शनी - केतू युतीमुळे बीजेपीत होईल गडबड, काय होईल निवडणुकींवर त्याचा परिणाम

मागील पाच वर्षांपासून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्यामुळे देशातील सत्ता उपभोगीत असलेला भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपा पूर्ण आत्मविश्वासाने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. परंतु, मागील काही विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेला भाजपा श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या करिष्म्यावर पुन्हा सत्तेवर येण्याची अपेक्षा बाळगून आहे. ह्या निवडणुकीत भाजपाची कुंडली काय दर्शवित आहे ते आता बघू. 

भाजपाची कुंडली 

निवडणुकी दरम्यान भाजपाच्या कुंडलीतील ग्रहस्थिती 
- सध्या भाजपास चंद्र महादशा अंतर्गत मंगळ अंतर्दशा आहे. 
- निवडणुकी दरम्यान कुंडलीच्या दशमेश गुरुची गोचरीने दशमावर आपली पाचवी पूर्ण दृष्टी आहे.
- निवडणुकी दरम्यान राहू हा मंगळासह लग्नातून भ्रमण करत आहे. 
- भाग्येश शनी हा सध्या केतूसह सप्तमातून भ्रमण करत आहे. 
- मतदान समयी शुक्र उच्चीचा आहे. 
- निकालाच्या दिवशी शनी - केतू ह्यांच्या जोडीला चंद्र सुद्धा असणार आहे. 

भाजपासाठी भविष्यवाणी 
चंद्राची महादशा व मंगळाची अंतर्दशा भाजपासाठी अनुकूल आहे. पक्षा कडून मतदाताना आकर्षित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आक्रमक प्रचाराचा उत्तम प्रभाव पडणार आहे. भाजपास त्यांची पारंपरिक मते तर मिळतीलच, शिवाय नवीन मतदारांची मते काबीज करण्यात सुद्धा ते यशस्वी होतील. पक्षाला विरोधकांची पारंपरिक मते मिळण्याची सुद्धा आशा आहे. पक्षाची मतांची टक्केवारी सुद्धा जास्त होईल. परंतु, सप्तमातील शनी - केतू युती काही गडबड करण्याची शक्यता आहे. २३ एप्रिल नंतर होणारे गुरुचे वृश्चिकेतील भ्रमण अतिशय अनुकूल असेल. २९ एप्रिल ते १९ मे दरम्यान होणाऱ्या मतदानात भाजपास उत्तम पाठिंबा मिळू शकेल. 

भाजपासाठी कुंडलीचा निष्कर्ष 
ह्या निवडणुकीत भाजपाची कामगिरी उत्तम होणे अपेक्षित आहे. पक्ष एनडीएला यशाकडे घेऊन जाईल. पक्षाची मतांची टक्केवारी उत्तम राहील. मात्र, पक्षाचे काही दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या उत्तम कामगिरीमुळे एनडीए मजबुतीसह सत्ता स्थापन करू शकेल. 

आचार्य भारद्वाज ह्यांच्या इनपुट सह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी