स्मृती इराणी ह्यांची कुंडली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकी संदर्भातील निर्देशन


२०१४ साली स्मृती इराणी ह्यांची जेव्हा मोदींच्या मंत्री मंडळात वर्णी लागली तेव्हा पासून वादाशी त्यांचे नाते घट्ट बनले आहे. त्यांच्या पदवीच्या बाबतीत सतत चर्चा होऊन त्यांना त्यांच्या पहिल्या मनुष्यबळ विकास  मंत्री पदावरून दूर सारून वस्त्रोद्योग मंत्रीपद बहाल करण्यात आले. अजूनही त्या या ना त्या कारणाने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतच असतात. केंद्रात पाच वर्ष मंत्रिपद उपभोगलेल्या स्मृती इराणी ह्यांचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार आहे, ते त्यांच्या कुंडली वरून जाणून घेऊ. 

स्मृती इराणी ह्यांची कुंडली 
जन्म दिनांक :- २३ मार्च १९७६. 
जन्म वेळ :- १०. ०० (अंदाजे). 
जन्म स्थळ :- दिल्ली. 


स्मृती इराणी ह्यांच्या कुंडलीतील बुध - शुक्र युती 
स्मृती इराणी ह्यांच्या कुंडलीत दशमात बुध व शुक्र ह्यांच्यातील युती हा एक विशेष राजयोग आहे. त्यांच्या कुंडलीत शुक्र हा वर्गोत्तम सुद्धा आहे, ज्यामुळे त्या आकर्षक दिसतात. त्याच बरोबर त्या उत्तम वक्ता सुद्धा झाल्या आहेत. द्वितीयातील बुधाच्या राशीतील मंगळ त्यांना राजकीय दृष्टया उत्तम वक्ता बनवतात. मंगळामुळे एखाद्या चर्चे दरम्यान त्यांच्या तोंडून एखादा चुकीचा शब्द निघून वाद निर्माण होतात. रागाच्या भरात सुद्धा त्यांच्या तोंडून असे काही शब्द निघतात कि ज्यामुळे वादास वाचा फुटते.
 
फायदेशीर असलेला वक्री शनी 
त्यांच्या तृतीयात शनी वक्री अवस्थेत स्थित असून तो दशमाधिपती आहे, जो त्यांना महत्वाकांक्षी व उद्योगी बनवितो. मात्र, वक्री शनी जीवनात अधून मधून त्रासदायी सुद्धा ठरतो. लाभातील रवी त्यांचे राजकीय जाळे अधिक बलवान करतो. षष्ठातील राहू शत्रुहर्ता आहे. स्मृती ह्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती त्यांना उत्तम राजकीय नेतेपद बहाल करते. 

स्मृती इराणी ह्यांना फायदेशीर ठरणारी राहूची महादशा   
स्मृती इराणी ह्यांच्या कुंडली नुसार सध्या त्यांना राहू महादशेत राहूची अंतर्दशा चालू आहे. स्मृती इराणी ह्यांच्या राजकीय प्रवासासाठी हा कालखंड उत्तम समजला जाऊ    शकतो. त्यांना अनेक चांगले परिणाम मिळू शकतात. आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्यात त्या यशस्वी होऊ शकतील. परंतु अनुकूल दशा असून सुद्धा ह्या वर्षी म्हणजे २०१९ साली त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जन्मस्थ चंद्रावरून गोचरीने होणारे शनीचे भ्रमण त्रासदायी ठरू शकेल. त्यातच ह्या शनीची केतूशी युती होत आहे. त्यामुळे स्मृती इराणी ह्यांच्या जीवनात अचानक एखादे मोठे परिवर्तन होण्याचे संकेत मिळत आहेत. नरेंद्र मोदी ह्यांच्या निवडणूक अभियानात त्यांची भूमिका महत्वाची असेल, परंतु त्याच बरोबर वाद सुद्धा निर्माण होतील. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत त्यांची उपस्थिती दिसून येईल, परंतु गोचराच्या प्रभावामुळे तितकेसे चांगले परिणाम मिळू शकणार नाहीत. 

आचार्य भारद्वाज ह्यांच्या इनपुटसह
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी