श्री. नितीन गडकरी ह्यांची कुंडली व सार्वजनिक निवडणूक २०१९ चे भवितव्य

आपल्या स्वप्नातील प्रकल्पांद्वारे अच्छे दिन ह्यांची तयारी करताना श्री. नितीन गडकरी हे मोदी सरकारातील सर्वात अधिक चर्चेत असलेले मंत्री आहेत. सध्याच्या काळातच माध्यमांनी त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या स्वप्नांवरून खूप चर्चा केली. ज्याचे त्यांनी खंडन सुद्धा केले. बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्याने पक्षीय वाद असल्याचे दिसून आले. मात्र लोकसभा निवडणूक २०१९ ला ते पुन्हा एकदा नागपूरहून आपले नशीब अजमावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांना खूप कष्ट करावे लागत आहेत. तरी सुद्धा २०१९ च्या ह्या महा संग्रामात श्री.  नितीन गडकरी ह्यांचे भवितव्य काय आहे हे आपण जाणून घेऊ. 

श्री नितीन गडकरी ह्यांची कुंडली 
जन्म दिनांक:- २७. ०५. १९५७ 
जन्म वेळ:-०६. ०० (अंदाजे)
जन्म स्थळ:- नागपूर 

श्री. नितीन गडकरी ह्यांच्या कुंडलीचे विश्लेषण 
श्री. नितीन गडकरी ह्यांच्या कुंडलीत रवी व शनी ह्यांच्यात प्रतियुती आहे. हि प्रतियुती त्यांना निडर बनविते व लोकांसाठी लढणार्या नेत्याच्या रूपात पुढाकार देते. हीच प्रतियुती त्यांना आपल्या कामाप्रती समर्पण भाव अर्पित करते. चतुर्थातील गुरुची दृष्टी व्ययातील चंद्रावर आहे. त्यामुळे प्रशासकीय बाबतीत त्यांना यश प्राप्ती होते. मिथुनेचा मंगळ त्यांना तीव्र बुद्धिमत्ता देतो. परंतु अनेकदा त्यांचे एखादे वक्तव्य वादास कारणीभूत सुद्धा ठरते. षष्ठातील राहू विरोधकांवर मात करू देतो. त्यातच सप्तमावर दृष्टी टाकणारा शुक्र सार्वजनिक जीवनातील त्यांचे संबंध दृढ करतो. 

लोकसभा निवडणूक २०१९ साठी भविष्यवाणी 
लोकसभा निवडणूक २०१९ चा विचार करता सध्या गोचरीने शनी - केतू युती हि जन्मस्थ मंगळाच्या प्रतियुतीत आहे. त्यातच राहूचे भ्रमण हे मंगळा वरून होत आहे, जे जन्मस्थ चंद्राच्या तृतीयातून आहे. हि ग्रहस्थिती त्यांना आगामी लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत अत्यंत फायदेशीर ठरणारी आहे. ३० मार्च ते २३ एप्रिल दरम्यान गुरु व शनीचे होणारे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायी आहे. गोचरीच्या गुरुची दृष्टी जन्मस्थ रवी व शुक्रावर आहे. त्यामुळे ते ह्या निवडणुकीत नागपूरहून मोठ्या फरकाने विजयी होतील. 

आचार्य आदित्य ह्यांच्या इनपुटसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी