठाकरे 

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यपाल महोदयांनी एका आदेशाद्वारे श्री. उद्धव ठाकरे ह्यांना महाराष्ट्र विकास आघाडीने एकमताने निवडलेले नेता ह्या नात्याने मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. ह्या अगोदर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात राष्ट्रवादीचे प्रमुख श्री. शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील नेता श्री. बाळासाहेब थोरात ह्यांनी आमदाराच्या संयुक्त बैठकीत महा विकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या ह्या प्रस्तावास सर्व पक्षीय आमदारांनी संमती दर्शवली. अशा प्रकारे ठाकरे घराण्यातील प्रथम ठाकरे म्हणून श्री. उद्धव ह्यांच्या रूपात मुख्यमंत्री म्हणून मिळाले. परंतु एक महिना चाललेल्या संघर्षात अनेक अडचणींचा सामना करून श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी हे यश संपादन केले, ज्यात त्यांनी आपले पिता स्व श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या काळापासून चालत आलेल्या शिवसेना - भाजप युतीला सोडचिट्ठी दिली. श्री. उद्धव ह्यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास त्यांच्या मार्गात काटे व खिळे पसरवण्याचे काम करण्यात आले. परंतु, त्यांनी आपल्या व आपल्या नवीन मित्रांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आपले दिवंगत पिता श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांना दिलेले वचन अखेर पूर्ण केले. परंतु मुख्यमंत्री पदा पर्यंत पोचण्याच्या ह्या धावपळीत श्री. उद्धव ह्यांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे ग्रहांचे सहकार्य मिळत राहिले. श्री. उद्धव ह्यांची रवी कुंडली बघितल्यावर त्यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात आलेल्या अडचणींचे सहजपणे आकलन होते.  श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या कुंडलीत त्यांना उच्च पद व प्रतिष्ठा प्राप्तीचे सर्व योग दिसून येत असल्यानेच आम्ही हे सांगत आहोत.  

कुंडलीत असलेले पद - प्रतिष्ठा, मान - सन्मान योग

२७ जुलै १९६० रोजी जन्मलेले स्व, श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे कनिष्ठ पुत्र व त्यांचे राजकीय  उत्तराधिकारी श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या रवी कुंडलीचा खोलवर अभ्यास केल्यावर असे दिसून येते कि श्री. उद्धव ठाकरे हे जन्मा बरोबरच आपले राजकीय यश, पद - प्रतिष्ठा व मान - सन्मान घेऊन आले आहेत. कुंडलीतील महत्वाच्या दशमस्थानास राजनीतीचे कारकस्थान समजण्यात येते. श्री. ठाकरे ह्यांच्या कुंडलीवर नजर फिरवताना असे दिसते कि दशमाचा अधिपती मंगळ लाभस्थानात स्थित आहे. जो जातकास आपल्या कर्माच्या जोरावर प्रसिद्धी व यश मिळवून देतो. असे जातक राजकारण व सामाजिक सेवा क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून उच्च पद - प्रतिष्ठा प्राप्त करतात. परंतु, लग्नेश चंद्र हा द्वितीयात राहूच्या सहवासात आहे जो आत्मविश्वासाचा अभाव व राजकीय जीवनात अडचणी दर्शवतो. कुंडलीत द्वितीय स्थानातील चंद्र - राहू ह्यांचा सहवास मन बेचैन करण्या व्यतिरिक्त जीवनातील सुखद क्षणांचा आनंद घेण्यात अनेक अडचणी उभ्या करण्याचे कार्य करतात. अशा परिस्थितीत जातक सतत आपले विचार बदलत असतो, गैरसमज व लोकांच्या दगा फटक्यास सहजपणे बळी पडतो. कुंडलीतील निदर्शनास येणारे हे संकेत सध्याच्या राजकीय घटनाक्रमावर आपला ठसा उमटवण्याचे कार्य करत आहे.

शत्रुस्थानी विरोधात असलेले ग्रह, परंतु मंगळाच्या गोचरीचा होईल लाभ 

कुंडलीतील षष्ठ स्थान हे गुप्त व उघड शत्रू दर्शवतात. जातकाच्या कुंडलीतील षष्ठस्थाना वरून गुरु, शनी व केतू गोचरीने भ्रमण करत आहेत, जे विरोधकांकडून अडचणी उत्पन्न होण्याचे सूचन करत आहेत. कुंडलीत षष्ठ स्थानातून होणाऱ्या ह्या ग्रहांचे गोचर भ्रमण राजकीय यश प्राप्त करताना विरोधकांकडून अडचणी निर्माण करण्यात येणाऱ्या कार्याकडे अंगुली निर्देश करते. अशा परिस्थितीत जातकास यश प्राप्तीसाठी खूप परिश्रम करावे लागतात. ह्या ग्रहांच्या गोचरी दरम्यान आपल्या विरोधकांना दुर्बल समजण्याची मोठी चूक होऊ शकते. परंतु, श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या रवी कुंडलीचे विश्लेषण करत असताना अजून एका महत्वाच्या गोचर भ्रमणाकडे  नजर जाते जे डिसेंबर अखेर होत आहे. ह्या दरम्यान मंगळ ग्रहाचे भ्रमण पंचमातून होईल जे त्यांना मोठे व सकारात्मक निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. ह्या गोचरीच्या दरम्यान ते सकारात्मक उर्जेसह यशस्वी निर्णय घेऊन उच्च स्थान प्राप्त करू शकतील.