२०१९ ला पंतप्रधान मोदी ह्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची कितपत संधी आहे ? वाचा

अबकी बार मोदी सरकार ह्या पासून ते मै हूँ चौकीदार पर्यंतचा पाच वर्षांचा प्रवास पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्यासाठी तितकासा सोपा नव्हता. रंगीन स्वप्ने दाखवून सत्ता ग्रहण केलेले श्री. मोदी ह्यांनी आपल्या प्रत्येक भाषणात ठासून सांगितले कि आजवर ते ६० वर्षांपासून साचून राहिलेली घाण काढत होते. ह्या खेपेस त्यांनी जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी २०२३ पर्यंतची वेळ मागितली आहे. विरोधी पक्ष, पंतप्रधान श्री. मोदी दुर्बल केव्हा होतात व त्यांच्यावर तीव्र वार केव्हा करता येईल ह्याची वाट पाहात आहेत. असे असले तरी नोटाबंदी व जिएसटी सारख्या प्रमुख निर्णयांवर तीव्र विरोधास श्री. मोदी ह्यांना सामोरे जावे लागल्याने त्यांच्यासाठी २०१९ ची निवडणूक कशी असेल हे आपण जाणून घेऊ. 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांची कुंडली 
नांव:- श्री. नरेंद्र मोदी 
जन्म दिनांक:- १७ सप्टेंबर, १९५०
जन्म वेळ:- १०. ०० (अंदाजे)
जन्म स्थळ:- वडनगर (गुजरात)


श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या कुंडलीचे विश्लेषण 
सध्या श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या कुंडलीत चंद्र महादशा अंतर्गत मंगळाची अंतर्दशा चालू आहे. मिथुन राशीतून भ्रमण करत असलेला राहू हा श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. गोचरीचे शनी व केतू हे तृतीयातून भ्रमण करत आहेत. निवडणुकी दरम्यान त्यांच्या जन्मस्थ चंद्र व मंगळा वरून गोचरीचा गुरु भ्रमण करत आहे. 

लोकसभा निवडणूक २०१९ साठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या कुंडलीनुसार भविष्यवाणी
सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या बाबतीत बघत असता श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या कुंडलीतील गोचर ग्रह व जन्मस्थ सर्व ग्रह त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या दिवशी चंद्राची स्थिती सुद्धा त्यांना अनुकूल आहे. जो त्यांच्या भव्य विजयाकडे अंगुली निर्देश करत आहे. त्यांच्या वक्तृत्वकलेने लोक प्रभावित होतील. जनतेशी संबंधित मुद्दे निवडणुकीत पुढे करावयाचे असो किंवा जनतेच्या भावनांना हात घालावयाचा असो, श्री. नरेंद्र मोदी ह्यांचा त्यात हातखंडा आहे. त्यांच्या ह्याच गुणांना ग्रह आणखीनच पाठिंबा देतील. त्यामुळे आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भव्य विजय होईल. 

श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या बद्धलचा निष्कर्ष 
ह्या वर्षीची ग्रहांची बैठक पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या विजयास पूर्ण पाठिंबा असल्याचे दर्शवित आहे. ते लोकसभा २०१९ च्या निवडणुकी दरम्यान स्वतःसाठी व त्यांच्या पक्षासाठी भाग्यवान असल्याचे सिद्ध होईल. 

आचार्य भट्टाचार्य ह्यांच्या इनपुट सह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी