श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आधुनिक काळातील एक अत्यंत अनाकलनीय असे उदयास आलेले नेते आहेत. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विस्ताराच्या नवनवीन कल्पना ह्या मागील काही वर्षात यशस्वी झाल्या असून त्यांना सर्वतोपरी मान्यता मिळाली आहे. आता जेव्हां श्री नरेंद्र मोदी आपला ६८ वा वाढदिवस साजरा करतील तेव्हां श्रीगणेशानी त्यांच्या भविष्याचा विश्लेषणात्मक वेध घेतला आहे. 
मुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस आहे. आता श्री मोदी ह्यांच्या समोर येत्या एक वर्षात काय वाढून ठेवले आहे हे पुढे वाचत राहा.
 
श्री. नरेंद्र दामोदरभाई मोदी ह्यांचे जन्मटिपण.
जन्म दिनांक:१७ सप्टेंबर १९५०.
जन्म वेळ:१०.००.०० (नक्की माहित नाही).
जन्म स्थळ:वडनगर, गुजरात, भारत.
 
हस्तलिखिता शिवाय ऐनवेळी सुचलेले भाषण करण्याची कला.
श्रीगणेशा ह्यांच्या निदर्शनास आले आहे कि श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या द्वितीय स्थानात चंद्र व मंगळ हे दोन ग्रह बिराजमान आहेत. द्वितीय स्थान हे वाचास्थान म्हणून ओळखले जाते. चंद्र हे निर्देशित करतो कि श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या मनाचे ऐकून आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करू शकतात. इतकेच नव्हे तर जनतेसमोर पूर्वलिखित भाषण करण्यास त्यांना अजिबात आवडत नाही. ह्या त्यांच्या संपर्क कौशल्याची त्यांना पूर्वी खूप मदत झाली व ती अशीच भविष्यातही चालूच राहील.
 
शब्दखेळीने लोकांच्या मनावर त्यांचे नियंत्रण राखून ठेवण्यास त्यांना मदत होईल. 

चंद्र व मंगळ ह्यांची युती ह्याच्या विशेष गुणधर्मामुळे श्री. नरेंद्र मोदी हे प्रभावी वाक्यरचना पद्धतशीरपणे  व कौशल्य पूर्वक करू शकतात. श्री. मोदी हे काही शब्दांवर, वाक्यांवर जोर देऊन आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकतात. श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या ह्या कौशल्यामुळे बहुसंख्य लोकांना नियंत्रित ठेवू शकतात हे त्यांच्या जन्मटिपणा वरून दिसते. 

दूरदृष्टीपणा हा त्यांचा मोठा ठेवा आहे. 
ह्याव्यतिरिक्त, चंद्राचे नक्षत्र हे शनी कि जो त्यांचा आत्माकारक ग्रह आहे, त्याचे असून त्याची युती शुक्राशी आहे. त्यामुळे, श्री नरेंद्र मोदी हे आपले विचार स्पष्टपणे मांडून व प्रभावीपणे आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकतात. त्यांच्याकडे भविष्या विषयी दूरदृष्टीपणा असून ते योग्य पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार विश्लेषण केल्यास श्री. नरेंद्र मादी ह्यांची मानसिक दूरदृष्टी हाच त्यांचा मोठा ठेवा असल्याचे दिसून येते. 

सीमापारहून होत असलेल्या दहशतवादा विरुद्ध कडक पाऊले उचलण्याची शक्यता दिसत आहे. 

चंद्र व बुध ह्यांच्या संयोगाने त्यांना उत्साहित व बहिर्मुख बनविले आहे. त्यामुळे ते एखादे महत्वाचे पाऊल देशाच्या व समाजाच्या विकासासाठी उचलण्याची शक्यता दिसत आहे. श्री. नरेंद्र मोदी हे खूप मोठे बदल आर्थिक आघाडीवर घडवून आणतील. ह्या व्यतिरिक्त सीमापारून होत असलेला दहशतवाद संपुष्टात आणण्याचा ते प्रयत्न करतील.

अनेक आघाडयांवर यश दिसत आहे.
मूळच्या चंद्र व मंगळावरून गोचरीने होणारे गुरुचे भ्रमण भारतात व विदेशात त्यांच्या लोकप्रियतेत व आदरात भर घालेल. त्याच बरोबर त्यांना काही काळजी सुद्धा लागून राहील. तरी सुद्धा ते अनेक आघाडयांवर यशस्वी होतील. २०१९ दरम्यान श्री. नरेंद्र मोदी ह्यांना भरपूर प्रवास करण्याची गरज भासेल. हे सर्व त्यांच्या जन्मटिपणा बद्धल झाले. आपणास आपले ग्रहमान काय सांगतात ते जाणून घ्यावयाचे आहे का ? आपला वाढदिवसाचा अहवाल मागवून घ्या. 

आपल्या पक्ष सदस्यांचा पाठींबा मिळवू शकतील. 
एकंदरीत, ग्रहांची स्थिती त्यांना अधिक आनंदात ठेवेल. त्यांच्या धोरणास मान्यता मिळून त्याचे कौतुक होईल. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना त्यांच्या कुटुंबियांचे सहकार्य व पाठिंबा सुद्धा मिळेल. त्यांच्या नवीन कल्पनांचे सकारात्मक परिणाम मिळताना दिसून येतील. 

सामाजिक व जातीय ऐक्य घडवून आणतील
आव्हाने कितीही असली तरी श्री नरेंद्र मोदी हे त्यांना सामोरे जाऊन यशस्वी होतील. येणारा काळ हा त्यांच्यासाठी उत्तम असल्याचे दिसून येईल. ते देशात सामाजिक, सांस्कृतिक व जातीय सलोखा निर्माण करू शकतील. 


श्री गणेशकृपेने, 
आचार्य भट्टाचार्य
धी गणेशास्पीक्स. कॉम चमू.