उत्पत्ती एकादशी व्रत कथा व विधी


एकादशीची उत्पत्ती 
हिंदू धर्मात एकादशी व्रताचे खूपच महत्व आहे. तसे पाहता दरवर्षी २४ एकादशी येतात, परंतु अधिक महिना आल्यास त्यांची संख्या २६ सुद्धा होते. सर्वात प्रथम एकादशी हि कार्तिक कृष्ण एकादशी समजली जाते. कारण ह्याच दिवशी एकादशी प्रकट झाली होती म्हणून हि एकादशी उत्पत्ती एकादशी ह्या नावाने ओळखली जाते. 

उत्पत्ती एकादशी २०१८
कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते. ह्या वर्षी म्हणजे २०१८ ला उत्पत्ती एकादशी व्रत ३ डिसेंबर रोजी आहे. प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्ष मिळून दोन एकादशी येतात. ह्या दिवशी भगवान श्रीविष्णूंची पूजा केली जाते. मात्र हे फारच कमी लोकांना माहित आहे कि एकादशी हि एक देवी असून तिचा जन्म हा भगवान श्रीविष्णूं मुळे झाला होता. हि एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी ह्या दिवशी प्रकट झाली होती ज्यामुळे तिचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. ह्या दिवसा पासून एकादशीचे व्रत सुरु झाले. 
एकादशी तिथीची सुरवात २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजल्या पासून होत आहे, परंतु हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्योदयाला असलेली तिथी हीच त्या दिवसाची तिथी असल्याचे समजले जाते, त्यामुळे ह्या एकादशीचा उपास ३ डिसेंबर रोजी करावा. 

उत्पत्ती एकादशीचे व्रत का करतात
उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते, ह्या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. अशी मान्यता आहे कि अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान ह्या सर्वांपासून मिळणाऱ्या फळाहून हि अधिक असे फळ ह्या व्रताने मिळते. उपासाने मन निर्मळ व शरीर स्वस्थ होत असते.  


उत्पत्ती एकादशी व्रत कथा 
सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत असे. मूर नावाचा त्यांचा एक पुत्र होता. मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता. त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमा समोर टिकाव लागत नव्हता. त्या नंतर देवतांनी भगवान श्रीविष्णूंकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारा पासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना केली. देवतांच्या अनुरोधा प्रमाणे भगवान श्रीविष्णू ह्यांनी दैत्यांवर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. ह्या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्रीविष्णू ह्यांना झोप येऊ लागली व मग ते बद्रिकाश्रम स्थित बारा योजने लांब सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला. भगवान श्रीविष्णूंना झोपलेले पाहून त्त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान श्रीविष्णूंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्या नंतर दैत्य व कन्या ह्यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले, ह्या दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्च्छित केले व त्याचा शिरच्छेद केला, त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा भगवान श्रीविष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले कि दैत्य मरण पावला आहे, ते आता विचार करू लागले कि दैत्यास कोणी मारले. त्यावेळी कन्येने सांगितले कि दैत्य त्यांना मारण्यासाठी तयार होता तेव्हा तिनेच त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्याचा वध केला. भगवान श्रीविष्णुंनी तिचे नांव एकादशी असे ठेवले, कारण एकादशीलाच ती भगवान श्रीविष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळेच ह्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. भगवान श्रीविष्णुंनी एकादशीला असा वर दिला कि प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णुलोकात स्थान मिळेल. 

एकादशीच्या उपासाची सुरवात केव्हा करावी 
जे श्रद्धाळू एकादशीचा उपास करत नाहीत परंतु उपास करण्याचा नेम धरतील तर त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी पासून त्यास सुरवात करावी, कारण ह्याच एकादशी पासून ह्या व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते. 

उत्पत्ती एकादशी व्रत व पूजा विधी 
एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपास दशमीच्या रात्रीपासून सुरु होतो. ह्यात दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजना नंतर सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी. रात्री बिलकुल भोजन घेऊ नये. अति बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नये व रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी प्रातः काली ब्राह्म मुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा. नित्य दिनचर्या झाल्यावर स्नानादी कर्मे करून भगवान श्रीविष्णूंची पूजा करून कथा श्रवण करावी. ह्या दरम्यान संपूर्ण दिवसभर व्रतस्थ व्यक्तीनी वाईट कर्म करणाऱ्या, पापी, दुष्ट व्यक्तींची संगत टाळावी. रात्री भजन - कीर्तन करावे व जाणता - अजाणता झालेल्या अपराधांची भगवान श्रीविष्णू ह्यांच्याकडे क्षमा मागावी. द्वादशीच्या दिवशी प्रातः काली ब्राह्मण किंवा गरिबास भोजन देऊन यथायोग्य दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी. नियमबद्ध केलेला उपास खूपच पुण्य फलदायी असतो. 

उत्पत्ती एकादशी तिथी व मुहूर्त 
एकादशी व्रत तिथी - ३ डिसेंबर २०१८. 
पूर्णाहुतीची वेळ - सकाळी ०७.०२ ते ०९.०३ पर्यंत (४ डिसेंबर, २०१८)
पूर्णाहुतीच्या दिवशी द्वादशी तिथीची समाप्ती - १२.१९ (४ डिसेंबर, २०१८)
एकादशी तिथी प्रारंभ - दुपारी २.०० (२ डिसेंबर, २०१८).
एकादशी तिथी समाप्ती - १२.५९ (३ डिसेंबर, २०१८)

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम