सर्वात अचूक भविष्यवाणी: कोण जिंकेल २०१९ ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी कि राहुल गांधी

लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान पुनः मोदी सरकार कि आता कांग्रेसचे सरकार अशा प्रकारच्या चर्चा घरा घरात होत आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) मोदी सरकारच्या कामगिरीची बलस्थाने दाखवून, तर काँग्रेस पक्ष नोटाबंदी व जीएसटी ह्यातील कमतरता दर्शवून जनतेकडे मत मागत आहेत. सध्या आकाशस्थ ग्रहमान भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकां बद्धल काय दर्शवित आहेत हे आपण जाणून घेऊ या. 

निवडणुकीचा निकाल म्हणजेच २३ मे ची ग्रहस्थिती 
सध्या घडलेल्या महत्वाच्या ग्रहांकिय घडामोडी 
२३ मार्च - राहूचा मिथुन राशीत प्रवेश
२९ मार्च - गुरूचा धनु राशीत प्रवेश 
१० एप्रिल - गुरु वक्री झाला
२२ एप्रिल - गुरूचा वक्री गतीने वृश्चिकेत पुनर्प्रवेश 
३० एप्रिल - शनी वक्री होणार
०७ मे - मंगळ मिथुनेत प्रवेश करेल जेथे राहू आधीपासूनच स्थानापन्न झाला आहे 

ह्याहून सुद्धा महत्वाचे हे आहे कि शनी व केतू एकमेकांच्या अगदी जवळ येतील 
एक लक्षात घेतले पाहिजे कि अशा प्रकारची ग्रहस्थिती निव्वळ दिड महिन्याच्या कमी कालावधीत होत आहे ज्या दरम्यान भारतात २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळेच ह्या निवडणुकीस आपल्या देशाच्या इतिहासात जास्त महत्व प्राप्त होत आहे. ह्या निवडणुकीच्या निकालांचा सुद्धा भारतावर दीर्घकाळ प्रभाव राहील. ह्या दरम्यान भारत सर्वात महत्वाच्या वळणावर येऊन पोचला आहे. 

सरकारचे थोडे नुकसान होईल 
गुरूच्या भ्रमणास खूप महत्व आहे. भारताच्या कुंडलीत गुरु हा अष्टमेश (प्रतिकूलतेचा स्वामी) आहे. त्यातच त्याचा संबंध ना दशमाशी येतो ना शनीशी. हि स्थिती सत्ताधारी सरकारास प्रगती साधण्याची उत्तम संधी देते. स्थिर सरकार होण्यासाठी लग्नेश बलवान असावयास हवा. मात्र, निकालाच्या दिवशी शुक्र व्ययातून भ्रमण करत आहे, जे सरकारसाठी प्रतिकूल आहे. 

शनी - केतू युतीने फायदा सुद्धा होऊ शकतो 
बलवान राहू व शनी हे स्थिर सरकार प्रदान करतात. राहू उच्चीचा असल्याने बलवान आहे, परंतु अष्टमातील शनी बलहीनता दर्शवित आहे. जे सरकारसाठी हानिकारक आहे. मात्र, शनी वक्री असल्याने त्याचा विपरीत प्रभाव पालटवू शकेल. सर्वात महत्वाचा कारक ग्रह शनी आहे, जो निकालाच्या दिवशी केतूच्या जवळ असल्याने एक जटिल ग्रहस्थिती निर्माण होईल. हि ग्रहस्थिती ह्या निवडणुकीत निर्णायक ठरेल. हि लोकसभा निवडणूक २०१९ ला काही आश्चर्यजनक निकाल लागण्याची शक्यता दर्शवित आहे. वृश्चिकेतील शनी व केतूची जवळपास होणाऱ्या युतीने १९८४ ला राजीव गांधी ह्यांना स्पष्ट बहुमत दिले होते. तर दुसरीकडे मीनेतील शनी - केतू युतीने १९९६ ला खंडित जनाधार दिला होता, मात्र हि युती जवळपास होत नव्हती. थोडक्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शनी अनेकांना त्रासदायी ठरू शकेल. 

बहुमत मिळेल मोदी सरकारला !!!
असे असले तरी शनी - केतू युती त्रिशंकू परिस्थितीकडे निर्देश करीत आहे. मला असे वाटते कि शनी - केतू घनिष्ठ संबंधांमुळे मोदी सरकारला मोठ्या बहुमताने पुन्हा सत्ता स्थापनेसाठी मदत होऊ शकेल. वक्री शनी - केतू युती सुद्धा एनडीएला वर्तमान जनादेश मिळण्यास मदत करू शकेल. एनडीएला सत्ता राखून ठेवण्याची संधी नक्कीच आहे. 

निकालाच्या दिवशी जटिल ग्रहांची बैठक 
ह्याच बरोबर निवडणुक निकालाच्या दिवशी चंद्र गोचरीच्या शनी व केतूशी जवळपास युती करेल. त्यावर मंगळाची पूर्ण दृष्टी असेल. अशा वेळेस येणाऱ्या निकालास समजून घेणे बरेच अवघड आहे. निकालाच्या दिवसाची कुंडली सत्ताधारी एनडीएला लाभदायी ठरण्याचे संकेत देत आहे. 

मंगळाचे विघटनकारी भ्रमण 
हे लक्षात घेतले पाहिजे कि निवडणूक निकाल येई पर्यंत मंगळाचे भ्रमण महत्वपूर्ण राहील. विशेषतः रोहिणी नक्षत्रातील मंगळाचे भ्रमण तणाव वाढवू शकतो. शनी - केतू युती ७ मे पासून मंगळ - राहू युतीच्या प्रतियोगात येईल. ७ एप्रिल ते २२ जून दरम्यान परिस्थिती अधिक संवेदनशील व जटिल होऊ शकते. २२ जून पर्यंतचा कालावधी जो निवडणुकी दरम्यान येत आहे तो अतिशय विघटनकारी होऊ शकतो. ह्या दरम्यान होणारी कोणतीही घटना लोकसभा निवडणूक निकालांवर महत्वाचा प्रभाव पाडू शकेल. 

भाजपा होईल मोठा पक्ष 
हि निवडणूक भारताच्या इतिहासात सर्वात महत्वाची ठरेल. ह्या निवडणुकीत भाजपा एकटाच सर्वात मोठा पक्ष होईल. एनडीए परत सत्ता स्थापित करू शकेल. एनडीए सध्याचा जनादेश ओलांडण्याची शक्यता आहे. 

आचार्य भारद्वाज ह्यांच्या इनपुट सह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी