लोकसभा निवडणूक २०१९: काय असेल ममता दीदी व तृणमूल काँग्रेसचे भविष्य?


लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मार्ग सोपा नाही
पश्चिम बंगाल येथे सत्तारूढ तृणमूल काँग्रेस खूपच मजबूत स्थितीत आहे व ह्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा जोर दाखवत आहे. मात्र, नेहमी प्रमाणेच ह्या खेपेस परिस्थिती बदलली आहे व टीएमसीचे काही नेते मंडळी पक्ष सोडून भाजपा बरोबर जात आहेत. अशा परिस्थितीत पक्षासह पक्ष प्रमुख ममता बेनर्जीच्या अडचणीत सुद्धा वाढ झाली आहे. 

स्वकीयांनीच केली टीएमसीच्या अडचणीत वाढ 
सध्याची परिस्थिती बघता पश्चिम बंगाल येथे सत्तारूढ असलेल्या ममता दीदी व त्यांची तृणमूल काँग्रेस तेथील मतदारांना पुन्हा एकदा आपल्या पक्षास मतदान करण्यास प्रेरित करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षातील काही खासदार व आमदार टीएमसीला सोडचिट्ठी देऊन व भाजपात सामील होऊन भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने परिस्थिती विपरीत झाली आहे. ह्या सर्वात पश्चिम बंगाल येथे टीएमसी व ममता बेनर्जी ह्यांची स्थिती काय होईल, ह्याचे उत्तर २३ मे ला मतमोजणी नंतरच मिळू शकेल. मात्र, आपण येथे तृणमूल काँग्रेसची कुंडली काय दर्शवित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 

तृणमूल काँग्रेसची कुंडली 

काय सांगतात तृणमूल काँग्रेसचे ग्रह
- गोचरीचे शनी व केतू तृणमूल काँग्रेसच्या जन्मस्थ रवी वरून भ्रमण करत आहेत. 
- गोचर गुरु मतदानाच्या सुरवातीच्या दोन टप्प्यात जन्मस्थ रवी वरून भ्रमण करत आहे. 
- मतदानाच्या दिवशी पश्चिम बंगालसाठी गोचरीच्या चंद्राची स्थिती अनुकूल नाही. 
- सध्या तृणमूल काँग्रेसला राहू महादशेत शुक्राची अंतर्दशा आहे. 

कुंडलीतील ग्रह काय सांगत आहेत 
शनीचे सध्याचे गोचर असे दर्शवित आहे कि तृणमूल काँग्रेसला २०१४ प्रमाणे यश प्राप्ती होणे अवघड आहे. त्यांच्या खासदारांच्या संख्येत क्वचितच वाढ होईल. ग्रह दशेमुळे पक्षात विभाजन व भ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. इतकेच नव्हे तर पक्षा प्रति असलेला लोकांचा विश्वास व पाठिंबा टिकवून ठेवणे सुद्धा थोडे कठीण काम आहे. ग्रहस्थितीमुळे कोणत्याही पक्षाशी आघाडी होऊ शकली नाही, जे टीएमसीच्या विरोधात जाऊ शकते. इतकेच नव्हे तर विरोधी पक्ष सुद्धा आपली बाजू भक्कम करतील कि ज्यामुळे टीएमसीला महत्वाच्या जागा गमवाव्या लागू शकतात. 

निष्कर्ष 
एकंदरीत असे म्हणता येईल कि ग्रहस्थितीमुळे टीएमसीला आपले पूर्वीचे स्थान टिकवून ठेवण्यास खूप परिश्रम करावे लागतील. ह्या व्यतिरिक्त ग्रहदशेमुळे त्यांना ह्या कार्यात अपेक्षित यश मिळू शकणार नाही. ह्या निवडणुकीत टीएमसीला काही जागा गमवाव्या लागू शकतात. 

आचार्य भट्टाचार्य ह्यांच्या इनपुट सह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी 
(एस्ट्रो लोकमत डॉट कॉम)