लोकसभा निवडणूक २०१९ : कोण बाजी मारेल उत्तर मध्य मुंबईत पूनम कि प्रिया

लोकसभा निवडणुकीमुळे देशासह महाराष्ट्रातील वातावरण सुद्धा तापलेले आहे. सर्वचजण आपण विजयी होणार असे सांगत आहे. अंदाज सुध्दा बांधले जात आहेत, मात्र निकाल तर २३ मे रोजी लागणार आहे. अशातच आपण जर उत्तर मध्य मुंबईचा अंदाज घेतला तर असे दिसून येते कि येथे तीव्र स्पर्धा आहे. ह्या जागेवर देशातील दोन राष्ट्रीय पक्ष काँग्रेस व भाजपा ह्यांच्या दोन दिग्गज महिला नेत्या प्रिया दत्त व पूनम  महाजन आपले नशीब अजमावून बघत आहेत. जनता कोणाला कौल देईल हे तर नंतर समजेलच, मात्र येथे ज्योतिषीय विश्लेषण करून आपण ते जाणून घेऊ. श्रीगणेशजी ह्यांचे काय म्हणणे आहे ते बघू. 

पूनम महाजन ह्यांची कुंडली 
पक्ष: भाजपा 
निवडणुकीचे क्षेत्र: मुंबई, उत्तर मध्य, महाराष्ट्र. 
जन्म दिनांक: ९ डिसेंबर १९८०
जन्म वेळ: माहित नाही. 
जन्म स्थळ: मुंबई, महाराष्ट्र. 

प्रिया दत्त ह्यांची कुंडली 
पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवडणुकीचे क्षेत्र: मुंबई, उत्तर मध्य, महाराष्ट्र. 
जन्म दिनांक: २८ ऑगस्ट १९६६ 
जन्म वेळ: माहित नाही. 
जन्म स्थळ: मुंबई, महाराष्ट्र. 

ज्योतिषीय विश्लेषण 
पूनम महाजन ह्यांच्या रवी कुंडलीत त्यांचा जन्मस्थ रवी व बुध हे वृश्चिकेत युतीयोगात आहेत. सध्या गुरुचे ह्या दोन ग्रहांवरून गोचरीने भ्रमण होत असून महत्वाच्या स्थानांवर अनुकूल दृष्टी सुध्दा आहे. त्यामुळे त्यांचे कुशल नेतृत्व त्यांच्या पक्षाला प्रोत्साहित करेल. मतदार संघात आपली एक प्रतिमा निर्माण करेल. ग्रहांच्या अशा अनुकूल स्थितीमुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे. मात्र, शनीच्या साडेसातीमुळे मध्यंतरी निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांना प्रचंड ताण व त्रासाला सामोरे जावे लागू शकते व त्यामुळे मतदाताना आकर्षित करण्यासाठी त्यांना अत्यंत हुशारीने परिश्रमपूर्वक काम करावे लागत आहे. 
आता, प्रिया दत्त ह्यांच्या कुंडलीकडे बघता त्यांच्यावर सुद्धा साडेसातीचा प्रभाव असल्याचे दिसत आहे. त्याच बरोबर इतर ग्रहांची बैठक प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी संघर्ष व त्रास सहन करावा लागण्याकडे अंगुली निर्देश करत आहेत. मात्र, गुरुचे भ्रमण त्यांना आपल्या मतदार संघातील व केंद्रीय राजकारणातील आपल्या प्रतिमेस उज्ज्वल करण्यास मदतरूप होईल. त्यांना सध्या आपल्या प्रतिस्पर्ध्यास पराभूत करताना अनेक अडथळे व तीव्र स्पर्धेस सामोरे जावे लागू शकते. 

प्रिया व पूनम ह्यांच्यासाठी भविष्यवाणी (ज्योतिषीय विश्लेषण)
वरील ग्रहस्थिती असे निर्देश करत आहे कि प्रिया दत्त ह्यांची कामगिरी त्यांच्या पक्षाच्या अपेक्षेनुसार होणार नाही. त्यामुळे पूनम महाजन ह्यांच्यावर मात करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागेल. ह्या उलट पूनम महाजन ह्यांचे ग्रहमान बघता त्यांना सत्ता ग्रहण करण्यात ग्रहांची साथ मिळेल व त्याच बरोबर त्यांना एक उत्तम राजकारणी बनवेल. 

निष्कर्ष 
ह्या विश्लेषणावरून श्रीगणेशजींना असे वाटते की ह्या तीव्र स्पर्धेत उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन ह्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. 

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
आचार्य भारद्वाज ह्यांच्या इनपुट सह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी