शनी केतू युतीचा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांवर पडणारा प्रभाव


भारतासाठी २०१९ हे महत्वपूर्ण वर्ष ठरणार आहे. ह्या दरम्यान येथील सार्वत्रिक निवडणुकांवर संपूर्ण जगाची नजर खिळून राहील. आत्ता पासूनच २०१९ च्या सार्वत्रिक  निवडणुकांनी लोकांच्या मनाचा ताबा मिळविण्यास सुरवात केली आहे.   पुढील पंतप्रधान कोण असेल ह्याची चर्चा सत्ताधार्यां पासून ते प्रत्येक शहरातील गल्ली बोळा पर्यंत होत आहे. त्यातच आकाशस्थ ग्रहांची स्थिती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अनपेक्षित निकालांकडे अंगुली निर्देश करत आहे. 

शनी केतूची युती - निवडणुकीत  अनपेक्षित परिवर्तन

७ मार्च २०१९ रोजी धनु राशीत शनी व केतू ह्यांची युती होणार आहे. भारतात एप्रिल - मे दरम्यान होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ह्या युतीचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. शनी न्यायाचा अधिपती आहे. शनीसाठी जवाबदारी व शिस्त पालन महत्वाचे आहे. तर केतू हा उद्दिष्टांच्या बाबतीत अस्पष्ट व अपारंपरिकता दर्शविणारा आहे. दोन्ही ग्रहांना क्रूर ग्रह म्हणूनच समजण्यात येते. शनी लोकशाहीचा कारक आहे. जेव्हा शनी हा केतूशी युती करतो तेव्हा तो अत्यंत अपरिपक्व होत असतो. शनी आपला मूळ गुणधर्म सोडून एक वेगळेच असे अनपेक्षित कार्य करतो. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व त्यांचे प्रतिस्पर्धी श्री.  राहुल गांधी ह्यांच्यासाठी ह्या युतीमुळे आगामी कालखंडाकडे पाहिले जाऊ शकते. मार्च २०१९ ला होणारी हि युती काही नाट्यमयरित्या अनपेक्षित परिवर्तन घडवू शकेल. 

१९९६ : शनी - केतूने घडवले होते मोठे फेरबदल 

शनी - केतूच्या ह्या युतीचा आगामी निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यापूर्वी इतर निवडणुकांवर नजर टाकली पाहिजे. १९९६ च्या एप्रिल - मे दरम्यान झालेल्या निवडणुकीच्या वेळेस शनी - केतू ची युती हि मीन राशीस होती. त्यावेळेस कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते व भारतीय जनता पक्षाने श्री. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या नेतृत्वात फक्त १३ दिवसांचे अल्पकालीन सरकार स्थापित केले. ह्यास राजकीय अनिश्चिततेचा कालखंड म्हटले जाऊ शकले असते. ह्या अगोदर १९८४ ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांच्या मृत्यू पश्चात डिसेंबर महिन्यात निवडणूका झाल्या होत्या. त्यावेळेस शनी - केतू युती वृश्चिक राशीस होती. त्यावेळेस श्री. राजीव गांधी ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने खूप मोठे यश मिळविले होते. त्या अगोदर १९६२ च्या निवडणुकीत शनी - केतू युती हि मकर राशीस होती व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना आपल्या तिसऱ्या व अंतिम निवडणुकीत एकतर्फी यश प्राप्त झाले होते. 
ह्या तिन्ही निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात कि शनी - केतू युती असता झालेल्या निवडणुकीत एकतर एखाद्या पक्षास एकतर्फी यश प्राप्ती होते किंवा कोणालाही स्पष्ट बहुमत मिळत नसते.
 

लोकसभा निवडणूक २०१९ : अनिश्चिततेची निवडणूक 

ह्या वर्षी शनी - केतू ह्यांच्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलू शकतात. कदाचित हि निवडणूक भाजपासाठी एकतर्फी होऊ शकते. किंवा काँग्रेससाठी अनपेक्षित निकाल मिळताना दिसू शकते. त्यातच एक असे हि दिसते कि १९९६ प्रमाणे लहान पक्षांच्या मदतीने मिश्र सरकार स्थापित होऊ शकते. हे बघणे खरेच मनोरंजक होईल. शनी - केतू ह्यांच्या युती खेरीज काँग्रेस व भाजपा ह्यांची कुंडली व येणाऱ्या कालखंडातील गोचर ग्रहस्थिती ह्यांचा सुद्धा निवडणुकीवर मोठा प्रभाव पडू शकतो, ज्या विषयी आपण वेगळी चर्चा करू. ह्या सर्वात एक गोष्ट नक्की जाणवते कि २०१९ च्या  सार्वत्रिक निवडणुकीची इतिहासात विशेषरूपाने नोंद घेतली जाईल, जी आगामी अनेक वर्षां पर्यंत आपल्या स्मरणात राहील. 

आचार्य भारद्वाज ह्यांच्या इनपुट सह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी