शिवराज सिंह चौहान कुंडली - मध्य प्रदेश निवडणूक २०१८


प्रतिकूल ग्रह दशा असून सुद्धा शिवराज ह्यांची नाव होऊ शकते पार 

पाच राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकी नंतर मध्य प्रदेशात सुद्धा मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येथे बुधनी ह्या विधानसभेच्या जागेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आपले नशीब अजमावत आहेत. ह्या जागेवरून ते तीनदा आमदारपदी निवडून आले आहेत. सर्व पाच राज्यातील निवडणुकी नंतर ११ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भाजपाचे नेते व संघाशी संबंधित शिवराज सिंह चौहान ह्यांच्या राजकीय प्रवासावर ज्योतिषीय दृष्टिकोनातून नजर टाकल्यास असे दिसते कि सध्या शनीच्या महादशेत बुधाच्या अंतर्दशेचा प्रभाव आहे. इतकेच नव्हे तर गोचरीचा शनी, साडेसातीचे मार्गक्रमण करत आहे. शनीचे हे मार्गक्रमण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ह्यांच्यासाठी प्रतिकूल आहे व त्यामुळे त्यांचा मार्ग खडतर असू शकतो. आपली स्थिती मजबूत करण्यासाठी त्यांना कठीण परिस्थितीचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. मात्र भाजपाने त्यांना त्यांच्या पारंपरिक बुधनी येथूनच निवडणुकीचे तिकीट देऊन त्यांचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. अशावेळी परत एकदा निवडणूक जिंकून शिवराज सिंह चौहान सत्ता काबीज करण्यात सफल होतील का ? शिवराज सिंह चौहान ह्यांच्या कुंडली वरून हे जाणून घेऊ –

शिवराज सिंह चौहान 
जन्म दिनांक:५ मार्च १९५९. 
जन्म वेळ:१२ वाजता 
जन्म स्थळ:बुधनी, भारत 
शिवराज सिंह चौहान ह्यांची कुंडली 

ज्योतिषीय गणना - मुख्यमंत्री शिवराज ह्यांची कुंडली 

शिवराज सिंह चौहान ह्यांच्या जन्म कुंडलीचे विश्लेषण करताना असे दिसते कि ग्रहांच्या स्थितीनुसार सत्तेच्या जवळपास पोचण्याचा प्रवास ह्या खेपेस त्यांच्यासाठी कठीण असू शकतो. त्यांना आपला मार्ग सुकर बनविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. आता ह्या ग्रह स्थितीचा थोडा खोलवर जाऊन अंदाज घेऊ, ज्यामुळे आपणास संपूर्ण फलादेश समजणे सोपे जाईल. 
१. सध्या शिवराज सिंह चौहान हे शनी महादशेत बुधाच्या अंतर्दशेतून प्रवास करीत आहेत. शनी योगकारक ग्रह असून तो अष्टमात स्थित आहे. बुध, उच्चीच्या शुक्रासह स्थित असूनही केतूने पीडित आहे. 
२. शनी शिवराज सिंह ह्यांच्या कुंडलीत प्रतिकूल अवस्थेतून पुढे जात असून तो साडेसातीच्या पर्वातून सुद्धा मार्गक्रमण करत आहे. 
३. गोचरीचा गुरु जन्मस्थ गुरु वरून भ्रमण करत असून त्याची दृष्टी बुध व शुक्र ह्या दोघांवरही आहे. 
४. २८ नोव्हेंबर २०१८ ला मतदान झाले. ह्या दिवशी चंद्र गोचरीच्या राहूच्या युतीत होता. व केतू जन्मस्थ चंद्रा वरून भ्रमण करत होता. 
५. मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर २०१८ रोजी गोचरीचा चंद्र केतूसह उत्तराषाढा नक्षत्रातून भ्रमण करेल. 

शनीचे गोचर कठीण, परंतु मार्ग सोपा 
शनीच्या गोचरीचा प्रभाव मुख्यमंत्री शिवराह सिंह चौहान ह्यांच्यासाठी प्रतिकूल राहील. त्यामुळे त्यांचा मार्ग अवघड होऊ शकतो. त्यांना स्वतःची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. ते आपणास समर्थन मिळविण्यासाठी संघर्ष करतील, व तेथे सुद्धा कमतरता जाणवेल. मात्र, गुरु दृढपणे त्यांच्या बाजूने वाटचाल करत असून त्याची बुध व शुक्रावर असलेली दृष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांच्या बाजूने सकारात्मक प्रभावाची शक्यता वाढीस लागेल. ते मध्य प्रदेशात विरोधी पक्षासाठी सहजपणे आपली जागा सोडणार नाहीत. त्यांचा मूळ पक्ष सध्या प्रतिकूल दशेतून मार्गक्रमण करत आहे. मतदानाच्या दिवशी असलेली चंद्र - राहूची युती काहीसे आश्चर्य घडण्याकडे निर्देश करत आहे. चंद्र - राहू युती नेहमीच आश्चर्य निर्माण करत असते. त्यामुळे आगामी निवडणूकीत "एखादे आश्चर्य कारक तत्व" दडलेले असेल. ह्या व्यतिरिक्त, निकालाच्या दिवशी चंद्र - केतू युती, काही निवडणूक क्षेत्रात अकल्पित परिणामांकडे अंगुली निर्देश करत आहेत. अशातच हि निवडणूक त्यांच्यासाठी एका परीक्षे समान ठरेल. असे असले तरी अनेक आव्हाने पार करत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवून ठेवण्यास सकारात्मक संधी आहे. 

गणेशाच्या आशिर्वादासह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी