२०१९ ची लोकसभा निवडणूक: हेमा मालिनी ह्यांच्यासाठीची भविष्यवाणी व त्यांच्या कुंडलीचे विश्लेषण


उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपा कडून २०१४ ला निवडणूक लढवून बॉलिवूडची अभिनेत्री हेमा मालिनी ह्यांच्यासाठी ह्यावेळेची निवडणूक थोडी अवघड असल्याचे दिसत आहे. मागील पाच वर्षात त्यांचा मथुरेतील सहभाग हा कमी असल्याने मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर येथील समस्या सोडविण्यात त्या असमर्थ सुद्धा राहिल्या आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ साठी त्यांची कुंडली काय दर्शवित आहे - 
हेमा मालिनी ह्यांची जन्म कुंडली 
नांव:- हेमा मालिनी 
जन्म दिनांक:  १६ ऑक्टोबर १९४८.
जन्म वेळ:  माहित नाही. 
जन्म स्थळ: अम्मानकुडी, भारत 


हेमा मालिनी ह्यांच्या कुंडलीचे विश्लेषण 
गणेशजींना असे दिसत आहे कि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शनी व केतू ह्यांचे गोचरीने होणाऱ्या भ्रमणामुळे त्यांचा जन्मस्थ गुरु प्रभावित होत आहे. त्यातच राजकारणासाठी महत्वाचे असलेले दशमस्थान हे राहूच्या गोचरीने प्रभावित आहे. ह्याहून सुद्धा महत्वाचे हे आहे कि सध्या गुरुचे गोचर भ्रमण त्यांच्या जन्मस्थ मंगळा वरून होत आहे. 

हेमा मालिनी ह्यांच्यासाठी भविष्यवाणी (ज्योतिषीय विश्लेषण)
ह्या सर्व ग्रहांचे होत असलेले संबंध पाहून गणेशजींना वाटते कि त्या स्थानिक मतदारांवर आपला प्रभाव पाडू शकतील व त्यांचे वलय ह्या निवडणुकीच्या वातावरणात सुद्धा उत्तम प्रकारे दिपून उठेल. मात्र, त्यांना प्रतिस्पर्ध्यांच्या तगड्या आव्हानांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. निवडणुकी दरम्यान कोणत्याही भाषणाच्या वेळी त्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. माध्यमे त्यांच्या विरुद्ध प्रचार करतील असे गणेशजींना वाटत आहे. परंतु, राहू व गुरुचे भ्रमण सध्या जरी संतोषजनक असले तरी इतर ग्रहांचे भ्रमण निवडणुकीत मोठ्या अंतराने स्पष्ट विजय मिळवून देण्यास तितकेसे अनुकूल नाही. 

हेमा मालिनी ह्यांच्यासाठी निष्कर्ष 
गणेशजींना स्पष्टपणे असे दिसत आहे कि ह्या सर्वात हेमा मालिनी काही विशिष्ट वर्गाची  मते आपल्या बाजूस वळविण्यात सक्षम होतील व काही अंशी प्रतिस्पर्ध्याच्या विजयाची  शक्यता कमी करू शकतील. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास ह्या निवडणुकीत त्यांच्या विजयाची आशा अंशतः दिसत आहे किंवा खूप कमी फरकाने त्या विजयी होऊ शकतील असे गणेशजींना वाटते. 

आचार्य भट्टाचार्य ह्यांच्या इनपुट सह 
गणेशा स्पीक्स डॉट कॉम / मराठी 
ऍस्ट्रो लोकमत डॉट कॉम