खामोश होतील कि खामोश करतील शत्रुघ्न, वाचा विशेष भविष्यवाणी

लोकसभा निवडणूक २०१९ हि अनेक कारणांनी वेगळी आहे. काही अशा जागा आहेत कि तेथे तुल्यबळ लढत आहे. मात्र, बिहार येथिल पटना हा मतदार संघ काही वेगळाच असल्याचे ह्यासाठी म्हटले जाते कि येथे लढत अशा एका व्यक्तीशी आहे कि जो आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला आहे. आम्ही येथे भाजपाचे माजी खासदार व बॉलिवूड अभिनेता श्री. शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या विषयी सांगत आहोत. ह्या खेपेस ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या समोर भाजपाने दिग्गज नेते श्री. रविशंकर प्रसाद ह्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. आता श्री. शत्रुघ्न व श्री.रविशंकर प्रसाद ह्यांची कुंडली काय सांगत आहे ते बघू. 

श्री. शत्रुघ्न सिन्हा व श्री. रविशंकर प्रसाद, पटना साहिबची जागा, निवडणूक दिनांक: १९ मे २०१९ 
श्री. शत्रुघ्न सिन्हा ह्यांची कुंडली 
जन्म दिनांक: ९ डिसेंबर १९४५
जन्म वेळ: उपलब्ध नाही. 
जन्म स्थळ: पटना, बिहार, भारत. 
श्री. रविशंकर प्रसाद ह्यांची कुंडली 
जन्म दिनांक: ३० ऑगस्ट १९५४ 
जन्म वेळ: उपलब्ध नाही. 
जन्म स्थळ: पटना, बिहार, भारत. 


श्री. शत्रुघ्न सिन्हा व श्री. रविशंकर प्रसाद ह्यांच्या कुंडलीचे विश्लेषण 
येथे सर्व प्रथम माजी भाजपा नेते व सध्याचे काँग्रेसचे उमेदवार श्री. शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या रवी कुंडलीचे विश्लेषण करू. कुंडलीचे विश्लेषण करता दिसून येते कि ते शनी साडेसातीच्या प्रथम पर्वाच्या अंमलाखाली वावरत आहेत. त्यांच्या अष्टमात राहू आहे. सध्या जमस्थ राहुवरुन गोचरीचा राहू भ्रमण करत आहे. त्यामुळे असे दिसते कि जरी त्यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान काही अंशी लोकांना आकर्षित केले तरी त्याचे परिवर्तन विजयात होऊ शकणार नाही. त्याच प्रमाणे निवडणुकीच्या दिवशी सुद्धा त्यांच्या कुंडलीतील ग्रह बलवान नसल्याने त्यांना अपेक्षित यश मिळणे अवघड आहे. 

श्री. रविशंकर प्रसाद ह्यांना मिळेल ग्रहांचे पाठबळ 
दुसरीकडे श्री. रविशंकर प्रसाद ह्यांच्या रवी कुंडलीचे विश्लेषण करताना असे दिसून येते कि सध्या गोचरीचा गुरु त्यांच्या कुंडलीतील राजकारणाशी संबंधित दशमस्थानावर दृष्टी टाकत आहे. मात्र, लाभस्थानातून राहूचे गोचर भ्रमण होत असून शनीची सुद्धा लाभस्थानावर दृष्टी आहे. श्री. रविशंकर प्रसाद ह्यांच्या कुंडलीतील हि ग्रहस्थिती अनुकूलता दर्शवित आहे. त्यामुळे, श्री. रविशंकर प्रसाद ह्यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचे दिसत आहे. मात्र, ग्रहस्थितीनुसार त्यांच्या विजयात खूप मोठे अंतर असणार नाही. 

काय असेल पटना साहिब येथील लोकसभा निवडणुक निकाल
श्री. रविशंकर प्रसाद व श्री. शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्या कुंडलीचे विश्लेषण केल्यावर गणेशजींना लोकसभा निवडणुकीत श्री. रविशंकर प्रसाद ह्यांच्या विजयाची शक्यता असल्याचे दिसत आहे. 

आचार्य भट्टाचार्य ह्यांच्या इनपुट सह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम 
(गणेशास्पीक्स डॉट कॉम चमू)